साध्वीरत्ना. प पू किरणप्रभाजी यांचे जीवन म्हणजे सरलता, समता, संयम,साधना आणि करूणा या मुल्यांचा संगम – प पू सुमनप्रभाजी
कासारवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जैन समाजातील जेष्ठ साध्वी प पू किरणप्रभाजी म सा यांच्या ९४ व्या जन्मदिनानिमित्त कासारवाडी जैन स्थानकामध्ये त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना उपप्रवर्तिनी प पू सुमनप्रभाजी म सा म्हणाल्या ” साध्वी रत्ना प पू किरणप्रभाजी म सा एक आदर्श साध्वी होत्या .त्यांचे संपुर्ण जीवनामध्ये सरलता, समता ,संयम ,करुणा आणि साधना या मुल्यांचा संगम होता , त्यांचे जीवन या मुद्यांशी ओतप्रोत भरले होते .आपल्या भक्तांवर त्यांचा भरभरून कृपाशीर्वाद होता . त्यांच्या जीवनावर आचार्य आनंदॠषिजी यांच्या जीवन मुल्यांचा प्रभाव होता .
भक्तांसाठी त्यांचे स्थान देवता स्वरूप होते!”” या वेळी कासारवाडी संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, आणि पार्श्वनाथ युवक मंडळाने भक्ती गीताच्या माध्यमातून श्रध्दा सुमनांजली अर्पण केली तसेच प पु स्वर्णश्रीजी म सा , डॉ अशोककुमार पगारिया, संदीप फुलफगर, विलास कुमार पगारिया यांनी ही आपले मनोगत व्यक्त करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. कासारवाडी मधील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .यावेळी दीक्षार्थी भगिनी कु अंकिता सुमतिलाल लुनिया हिचा सन्मान सुशील बहु मंडळाच्या वतीने करण्यात आला.