- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मकर संक्रांत सणानिमित्त यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने येरवडा येथे पुण्यातील एकल महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात पती नसलेल्या महिलांना वेगळी वागणूक दिली जाते, हळदीकुंकूचा मान नाकारला जातो आणि सण-समारंभात त्यांना डावलले जाते—या मानसिकतेला बदल देण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हळदीकुंकू कार्यक्रमात एकल महिलांनाही सन्मानपूर्वक सहभागी करून घेऊन, त्यांनीही आनंदाने नटून-थटून सण साजरा करावा, त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, हा सकारात्मक बदल समाजात घडवण्यासाठी ‘तुम्ही पण करा’ असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेच्या आधारस्तंभ वृंदादीदी भंडारी, समाजसेविका सविता शेलार, वनिता हजारे, रूपाली मॅडम वाघ, डॉ. पुनम…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रावेत येथे पिंपरी चिंचवड श्री वैश सुतार पुणे चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सृष्टीचा सर्जनहार प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री अंकित व सौ खुशबू वाजा, श्री सागर व सौ तेजल सुद्रा , श्री अग्नीक व सौ मीरा काटेलिया , यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे विधीपूर्वक पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यावेळी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील वैश्य सुतार समाजाचे बांधव मोठया संख्येने उपस्थित होते . जयंतीचे नियोजन व संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांनी केले .जयंती निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . लालजी चुडासमा, प्रवीण वाढीया…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये १९२४ मध्ये मिलिटरी इंजीनियरिंग सर्व्हिस (एमईएस) या केंद्र सरकारच्या संस्थेची स्थापना झाली. या नंतर दोन वर्षांनी १९२६ मध्ये एमईएस एम्प्लॉईज को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची स्थापना झाली. एमईएसच्या निवडक कामगारांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही संस्था सुमारे १० हजार पेक्षा जास्त सभासदांना एकत्र करून सलग १०० वर्षे सुलभ पद्धतीने कर्ज वितरण देऊन सेवा देत आहे हे एमईएस साठी खूप गौरवशाली आहे. या सोसायटीने सीबीएस ही अत्याधुनिक संगणक प्रणाली सुरू केली आहे. यामुळे आणखी कार्यक्षमता वाढून उत्तम सेवा सभासदांना मिळेल असा विश्वास मेजर जनरल, मुख्य अभियंता दक्षिण कमांड सुधीर ठाकूर…
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने अजित दादा पवार यांना श्रद्धांजली पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या एमआयडीसी मधील लघुउद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम सकारात्मक भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेत असत. येथील विज, पाणी, रस्ते, वाहतूक समस्या, मिळकत कर, संघटनेला जागा देणे, लघु उद्योजकांचे पुनर्वसन करणे अशा अनेक प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कायम तत्परता दाखवून सकारात्मक भूमिका घेऊन वेळोवेळी प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांचे २८ फेब्रुवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या स्मृती लघु उद्योजकांनी कायम जतन कराव्यात आणि पुढील पिढीस मार्गदर्शक ठराव्यात यासाठी पिंपरी चिंचवड एमआयडीसी परिसरात स्व. अजित दादा पवार यांचे स्मारक उभारावे यासाठी आपण पिंपरी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन केले. देव हा दगडाच्या मूर्तीत नसून गोरगरीब, रंजल्या-गांजल्यांना मदत करण्यात आहे, हा मानवतावादी संदेश त्यांनी दिला. “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” या अभंगातून त्यांनी सामाजिक समतेचा आणि माणुसकीचा विचार मांडला, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाच्या शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ४१८ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने वल्लभनगर येथील संत तुकाराम महाराज पुतळा मंदिर परिसरात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…
सांगवी आणि औंध उरो रुग्णालयाच्या परिसरात २० लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याच्या टाकीबाबत आग्रही भूमिका शहरातील टपरी, पथारी व्यवसायिकांना तात्काळ “हॉकर्स झोन” उपलब्ध करून द्या – आमदार जगताप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी, सांगवी, पिंपळेगुरवमध्ये सुरळीत, स्वच्छ आणि व्यवस्थित पाणीपुरवठा होण्यासाठी या परिसरात २० लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्याबाबतच्या सूचना आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिल्या आहे. किवळे, रावेत, मामुर्डी आणि पुनावळ्यातील आरक्षणे ताब्यात घेऊन रस्त्यांसह ”पब्लिक अमेनिटीज” विकसित करणे. शहरातील 17 हजाराहून जास्त नोंद असलेल्या टपरी, पथारी व्यवसायिकांना हॉकर्स झोन तात्काळ उपलब्ध करून द्यावे असे देखील आमदार जगताप यांनी सांगितले आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – किवळे येथील माई बालभवन संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अंध व अनाथ मुला-मुलींच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी घेत त्यांना शिक्षण, रोजगार तसेच विवाह व्यवस्थेच्या माध्यमातून स्वावलंबी जीवनाची दिशा देत आहे. या संस्थेमार्फत अंध अनाथ मुला-मुलींचे केवळ बालपणच नव्हे, तर त्यांचे भविष्यातील आयुष्य सुरक्षित व सन्मानपूर्वक घडावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. माई बालभवन संस्थेच्या वतीने नुकताच किवळे येथे दोन अंध निराधार मुलींचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी विविध स्वरूपाचा खर्च अपेक्षित असल्याने संस्थेने सामाजिक जाणिवेतून कार्य करणाऱ्या ‘वुई टुगेदर फाउंडेशन’कडे मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे…
प्रभाग २८ मध्ये मॅरेथॉन आढावा बैठक — पालिका अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर–रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन बैठक व प्रत्यक्ष पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तिन्ही नगरसेवक ॲक्शन मोडमध्ये असून, विकासकामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला. या आढावा बैठकीदरम्यान काही विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत नगरसेवक शत्रुघ्न काटे समवेत दोन्ही नगरसेविका यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरले.कामांचा दर्जा, विलंबाची कारणे व अपूर्ण कामांबाबत स्पष्टीकरण मागून,पुढील कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. प्रभागातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरासाठी भाजपच्या वतीने महापौरपदासाठी रवी लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापौर म्हणून रवी लांडगे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या सभागृहातून शहरासाठी सर्वंकष विकासाचे निर्णय होतील आणि शहराच्या प्रगतीची घोडदौड कायम राखली जाईल असा विश्वास निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्युत वाहने, नवीकरणीय ऊर्जा, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मोबिलिटी, क्वांटम तंत्रज्ञान व अनुप्रयुक्त संशोधन या क्षेत्रांमध्ये भारत जर्मनी सहकार्य झाले, तर ऊर्जा संक्रमण व प्रगत मोबिलिटी सोल्यूशन्समध्ये जर्मनीकडे असलेले जागतिक कौशल्य भारतीय संशोधकांना संयुक्त संशोधनासाठी उपयोगी ठरेल. यातून व्यापक सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील असा विश्वास जर्मनीतील कार्लस्रुहे शहराचे महापौर डॉ. फ्रँक मेंट्रुप यांनी व्यक्त केला. तसेच १९९० पासून पीसीईटीने उच्च शिक्षण आणि संशोधन, रोजगार यासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) कार्यालय आणि साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू), पुणे येथे जर्मनीतील कार्लस्रुहे शहराचे महापौर डॉ. फ्रँक मेंट्रुप यांच्यासह उच्चस्तरीय…
