- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वयंशिस्तीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत नसून, प्रत्यक्षात आपले रक्षण होत असते. वाहतूक सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी असून, खरे सामर्थ्य वेगात नसून नियंत्रणात असते. हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठात पोलीस वर्धापन दिन आणि रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित व्यसनमुक्ती व वाहतूक जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन एमआयटी एडीटी विद्यापीठ, हडपसर वाहतूक विभाग आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी एमआयटी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडे व दिघी औद्योगिक परिसरातील वाढत्या वीज मागणीमुळे निर्माण होणाऱ्या वारंवार बिघाड व सक्तीच्या भारनियमनाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महावितरणकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. औद्योगिक व आय.टी. क्षेत्राच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन 22/22 के.व्ही. कॅनबे उपकेंद्र तसेच 22/11 के.व्ही. GREF सेंटर कळस येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारणीचे DPR प्रस्तावित करण्यात आले आहेत. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत केलेल्या सातत्त्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सध्या तळवडे परिसरातील विद्युत यंत्रणा अतिभारित व संयुक्त स्वरूपाची असल्यामुळे वारंवार ब्रेकडाऊन होत असून प्रमुख औद्योगिक व आय.टी. परिसरांचा वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर महसूल नुकसान व…
ढोल-ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाची लाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवडकरांनी ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे जल्लोषात स्वागत केले. वेग, शिस्त आणि खेळभावनेचा संगम असलेली ही स्पर्धा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होताच लक्ष्मी चौक ते आकुर्डी या मार्गावर ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची हजारोंच्या संख्येने दुतर्फा गर्दी जमली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेने या स्पर्धेच्या अनुषंगाने जय्यत तयारी करीत शहरातील प्रमुख मार्गांसह तसेच चौकांमध्ये ठिकठिकाणी फुलांची आकर्षक सजावट केली होती. ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला आज प्रचंड उत्साहात सुरुवात झाली.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स या संस्थेने पीथमपुर येथील “एसएई इंडिया ई – बाहा २०२६” या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिचर्स च्या (पीसीसीओईआर) मेकॅनिकल विभागातील “टीम नॅशोर्न्स” ने दैदीप्यमान कामगिरी करीत एकूण ११ पदकांसह तीन लाख साठ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत देशभरातून शंभरपेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी भाग घेतला होता. पीसीसीओईआर च्या टीम नॅशोर्न्स ने टिकाऊपणा, उत्कृष्टतता, समग्र भौतिक गतिमान, निलंबन व संकर्षण अशा विविध विभागात प्रथम क्रमांक आणि स्टॅटिक, बौद्धिक, सीएइ या विभागांमध्ये तृतीय क्रमांक तसेच सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवकपदासाठी हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी प्रचार व संघटनात्मक काम करणारे तसेच पराभूत झालेले इच्छुक नेते या पदासाठी प्रयत्नशील झाले आहेत. महापालिकेतील नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या पाचवरून वाढवून दहा करण्यात आल्याने संधी वाढली असली तरी स्पर्धा मात्र तीव्र झाली आहे. नगरसेवकांच्या पक्षीय संख्याबळानुसार भाजपचे सात, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तीन नामनिर्देशित नगरसेवक नियुक्त होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून, या पदासाठी जोरदार लॉबिंग आणि रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चार वर्षांची प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात येत असून, पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हाती कारभार जाणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौरपदाची निवड होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर गेली चार वर्षे बंद असलेली पदाधिकाऱ्यांची दालने उघडण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाने दालने व महासभा सभागृहाची स्वच्छता, दुरुस्ती आणि सज्जतेची कामे वेगाने सुरू केली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने १२८ पैकी ८४ जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समिती सभापती तसेच शिक्षण, विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा विषय समित्यांच्या सभापतीपदावर भाजपच्या नगरसेवकांची नियुक्ती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘पुणे ग्रॅंड टूर’ ही आंतराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान पुण्यात होत आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा मंगळवारी (ता. २०) पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण हद्दीत पार पडणार आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत वाहतूकीमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतची तात्पुरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पर्धेच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. हिंजवडी, देहूरोड, निगडी व वाकड वाहतूक विभागातील अनेक प्रमुख चौक व रस्त्यांवरुन वाहतूक वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त पंकज पाटील, ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये योगसाधना, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य तसेच शिस्तबद्ध जीवनशैलीचा संस्कार रुजवणे या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील व खासगी शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत,…
शहरातील लोकसंख्येच्या अनुषंगाने १० प्रभाग कार्यालयांची आवश्यकता पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून ”गुड गव्हर्नन्स” संसद ते ग्रामपंचायत राबविले जात आहे. याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सेवा सुविधांचा तात्काळ लाभ मिळावा. तक्रारींचे जागीच निराकरण व्हावे आणि दैनंदिन जीवन सुखकर व्हावे यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. त्यामुळे शहरातील क्षेत्रीय कार्यालयांची संख्या ८ वरून १० करावी अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये आमदार शंकर जगताप यांनी म्हटले आहे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शहराचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. भारतीय जनता पक्षाने १२८ पैकी ८५ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली असून, महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, महापौरपद कोणत्या संवर्गासाठी आरक्षित राहणार, याचा निर्णय गुरुवारी (ता. २२) सकाळी होणार आहे. महापौरपदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील मंत्रालयाच्या परिषद सभागृहात काढली जाणार आहे. राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्याने, सर्व महापालिकांसाठी एकत्रितपणे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी कोणता संवर्ग आणि महिला की खुला आरक्षण लागू होणार, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड…
