Author: maharashtrabreakingnews.com

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  रहाटणी काळेवाडी तील सामाजिक कार्यकर्ते तसेच आदर्श नागरिक जुन्या पिढीतील नामवंत मल्ल कै सयाजीआप्पा हरीभाऊ नढे यांचे वय वर्षे ६९ यांचे बुधवार दि १४ जानेवारी रोजी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पुतणे, सुना, मुली व नातवंडे आहे.तसेच नगरसेवक विनोद नढे हे त्यांचे पुतणे आहेत.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यालयात तसेच प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये आचारसंहिता व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच ३७ एफएसटी, ३२ एसएसटी व ४४ व्हीएसटी पथकांमार्फत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देखरेख ठेवण्यात येत आहे. या स्थापन करण्यात आलेल्या पथकांमार्फत व पोलीस विभागामार्फत १५ डिसेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत ६ दखलपात्र व ११ अदखलपात्र असे एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आचारसंहिता कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी झाल्यानंतर तात्काळ प्रभावाने…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने आयोजित अहिर सुवर्णकार समाज क्रिकेट स्पर्धा २०२६ (तिसरे वर्ष) मोठ्या उत्साहात पार पडत असून समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेत पाहायला मिळत आहे. क्रीडा भावनेतून एकत्र येत समाजातील तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष भगवान वानखेडे व उपाध्यक्ष संतोष सौंदणकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सचिव गणेश सोनार, खजिनदार शिवाजी सोनार, सहखजिनदार कैलास पैठणकर, भवन प्रमुख प्रमोद काशीकर तसेच सदस्य दीपक सोनार, सुनील निकुंभ, प्रवीण सोनार, ऋषिकेश देवरे आणि महिला अध्यक्ष स्मिता सोनार उपस्थित होते. यंदाच्या क्रिकेट स्पर्धेत एकूण चार संघांनी सहभाग नोंदवला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असून मतदानासाठी आवश्यक असलेले मतदान साहित्य व मतदान केंद्रावरील पथके सुरक्षितपणे आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेली एकूण २०६७ मतदान केंद्रांवरील नियुक्त १०३३५ कर्मचारी यांसह सुरक्षा विभागातील कर्मचारी,शिपाई,मजूर यांसह पथके मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर मतदान साहित्य — ईव्हीएम यंत्रे, मतदानासाठी लागणारे कागदपत्रे, सीलबंद साहित्य तसेच अन्य आवश्यक सामग्री सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  गुरूवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणारी मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यंत्रणा सज्ज असून मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण मतदार संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी असून यामध्ये ९ लाख ५ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ स्त्रिया आणि १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रभाग क्रमांक १६…

Read More

कायदेशीर लढाई, राजकीय हेवेदावे यामुळे रखडलेल्या राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना अखेर मंगळवारी मुहुर्त मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये येत्या ५ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, ७ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या सर्व जिल्हा परिषदांमध्ये आचारंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली. ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेचे अधिकार आदी विविध कारणांमुळे प्रदिर्घ काळापासून रखडलेल्या आणि ‘मिनी विधानसभा’ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रामुख्याने जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका येत्या ३१ जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यापूर्वी…

Read More

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी-पिंपळे गुरवकरांना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी आणि विजेची समस्या कायमस्वरूपी संपवण्यास मी बांधील आहे. मात्र, त्यासाठी माझ्या विचाराचे नगरसेवक महापालिकेत निवडून देण्याची जबाबदारी तुम्हा मतदारांची आहे. राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर सर्वांना मोफत मेट्रो आणि पीएमपीएमएल सेवा देणार आहे, हा दादाचा वादा आहे. येत्या १५ जानेवारीला घड्याळा समोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, अशी भावनिक साद राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदारांना घातली. नवी सांगवी येथील कृष्णा चौकात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी प्रभाग क्र. ३१ चे उमेदवार राजेंद्र गणपत जगताप, अरुण श्रीपती पवार, दिप्ती अंबरनाथ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये विविध ठिकाणी एअर बलूनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली मतदान जनजागृतीसाठी विविध स्वीप उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शहरामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, भक्ती शक्ती चौक, डांगे चौक थेरगाव,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड गावठाण–केशवनगर ) येथील भारतीय जनता पार्टी व आरपीआय (आठवले) युतीच्या प्रचाराची सोमवारी सायंकाळी भव्य पदयात्रेने सांगता झाली. चापेकर चौक येथून सुरू झालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपच्या अधिकृत उमेदवार अपर्णा निलेश डोके, मनीषा योगेश चिंचवडे, ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे आणि  सुरेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या प्रचार पदयात्रेत कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मार्गावर ‘कमळ’ चिन्हाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. गांधी पेठ, तलाठी ऑफिस परिसर, भीमनगर, केशवनगर, कुंडल इस्टेट, गोयल गार्डन, तानाजीनगर, शिवाजी उद्यान परिसर आदी…

Read More