Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»भाजपकडून प्रभाग स्तरीय मोफत आरोग्य शिबीरे व रुग्णांना फळ वाटप करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा
चिंचवड

भाजपकडून प्रभाग स्तरीय मोफत आरोग्य शिबीरे व रुग्णांना फळ वाटप करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com23 July 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

दहा हजारहून अधिक रुग्णांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ

  पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभाग स्तरीय मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड मतदारसंघातील विविध १३ ठिकाणी आयोजित या शिबीरांमध्ये १० हजाराहुन अधिक गोरगरीब रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. तसेच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सर्व रुग्णांना फळ व बिस्कीटांचे वाटप करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, शहर सरचिटणीस विलास मडिगेरी नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे, उपाध्यक्ष राजू दुर्गे, रुग्णालयाचे अधिष्ठता राजेश वाबळे, वैद्यकीय अधीक्षक अभयचंद्र दादेवार, महेंद्र बाविस्कर, देवदत्त लांडे, सतिश नागरगोजे आदी पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभाग क्र.१६ एमबी कॅम्प विकासनगर, प्रभाग क्र. १७ तुळजाभवानी मंदिर बिजलीनगर, प्रभाग १८ कै. शिवाजी भोईर सांस्कृतिक भवन, चिंचवडगाव, प्रभाग २२ पार्वती  इंग्लिश मिडीअम स्कूल, ज्योतिबा नगर, काळेवाडी, प्रभाग २३ पडवळ नगर थेरगाव, प्रभाग २४ लक्ष्मीबाई बारणे विद्यालय गुजरनगर थेरगाव, प्रभाग क्र. २५ दत्त मंदिर माउली चौक वाकड, समीर भुजबळ चौक पुनावळे, अधिरा इंटरनॅशनल स्कूल पुनावळे, कस्तुरी चौक वाकड, प्रभाग २६ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पिंपळे निलख, मनपा शाळा कस्पटे वस्ती वाकड, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र वेणू नगर, वाकड, प्रभाग २७ बळीराज कॉलनी नखाते वस्ती चौक रहाटणी, प्रभाग २८ पी.के.शाळेसमोर पिंपळे सौदागर, प्रभाग २९ महालक्ष्मी मंगल कार्यालय सुदर्शन नगर, सृष्टी चौक पिंपळे गुरव, प्रभाग ३१ शंकर पांडूरंग जगताप जनसंपर्क कार्यालय, कृष्णा चौक नवी सांगवी, प्रभाग ३२ शुभयोग मंगल कार्यालय ढोरे नगर, जुनी सांगवी या ठिकाणी आरोग्य शिबीरे घेण्यात आली. यामध्ये मोफत इसीजी तपासणी, मोफत डोळयांची दृष्टी तपासणी, दृष्टी तपासणीत मोतीबिंदू आढळल्यास मोतीबिंदू शस्त्रक्रियेत सूट, हाडांची ठिसुळता चाचणी, सर्व प्रकारच्या चष्म्यांवर ३० टक्के सूट, ब्लड शुगर तपासणी, मणक्यांच्या आजाराची तपासणी आदी मोफत तपासण्या करण्यात आल्या. शहर सरचिटणीस नामदेव ढाके, बाळासाहेब तरस, माजी नगरसेवक सुरेश भोईर, जवाहर ढोरे, हर्षद नढे, प्रमोद पवार, सनी बारणे, ‍विशाल कलाटे, चेतन भुजबळ, नवनाथ ढवळे, भारती विनोदे, नितीन इंगवले, प्रसाद कस्पटे, अभिजित साळंखे, नरेश खुळे, संजय भिसे, अमर आदियाल, संजय मराठे यांनी या मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन केले.

*आई- वडीलांचे छत्र हरपलेल्या अरमान शेखला उपचारासाठी मदत…*

दरम्यान, वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अरमान ‍शिरू शेख, रा. भोसरी या रुग्णाबाबत माजी नगरसेविका भीमाताई फुगे यांनी शहराध्यक्ष शंकर जगताप यांना वायसीएम रुग्णालय भेटीत माहिती दिली. या रुग्णाची लगेच प्रत्यक्ष भेट घेवून जगताप यांनी त्याची विचारपूस केली. आई – वडीलांचे छत्र हरपल्याचे भीमा फुगे व त्याच्या लहान बहिणीकडून समजले. जात धर्म याचा कधीच विचार करत न करता २० हजाराची रोख मदत उपचार व औषध खर्चासाठी शंकर जगताप यांनी शेख बहिण-भावाकडे सुपूर्त केली. तसेच, रुग्णालयातील डॉक्टरांना आवश्यक सर्व उपचार करण्याच्या सूचना शंकर जगताप यांनी डॉक्टर यांना दिल्या. भीमा फुगे या रोज वायसीएम रुग्णालयात भेट देवून अरमान शेख याची विचारपूस करीत असून, भाजपा अंत्योदयचा विचार करून आईची माया देत आहेत.

राज्याच्या विकासासाठी लोकनेते देवेंद्र फडणवीस हे अहोरात्र झटत आहेत. हाती घेतलेले काम झपाट्याने पूर्ण करीत असताना त्यांची नाळ जनतेशी जुळली गेली आहे. राज्यातील रस्ते, वीजपुरवठा, उद्योग, सिंचन या बाबी राज्याचा विकासदर निश्चित करण्यासाठी कामी येत असल्या, तरी गरीब-सर्वसामान्य, तळागाळातील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच प्रगती मोजण्याचा मापदंड असतो. नागरिकांचे आरोग्य, विकासाची स्पष्ट दृष्टी, निश्‍चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता काम करण्याची दिशा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळते. या लोकनेत्याच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने प्रभाग स्तरीय मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करून गोरगरीब रुग्णांची आरोग्य सेवा करण्यात आली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे सलग सहाव्या वर्षी १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार
Next Article “सर्व जातीपातींना एकत्र आणणारे अध्यात्म गरजेचे!” – डॉ. संजय उपाध्ये
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.