प्रतिभा महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे पेटंट मिळवण्यात यश
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील प्रतिभा शैक्षणिक संकुलाच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजचे प्रा.रोहित आकोलकर आणि प्रा.अनिता विश्वकर्मा यांना वाणिज्य क्षेत्रातील स्मार्ट मार्केटिंग मॅनेजमेंट असिस्टंट या विषयावर पेटंट प्राप्त झाले आहे. यामध्ये अमरावती येथील श्रीमती केसरबाई लाहोटी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.आशिष मेहता व डॉ.रचना राठी यांचा सुद्धा सहभाग आहे. या संशोधनाने मार्केटिंगच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापन अधिक सुलभ करता येईल. या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष महत्त्व आहे, जितके अधिक संशोधन आणि नाविन्य असते, तितके शिक्षण व्यवस्थेत अधिक योगदान होते.
संशोधनाच्या या यशाने महाविद्यालयाचे नाव शैक्षणिक जगतात उंचावेल असून प्राध्यापकांनी भविष्यातही अधिक संशोधन करून महाविद्यालयाला गौरव प्राप्त करून द्यावा, असे मत संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आणि प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, विभाग प्रमुख डॉ. अनामिका घोष, प्रा. हनुमंत कोळी आणि डॉ. जयश्री मुळे यांनी व्यक्त केले.