पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे.
या सुशोभीकरणांतर्गत चौक परिसरात विविध रंगीबेरंगी फुलांची झाडे,शोभेची झुडपे लावण्यात येत असून परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच नागरिकांना स्वच्छ व आनंददायी वातावरण मिळणार आहे.
या उपक्रमामुळे चौक परिसरात हिरवळ वाढणार असून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असून महापालिका व लोकप्रतिनिधींच्या या पुढाकाराचे कौतुक व्यक्त केले जात आहे.
रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील चौक,रस्ते इ. सुशोभीकरण आणि निसर्गरम्य करण्याबाबत नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे या तिन्ही नगरसेवकांनी विशेष प्राधान्य दिले आहे.

