- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
अयोध्या, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाली. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्रीराम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यानंतर नरेंद्र मोदींनी उपस्थित साधू संत आणि निमंत्रित मान्यवरांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. राम वाद नाही, उपाय आहे यावेळी पीएम मोदी म्हणाले , राम मंदिराने प्रत्येकासाठी उज्ज्वल भविष्याची प्रेरणा दिलीय. राम वाद नाही, राम उपाय आहे, राम वर्तमान नाही, राम शाश्वत आहेत. राम सर्वव्यापी आहेत. आज अयोध्येत केवळ श्रीरामाच्या मूर्तीचेच अभिषेक झाला नाही, तर श्रीरामाच्या रुपातील भारतीय संस्कृतीवरील अतूट श्रद्धेचाही अभिषेक…
– हिंदूत्त्ववादी आमदार महेश लांडगे यांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ सोहळा – भगव्या पताका, वांद्यांचा निनाद अन् प्रचंड उत्साहात मिरवणूक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अत्यंत भक्तीमय… भगवामय… आणि मंगलमय वातावरण… फुलांचा वर्षाव अन् ढोल-ताशांच्या निनादामध्ये चौका-चौका होणारे स्वागत… फटाक्यांचे तुफान आतिषबाजी आणि ‘जय सियाराम’ चा गगणभेदी नारा… अशा उत्साहाच्या आणि भक्ती-भावाच्या वातावरणात तब्बल ५ लाख हून अधिक पिंपरी-चिंचवडकर रामभक्तांनी सहभागी होत महाराष्ट्रातील सर्वात मोठी रथयात्रा यशस्वी केली. राम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी भव्य ‘रथयात्रा’ आयोजित केली होती. त्याला रामभक्त, हिंदू बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला. देशाचे पंतप्रधान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग) – ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ हे आमचे हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम असले पाहिजे. जातपात धर्म न बघता समाजकारण समाजसेवा हे आमचे हिंदुत्व आहे. औरंगाबादच नाव आपण छत्रपती संभाजीनगर केलं पण दंगली होऊ दिल्या नाहीत कारण आपण सर्वांना सोबत घेतलं आणि तो निर्णय घेतला ह्यालाच आपण हिंदुत्व आपण बोलत असतो, असे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. “हृदयात राम आणि हाताला काम” हे आपलं हिंदुत्व असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाची महान्याय सभा पिंपरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य संघटक एकनाथ पवार, मावळ लाेकसभा मतदार संघाचे…
खेड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी'” हे ब्रीदवाक्य घेऊन जीवनाच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान असलेली राष्ट्रीय सेवा योजना हाच खरं समाजसेवेसाठी विद्यार्थ्यांना घडविण्याच्या उपक्रम आहे, “” असे उद्गार भगवान महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर कोहिनकरवाडी तालुका. खेड येथे आयोजित करण्यात आले असून सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माझ्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचा मोठा वाटा आहे. मी स्वयंसेवक म्हणून काम करीत असताना मला वेगवेगळे अनुभव घेता आले. जीवन जगण्याचे खरे कौशल्य मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शिकलो.…
कासारवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जैन समाजातील जेष्ठ साध्वी प पू किरणप्रभाजी म सा यांच्या ९४ व्या जन्मदिनानिमित्त कासारवाडी जैन स्थानकामध्ये त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना उपप्रवर्तिनी प पू सुमनप्रभाजी म सा म्हणाल्या ” साध्वी रत्ना प पू किरणप्रभाजी म सा एक आदर्श साध्वी होत्या .त्यांचे संपुर्ण जीवनामध्ये सरलता, समता ,संयम ,करुणा आणि साधना या मुल्यांचा संगम होता , त्यांचे जीवन या मुद्यांशी ओतप्रोत भरले होते .आपल्या भक्तांवर त्यांचा भरभरून कृपाशीर्वाद होता . त्यांच्या जीवनावर आचार्य आनंदॠषिजी यांच्या जीवन मुल्यांचा प्रभाव होता . भक्तांसाठी त्यांचे स्थान देवता स्वरूप होते!”” या वेळी कासारवाडी संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, आणि पार्श्वनाथ युवक…
प्रभू श्रीरामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे – बी. के. डॉ. सुवर्णा पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चंद्राच्या प्रतिमेप्रमाणे शांत आणि शीतल व्यक्तिमत्त्वाच्या श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी अयोध्या येथे होत आहे. त्यामुळे जगभर सर्वत्र उत्साही, आनंदी वातावरण आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे संयम, नियम पाळणारे होते. आई-वडिलांचे आज्ञाधारक आणि प्रामाणिकपणा ही त्यांची विशेषता आहे. अहिल्याचा उद्धार करून तिला मुक्त केले, शबरीची बोरं खाऊन तिचा आदर केला अशा प्रभू श्रीरामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे प्रजाप्रीता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय बाणेर येथील सेंटरच्या बी. के. डॉ. सुवर्णा यांनी सांगितले. सोमवारी अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिरात श्री राम लल्ला…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रिडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय रोड सायकलिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी रजन महाजन याने प्रथम क्रमांक मिळवला. ही स्पर्धा अहमदनगर येथे झाली. रजन महाजन याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्राचार्य संदीप पाटील, क्रिडा शिक्षक प्रदीप कासार हे मार्गदर्शक होते. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी रजन महाजनचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशन तर्फे पिंपरी न्यायालयात मकर संक्रात निमित्त हळदी कुंकू तसेच तीळ गुळ व डायरी वाटप कार्यक्रम संपन्न झाला. पिंपरी न्यायलयात वकील पुरूष बार रूम मध्ये मकर संक्रात निमित्त महिलांसाठी हळदीकुंकूवाचा वान लुटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमातून विचाराची देवाण घेवाण करण्यासाठी भारतीय मौलिक संस्कृतीची परंपरा जोपासण्यासाठी महिला विचाराला चालना देण्यासाठी मनसोक्त आनंद लुटण्यासठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. न्यायाधीश फटाले साहेब, मा. न्यायाधीश आवळे साहेब, नाझार शेख साहेब यांनी सहभाग नोंदवला व महिला वर्गाशी मनसोक्तपणे संवाद साधला तसेच तुम्ही महिलांना वाव देता हि खुप…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथे लवकरच नवीन न्यायसंकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी दिली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देताना ॲड. रामराजे भोसले म्हणाले की, “पुणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे पोक्सो (POCSO ) न्यायालयाच्या इमारतीचा कोनशिला, तसेच भूमिपूजन समारंभ आज रविवार, दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांच्या हस्ते तसेच माननीय न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती डॉ. आरिफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने मोरवाडी येथील न्यायालयामध्ये दोन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दोन दिवाणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप आणि पिंपरी-चिंचवड शहर संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या वतीने चिंचवड, केशवनगर येथे सामूहिक श्री रामरक्षा स्त्रोत पठण घेण्यात आले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील शेकडो रामभक्तांनी व विद्यार्थ्यांनी सामूहिक रामरक्षा स्त्रोत पठण केले. या धार्मिक सोहळ्यात रामभक्तांनी श्रद्धापूर्वक व आत्यंतिक उत्साहाने भाग घेतला. त्यामुळे सगळीकडे रामनामाची चैतन्य गंगा वाहत होती. चिंचवडगाव, केशवनगर येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडांगण येथे हा उपक्रम पार पडला. या सोहळ्याला प्रसिद्ध निवेदक व अभिनेते राहुल सोलापूरकर, पद्मश्री गिरीश प्रभुणे, भाजपचे शहराध्यक्ष…
