Author: maharashtrabreakingnews.com

भाजपाचा चिंचवड 39, भोसरी 35 तर पिंपरी मतदारसंघांमध्ये 12 जागांवर विजय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये जगताप कुटुंबीयांचा करिष्मा कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 2017 मध्ये लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडमध्ये परिवर्तन घडवले. पिंपरी चिंचवडकरांच्या स्वाभिमानावर शहरांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आणली. तोच करिष्मा 2026 मध्ये देखील पहायला मिळाला. यंदाच्या निवडणुका निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यामध्ये देखील भाजपने निर्विवाद सत्ता मिळवत पिंपरी चिंचवड मध्ये कमळ फुलवले. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 पार पडली. 16 जानेवारी रोजी या निवडणुकांचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये भाजप 85, राष्ट्रवादी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता जिल्हा परिषद शाळा, जालिंदरनगर, कणेसरजवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे एकदिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त या चौथ्या पुष्पाचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश गोरडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते तसेच प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदानसोहळा व काव्यजागर संमेलन संपन्न होईल. ज्येष्ठ साहित्यिक श्रमश्री बाजीराव…

Read More

संभाजीनगरात आजपासून भव्य कीर्तन महोत्सव चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिर येथे महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या उपस्थितीत भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वा. सावरकर प्रतिष्ठान , स्वा. सावरकर मित्र मंडळ , सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघ, सावरकर महिला मंडळ आदींच्या संयुक्त विद्यमाने सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे हे तिसावे वर्ष आहे. आळंदी संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, वाणीभुषण प्रमोद महाराज जगताप, संतसेवक श्रीकांत महाराज गागरे, सौ. ऋतुजा झेंडे- घिसरे, भागवताचार्य तुकाराम शास्त्री मुंडे आदी कीर्तनकारांच्या कीर्तनाचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर होताच चऱ्होली बु., मोशी आणि डुडुळगाव परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक ३ मधून मा. महापौर नितीनआप्पा काळजे यांनी तब्बल १९,६२५ मतांची विक्रमी आघाडी घेत तिसऱ्यांदा हॅट्रिक साधत दणदणीत विजय मिळवला. हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून, गेल्या दशकभरातील विकासकामांवर जनतेने दाखवलेल्या ठाम विश्वासाचे प्रतीक मानला जात आहे. भोसरी विधानसभेचे आमदार  महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीनआप्पा काळजे यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला. त्यांच्या महापौर कार्यकाळात प्रभाग तीनमध्ये झालेला कायापालट आज ठळकपणे दिसून येतो. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, आरोग्य अशा मूलभूत सुविधा सक्षमपणे उभारल्यामुळे परिसरात वेगाने शहरीकरण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालातून शहराच्या राजकारणात बदलाची स्पष्ट झलक पाहायला मिळाली आहे. १२८ जागांच्या सभागृहात तब्बल ६४ नवे चेहरे निवडून आले असून ६४ जुन्या नगरसेवकांनी पुन्हा प्रवेश मिळवला आहे. जनतेने अर्ध्या सभागृहाला नवे नेतृत्व देत अनुभव आणि बदल यांचा समतोल साधल्याचे चित्र दिसून येते. नव्या नगरसेवकांमध्ये भाजपचे सर्वाधिक ४३ उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. यामध्ये सोमन मोरे, सुजाता बोराटे, निखिल बो-हाडे, सारिका गायकवाड, अर्चना सस्ते, सचिन तापकीर, श्रुती डोळस, उदय गायकवाड, कृष्णा सुरकुले, कविता भोंगाळे, रेखा देवकर, राजश्री लांडगे, योगेश लांडगे, राणी पठारे, सुहास कांबळे, सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम, रिटा सानप, नीलेश नेवाळे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 128 पैकी भारतीय जनता पक्षाचे तब्बल 85 उमेदवार विजयी झाले. भाजपाने सलग दुसर्‍यांदा महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. तर, फेब्रुवारी 2017 ला हातातून निसटलेली सत्ता ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप करत शहर पिंजून काढले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराने राष्ट्रवादीला पुन्हा नाकारले. एकूण 36 जागा राखलेल्या राष्ट्रवादीला सलग दुसर्‍यांदा विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की आली आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर महापालिकेची यंदा निवडणूक झाली. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार्‍या भाजपाने 77 नगरसेवकांवरून 85 वर झेप घेतली आहे. तर, निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी शहरात तळ ठोकला. भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप करीत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निकालात पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधून भारतीय जनता पक्षाने वर्चस्व सिद्ध केले आहे. या प्रभागातून भाजपचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी ठरले असून, मतदारांनी पुन्हा एकदा विकास आणि विश्वासाला कौल दिल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शत्रुघ्न काटे यांनी १७,५८९ मते, कुंदा संजय भिसे यांनी १७,७८४ मते, तर अनिता संदीप काटे यांनी १४,८३२ मते मिळवत विजय संपादन केला. तिन्ही उमेदवारांच्या विजयामुळे प्रभाग २८ मध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे. प्रचारादरम्यान स्थानिक विकासकामे, पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांशी थेट संवाद यावर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. पक्षाने दिलेला विश्वास सुज्ञ मतदारांमुळे सार्थ ठरला आहे. निवडणूक विकासाच्या विरोधात लढवली गेली मात्र नागरिकांनी विकासाचे “व्हिजन” स्वीकारले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही विकासाची घोडदौड आता कायम राहणार आहे. आगामी काळात नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी अशी त्रिसूत्री वापरून शहराचा विकासाचा आलेख उंचावत नेणार असल्याची ग्वाही निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने संवाद साधतान निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप म्हणाले, 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. 16 जानेवारी रोजी या निवडणुकीचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आज जाहीर होत असलेल्या निकालांकडे पाहता, पिंपरी-चिंचवडकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर ठाम विश्वास व्यक्त केला असून, भाजपचा एकहाती महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांन आम्ही साद घातली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2026 च्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले होते. मागील काही दिवसांपासून शहरात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू होती. आज निकालावरुन पिंपरी-चिंचवडची जाणती व स्वाभिमानी जनता भाजपाच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक कामगिरी करत शहरातील सत्ता अधिक भक्कम केली आहे. मतमोजणी काही प्रभागांमध्ये सुरू असतानाच बहुसंख्य जागांवरील चित्र स्पष्ट झाले असून, भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्येचा टप्पा पार केला आहे. एकूण 128 नगरसेवकांच्या सभागृहात भाजपने 84 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना (शिंदे गट) 6 जागांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निकालामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामे, पायाभूत सुविधा, तसेच शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर…

Read More