उन्नती सोशल फाउंडेशनच्या ‘दांडिया’ स्पर्धेतून साधला जातोय सामजिक एकोपा – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच प्रतिपादन

कृपया प्रसिद्धीसाठी
————————–
चार दिवसीय ‘दांडिया ग्रुप डान्स’ स्पर्धेचा समारोप; स्पर्धकांकडून बक्षिसांची लयलूट
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “नवरात्र” हा एक उत्सव नसून सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यात हा सण नुसताच साजरा होत नाही तर, सबंध देशाला एका माळेमध्ये जुंपण्याचे महत्वाचे कार्य त्याद्वारे पार पडत असते. नवदुर्गाच्या पूजनाने आसमंतात एक वेगळीच शक्ती संचारते. तीच शक्ती आज अखंड भारत मातेला सुरक्षा प्रदान करते. विविधतेत एकतेने नटलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आज देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक एकत्र आले आहेत. त्यांच्या परंपरा, चालीरीती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काच व्यासपीठ प्रदान करण्याच कार्य पिंपळे सौदागरमधील उन्नती सोशल फाउंडेशन मोठ्या उत्साहात पार पाडीत असते. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘दांडिया ग्रुप डान्स’ स्पर्धेच्या माध्यमातून या नागरिकांना एकत्र आणत, त्यांच्यात भाईचारा प्रस्तापित करणारा हा त्यांचा उपक्रम अगदी स्तुत्य आहे”, असं प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केलं.
पिंपळे सौदाग येथील राजमाता जिजाऊ उद्यानात चार दिवसीय ‘दांडिया ग्रुप डान्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले होते. कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि समारोप भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, पवना सहकारी बँकेचे संचालक जयनाथ काटे, पी. के. स्कुलचे संस्थापक जग्गनाथ काटे, गुलाब मेटे, शंकर चोंधे, राजू देवतारे, राजेंद्र जैस्वाल, सुभाष पवार, उन्नती सखी मंचच्या उपाध्यक्षा रश्मी मोरे, उन्नती सोशल फाऊंडेशन, विठाई वाचनालय, जेष्ठ नागरिक संघ यांचे सर्व सदस्य, यासह पिंपळे सौदागरमधील नागरिक आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विजेत्या संघांना रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील विजेते स्पर्धक
पीस व्हॅली रोझी गर्ल्स, जय माता दी ग्रुप द इरा 24 स्टुडिओ सुखवानी सेलेनियो, जरवरी कपल ग्रुप आदिशक्ती ग्रुप, साई पर्ल गरबा ग्रुप-1, डॅफोडिल्स गरबा ग्रुप, रोझवूड मॅजेस्टिक, देविया राजमुद्रा ग्रुप हिरकणी, ग्रुप डॉट फिटनेस डान्स स्टुडिओ, अल्कोव्ह गरबा ग्रुप रंगीला रास ग्रुप, नवरात्र नावेली ग्रुप द्वारका साई ग्रुप, जर्वरी ग्रुप, आनंद हास्य क्लब, डॅफोडिल्स गरबा ग्रुप-2, रॉकिंग कुंदन श्वेतास गरबा ग्रुप, साई ऑर्किड सोसायटी, सिद्धिविनायक जिंजर द डान्स कल्टर, द्वारका साई वंडर्स फेज 1, एलिट इव्हॉल्व्ह गरबा ग्रोव्हर्स, हिरकणी ग्रुप, रहाटणी डान्सिंग डायनामोस किड्स ग्रुप, श्री क्लासेस.
“नवरात्रीचा उत्सव हा केवळ पूजेपुरता मर्यादित नसून त्याचा सांस्कृतिक पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे. दांडिया हे देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्यातील संघर्षाचे प्रतीक मानले जाते. दांडियामध्ये वापरल्या जाणाऱ्या काठीला माँ दुर्गेची तलवार म्हणतात, जी वाईटाचे विनाशकारी प्रतीक आहे. सांस्कृतिक मंथन व्हावे या उद्देशाने आम्ही या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यास मोठ्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद लाभला. उन्नती सोशल फाऊंडेशन यापुढेही अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात नेहमीच पुढाकर घेईल.” – डॉ. कुंदा संजय भिसे, अध्यक्षा – उन्नती सोशल फाऊंडेशन…









