पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने (दिनांक २७ एप्रिल)शहरातील आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावतीने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उप मुख्यंमत्री सुनेत्रावहिनी अजित पवार तसेच राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी शिष्ट मंडळासमवेत भेट झाली.
तसेच आघामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहराला संधी देणेबाबत एक मताने शहराध्यक्ष, मा.महापौर योगेश बहल यांचे नाव देण्यात आले. योगेश बहल यांनी सन १९९२ पासून आज तागायत सलग ७ वेळा निवडून येत एक अभ्यासू नगरसेवक म्हणून तसेच विविध पदांची जबाबदारी सांभाळली त्यामध्ये शहराध्यक्ष, महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम करत शहरातील सर्व सामांन्य नागरीकांचे काम केले तसेच सुरूवातीला दोन्ही पक्ष एकत्र असतानां काँग्रेस तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये पक्ष संघटना वाढविण्याच्या अनुषंगाने व महानगरपालिकेत सत्ता आणण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे म्हणूनच सन १९९२ पासून स्व.अजितदादा यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात हे सर्वश्रृत आहे. आजतागाय पिंपरी चिंचवड शहराला विधान परिषद मिळालेली नाही, तसेच पिंपरी विधानसभा अनेक वर्षांपासून आरक्षित असल्याने त्यांना कुठेही संधी मिळाली नाही, तरी त्यांच्या आज पर्यंतच्या कार्याचा अनुभव पाहून आगामी काळात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळावा याबाबत विद्यमान नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी कार्यकर्ते यांचेकडून निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, शहरात एकूण तीन विधानसभा मतदार संघामध्ये केवळ एक आमदार पिंपरी मतदार संघाच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. परंतु संपूर्ण शहरातील विविध विकास कामे करण्याच्या दृष्टीने विधान परिषद किंवा महामंडळाच्या माध्यमातून महानगरपालिका तसेच प्रशासनाकडून प्रभागातील कामे करून घेण्यासाठी शहरात विधान परिषदेच्या माध्यमातून एक जागा बहल यांच्या रूपाने पिंपरी चिंचवड द्यावी जेणे करून शहरात विकास कामांना गती व पक्षाची ताकद वाढण्यास मदत होईल.
पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही औद्योगिक नगरी व आयटी हब म्हणून आहे, विषेश म्हणजे हे कॉस्मोपॉलिटीयन शहर त्यामुळे जर श्री.योगेश बहल यांच्या सारख्या अनुभवी आणि अल्पसंख्यांक व्यक्तीस संधी मिळाल्यास एक चांगला संदेश संपूर्ण शहरात जाईल. त्यांच्या प्रदिर्घ राजकीय कार्किदीस न्याय मिळू शकेल. असे सदर निवेदनात म्हटले आहे.
यावेळी डॉ.वैशाली घोडेकर, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, शाम लांडे, सीमा सावळे, वैशाली काळभोर, अतुल शितोळे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, निकिता कदम, विकास साने, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, उज्वला ढोरे, प्रियंका कुदळे, अरुणा लंगोटे, अश्विनी वाबळे, सारिका मासुळकर, प्रतिक्षा जवळकर-लांघी, दिप्ती कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सारंग कामतेकर, तानाजी खाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, रविंद्र ओव्हाळ, युसूफ कुरेशी, दिपक साकोरे, राजू लोखंडे, निलेश शिंदे, अंबरनाथ कांबळे, गणेश लंगोटे, मंगेश बारणे, हबीब शेख, सचिन बारणे, इत्यादींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

