पिंपरी(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. हा कार्यक्रम मोशी चिखली रोड वरील इंपिरियल बैंक्वेट हॉल मोशी येथे घेण्यात आला.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाची कार्यकारिणी, शहराध्यक्ष तुषार कामठे व सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूर जाधव यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आली. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच शरद पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे नेते तयारीला लागल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
सदर पदनियुक्ती कार्यक्रमाला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील सचिन सकट यांची पिंपरी विधानसभा अध्यक्ष पदी तर अर्जुन कदम आणि विकास रंधवे यांची सामाजिक न्याय विभागाच्या शहर सरचिटणीस पदीनियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, सामाजिक न्याय विभाग चे अध्यक्ष मयुर जाधव, वरीष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप,सरचिटणीस जयंत शिंदे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, संघटक विवेक विधाते, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, प्रवक्ते माधव पाटील, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, माजी नगरसेवक गणेश भोंडवे ,जेष्ठ मार्गदर्शक शिरीष जाधव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस के. डी. वाघमारे , काशिनाथ बामणे, अण्णासाहेब पाखरे, गणेश काळे, रोहित जाधव, अविनाश कांबळे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

