पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत कल्याणकारी योजनेस मुदत वाढ द्या – शत्रुघ्न काटे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत कल्याणकारी योजनेचा एक भाग म्हणून दहावी व बारावी ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनींना बक्षीस रक्कम देण्यात येते. या योजनेची अंतिम मुदत संपली असून या योजनेस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिच्या समाज विकास विभागामार्फत कल्याणकारी योजनेचा एक भाग म्हणून १०वी आणि १२वी इयत्तेत ८०% ते ९०% आणि ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनींना बक्षीस रक्कम देण्यात येत.
दरवर्षी प्रमाणे पालिकेमार्फत ही योजना राबविण्यात आली आणि ३० सप्टेंबर या अंतिम मुदत पर्यन्त लाभार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. परंतु शत्रुघ्न काटे यांच्या असे निदर्शनास आली की या योजनेची अंतिम मुदत संपून देखील शहरात अनेक विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले आहे.
पालिकेच्या कल्याणकारी या योजनेचा मूल उद्देश विद्यार्थी / विद्यार्थिनींना प्रोत्साहन देऊन त्यांचे पुढील भविष्य बळकट करणे तसेच जनसामान्यांना आपल्या योजनेच्या माध्यमातून त्यांचे कल्याण करणे असून पालिकेनी त्याविषयी योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे .
त्यामुळे आपल्या पत्राद्वारे त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिच्या समाज विकास विभागामार्फत विद्यार्थी / विद्यार्थिनींना बक्षीस रक्कम देण्याबाबत राबविण्यात आलेली कल्याणकारी योजनेला आणखीन कमीत कमी १५ दिवस मुदतवाढ देण्यात यावे अशी मागणी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.