चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रावेत येथे पिंपरी चिंचवड श्री वैश सुतार पुणे चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सृष्टीचा सर्जनहार प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री अंकित व सौ खुशबू वाजा, श्री सागर व सौ तेजल सुद्रा , श्री अग्नीक व सौ मीरा काटेलिया , यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे विधीपूर्वक पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले.
यावेळी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील वैश्य सुतार समाजाचे बांधव मोठया संख्येने उपस्थित होते . जयंतीचे नियोजन व संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांनी केले .जयंती निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . लालजी चुडासमा, प्रवीण वाढीया , सुधीर वाजा, रमेश पडियाळ ,प्रतीक सुद्रा ,बाबू गोढानिया , जया वाढीया , भानू चूडासमा, वैशाली गोढानिया, भूमी सुद्रा , भारती वाढीया, हर्षा वाजा, उपस्थित होते. श्री विश्वकर्मा जयंती निमित्त भक्ती गीत, अन्नदान , रास गरबा , विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

















