पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि संस्कार प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव विसर्जनाच्या अकराव्या दिवशी अखेर 14,860 तर गणपती दान आणि 32 टन निर्माल्य जमा


गणपतीदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद



चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम अनंतचतुर्दशीच्या दिवशी राबविण्यात आला.
गणेशोत्सव विसर्जनाच्या अकराव्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत हाॕटेल रिव्ह्यु घाट बिर्ला हाॕस्पिटलरोड चिंचवडगाव येथे भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद सकाळी ७ पासुन रात्री 2 वाजेपर्यंत 7534 मुर्तीचे दान मिळाले आणि जवळजवळ 12 टन निर्माल्यदान मिळाले.

गणपतीदान २०२४
दीड दिवस 544 गणपती दान आणि 2 टन निर्माल्य
पाचवा दिवस 668 गणपती दान आणि 2 टन निर्माल्य,सहावा दिवस 1177 गणपती दान आणि 3 टन निर्माल्य,सातवा दिवस 2917 गणपती दान आणि 7 टन निर्माल्य,नववा दिवस 595 गणपती दान आणि 2 टन निर्माल्य,दहावा दिवस 1425 गणपती आणि 4 टन निर्माल्य,अकरावा दिवस 7448+86 हौदातील एकूण 7534 गणपती दान आणि 12 टन निर्माल्य.
14,860 एकूण गणपती दान आणि 32 टन निर्माल्य जमा केले
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय शेखर सिंह,ब प्रभाग अधिकारी अमित पंडित आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपुर्ण दहा दिवस पार पडला.
संस्थेनी शिफ्ट प्रमाणे सभासदांची निवड करुन हा उपक्रम यशस्वी केला.या उपक्रमात डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी राष्ट्रीय सेवा योजना, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडी चिंचवड पुणे,राष्ट्रीय सेवा योजना
औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अँड कम्प्युटर ॲप्लीकेशन , चिंचवड राष्ट्रीय सेवा योजना यांनी सहभाग घेतला होता.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठीआनंद पाथरे, शब्बीर मुजावर, मनोहर कड, राजेंद्र फडतरे, नम्रता बांदल, सुनंदा निक्रड, प्रिया पुजारी, विश्वास राऊत, भरत शिंदे, संजीत पद्मन, सायली सुर्वे, मनीषा आगम, विजय आगम, यश ढवळे,अरुण कळंबे, अभिजित पाटील, रमेश भिसे,स्वप्निल सुतार, पुजा पुराणिक, जितेंद्र जाधव, सतीश उघडे,विकास पाटील, आनंद पुजारी, सोमनाथ पतंगे, सुधाकर खुडे, अनन्या पुजारी, नंदकिशोर खंडागळे, पल्लवी नायक, संध्या स्वामी, सुनिता गायकवाड, कविता वाल्हे, स्वाती म्हेत्रे,रोहित मोरे, पुजा सनके, स्मिता रसाळ, स्मिता साठे, ओम पाथरे,मनपा ब प्रभाग अभियंता चेतन देसले, रसूल शेख, सुधीर वाघमारे,सहाय्यक आरोग्य अधिकारी भूषण शिंदे मुख्य आरोग्य निरीक्षक प्रकाश खलसे, प्रभारी आरोग्य निरीक्षक दत्तात्रय प्रवीण शेळके गणगे, आरोग्य निरीक्षक मजूर रमेश कापुरे, अनिल ढाले यांनी परिश्रम घेतले.
तसेच पिंपरी चिंचवड मनपाचे अति आयुक्त विजय खोराटे यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन मुर्तीचे दान घेतले.निर्माल्यदान घेण्यासाठी संस्कार संस्कृती सद्भावना महिला बचत चिंचवडेनगर यांनी मदत केली
पोलीस बंदोबस्ताला मदत
पोलीस आयुक्त यांच्या मा विनयकुमार चोबे साहेब आणि चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री एस आर दामसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड हद्दीत ५० सभासदांनी चाफेकर चौक ते बिर्ला हाॕस्पिटलरोड घाटापर्यंत विशेष पोलीस अधिकारी म्हणून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मदत केली.
अनंतचतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी संपुर्ण घाटाची स्वच्छता अभियान करण्यात आली यामध्ये घाटावर पडलेले निर्माल्य आणि इतर कचरा साफ करून जमा करण्यात आला.








