
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या उत्तर भारतीय प्रकोष्ठ अध्यक्षपदी संतोष वशिष्ठ मुनि ओझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाची ध्येय-धोरणे, विचार आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, संतोष मुनि ओझा यांनी पक्षासाठी केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांची ही निवड करण्यात आली असून, जनतेच्या प्रगती व कल्याणासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या नियुक्तीबद्दल संतोष मुनि ओझा यांचे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



