ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी

घराणेशाहीच्या विरोधात एकवटले चिंचवड मधील भाजप नगरसेवक व पदाधिकारी

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभेत भारतीय जनता पार्टीला माननारा एक मोठा मतदार वर्ग आहे की जो एखादी व्यक्ती किंवा घराणेशाही नाही तर पक्षाला, हिंदुत्ववादी विचारधारेला महत्व देतो त्यामुळे एकाच कुटुंबात एकाच छताखाली राहणारे सख्ख्या दीर-भावजय यांना महत्वाची पदे देणे हे हिंदुत्ववादी विचारांवर मतदान करणाऱ्या मतदारांना आवडलेले नाहीये व आता तर ते बोलूही लागले आहेत.

जशजशी विधानसभा निवडणूक जवळ येत चालली आहे तसतसा चिंचवड विधानसभेतील जगताप परीवाराचा विरोध शमण्याऐवजी तो वाढतच चालला आहे.

२००९ मधे चिंचवड विधानसभेतून लक्ष्मण जगताप अवघ्या ६ हजार मतांनी विजयी झाले होते. २०१४ मधे लोकसभेसाठी झालेल्या मतदानात विद्यमान आमदार असलेल्या आपल्याच चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप हे तब्बल ६० हजार मतांनी पिछाडी होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१४ मधे आलेली लाट व महाराष्ट्र विधानसभेत होणारे परीवर्तन यांचे वेध लक्षात घेऊन दूरदूष्टीकोन असणाऱ्या लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीची डूबती नैय्या सोडली व भारतीय जनता पक्षाची वाट धरली आणि २०१४ च्या विधानसभेत भाजपची उमेदवारी मिळवली व विजयी देखिल झाले.

२०१९ मधे लक्ष्मण जगताप यांचे पूर्वाश्रमीचे नेते अजित पवार यांनी चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ लोकसभेतील उभं केले जगताप यांनी प्रथम महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्यासाठी प्रथम खूप आढेवेढे घेतले. अक्षरश: भाजपा नेते गिरीश महाजन यांना समेट घडविण्यायाठी दोनदा चिंचवड मधे यावे लागले शेवटी संघाचे स्वयंसेवक व भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट महायुतीचे काम सुरू केल्यामुळे व जनतेचा महायुतीला मिळणारा प्रतिसाद पाहून जगताप यांची चांगलीच पंचाईत झाली त्यामुळे नाईलाजाने त्यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उतरावे लागले.या निवडणूकीत आप्पा बारणे यांना चिंचवड विधानसभेतून तब्बल ९६ हजार मतांचा लीड मिळाले.

याउलट परीस्थिती २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत झाली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड विधानसभेची जाग राष्ट्रवादीच्या वाट्याला आली परंतु राष्ट्रवादी ऐनवेळेस लक्ष्मण जगताप यांच्या समोर उमेदवारच दिला नाही शेवटी राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला महायुतीकडे भाजपा, शिवसेना, आरपीआय व संघपरीवार शिवाय सर्व नगरसेवक अशी भलीमोठी कार्यकर्त्यांची मोठी फौज असून देखिल बारणे यांच्या तुलनेत जगताप अत्यंत नगन्य म्हणजे अवघ्या ३८ हजार मतांचे लीड मिळाले.

लक्ष्मण जगताप यांच्या निधना नंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांना १ लाख ३६ हजार मते, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना १ लाख तर अपक्ष उमेदवार कलाटे यांना ४६ हजार मते व इतर उमेदवारांना ८ हजार मते मिळाली याचाच अर्थ दीड लाखांपेक्षा जास्त मते जगताप यांच्या विरोधात आहेत व हिच बाब जगताप विरोधकांनी ताडली आहे एकीकडे जगताप विरोधक अजित पवार गटातील नगरसेवक एकत्र बैठका घेत आहेत तर भाजपाच्या गोटात यांच्या कार्यपद्धतीला व घराणेशाहीला विरोध करीत लोकसभा निवडणूकी आधीच भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे, नवनाथ जगताप, माया बारणे, चंदा लोखंडे, सीमा चौघुले यांनी पक्षाला रामराम केला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभेत ज्यांनी चार-चार चा पॅनल निवडून आणले आहेत असे मातब्बर नगरसेवकांनी एकत्र येत घराणेशाहीला तीव्र विरोध केला आहे.या बैठकीला नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे,संदिप कस्पटे, कैलास बारणे, सिद्धेश्वर बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, सुनिताताई तापकीर, सविता नखाते यांसह भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राज तापकीर,   रामभाऊ वाकडकर आदि प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button