Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मोहननगर चिंचवड येथे चार महिला बचत गटांनी एकत्र येऊन हळदी कुंकू कार्यक्रम केला. सदर बचत गटाच्या कार्यक्रमांमध्ये श्रीमती मंदा फड व माजी नगरसेविका मीनल यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सौ.खजिनदार व सौ.कर्पे यांनी सर्वांच्या वतीने आभार मानले. सदर कार्यक्रमांमध्ये श्रीमती.मंदा फड यांनी बचत गट सुरुवात केल्यापासून चा पूर्ण इतिहास सर्वांसमोर ठेवला तसेच बचत गटातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर थोडे थोडे करून आतापर्यंत जमा झालेल्या ७० ते ८० हजार रुपये प्रत्येक सदस्याच्या खात्यात आहेत तसेच बचत गटामार्फत बचत गटातील सदस्यांना देण्यात येणाऱ्या कर्ज यातून सभासदांच्या अडचणीच्या वेळी झालेली मदत, काही नवीन खरेदी, घरातील काही कार्यक्रमांमध्ये…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा शहराध्यक्ष  शंकर जगताप यांच्या वतीने नवी सांगवी समर्थ नगर परिसरातील पैलवान सुमित अरविंद भोसले(आंतरराष्ट्रीय खेळाडू ) यांना सांगवी रहाटणी मंडल भाजपा उपाध्यक्ष ललित म्हसेकर मित्र परिवार यांच्या हस्ते सन्मानित केले. यावेळी समर्थ नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक भास्कर बागुल , सागर दळवी, शैलेश कड, संतोष महेश्वरी, दिवाकर स्वामी आदी उपस्थित होते. माहिती खालील प्रमाणे पैलवान सुमित_अरविंद_भोसले (आंतरराष्ट्रीय खेळाडू )तेलंगणा, हैद्राबाद येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे सुरु असलेल्या SENIOR NATIONAL WRESTLING CHAMPIONSHIP 2024 या कुस्ती स्पर्धेत आज सुमितनी 74 किलो वजनी गटात सुवर्णपदकं मिळवले आहे,भारतात पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवला आहे.पै.सुमित याची इराण येथे…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा समाजाला खूप उपयोग होतो. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू!” असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले; तर “ज्येष्ठांनी स्वतःसाठी वेळ काढावा; कारण आजच्या धकाधकीच्या काळात घरीदारी ज्येष्ठांना आजी – आजोबांची भूमिका पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांनी विरंगुळा केंद्रात मन रमवावे!” असे आवाहन विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी  चिंचवड येथे केले. आमदार अण्णा बनसोडे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, राजाभाऊ गोलांडे, ॲड. संदीप चिंचवडे, अजित गव्हाणे, सचिन वाल्हेकर, विक्रांत लांडे, शैला मोळक, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, उपाध्यक्ष अशोक नागणे,…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मला मिळेल असे कधीही वाटले नव्हते, सर्व सन्मान एकीकडे आणि हा पुरस्कार एकीकडे एवढे या पुरस्काराचे माझ्यासाठी महत्व आहे. अशी भावना प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार शान उर्फ शांतनू मुखर्जी यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, सिध्दीविनायक ग्रुप पुरस्कृत २०वा ‘आशा भोसले पुरस्कार २०२४’ प्रसिद्ध पार्श्वगायक शान ( शांतनू मुखर्जी) यांना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला. एक लाख अकरा हजार रुपये, शाल…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखा आणि गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली आयोजित ३१वा राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सव गुरुवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता गणेश इंटरनॅशनल स्कूल, थरमॅक्स चौक ते चिखली रस्ता, नेवाळे वस्ती, चिखली येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे अध्यक्षस्थान भूषविणार असून ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. सासवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “कवीचे अंतरंग अथांग असते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काळेवाडी येथे व्यक्त केले. ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित ‘अंतरीच्या खोल डोही’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. विधानपरिषद आमदार उमा खापरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, कवयित्री शोभा जोशी, प्रा. डॉ. धनंजय भिसे आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. कवयित्री प्रज्ञा घोडके प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रकाशनाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. सविता इंगळे यांनी त्यांचे मनोगत वाचून दाखवले. त्यामध्ये, “‘अंतरीच्या खोल डोही’ हा माझा प्रकाशित झालेला सहावा कवितासंग्रह असला तरी अजूनही मी काव्यशारदेच्या दरबारातील विद्यार्थी…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. तेव्हापासून अयोध्येत रामभक्तांची रीघ लागली आहे. शनिवारी (दि. १०) भाजपाच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ४०० रामभक्तांना घेऊन रेल्वे अयोध्येकडे रवाना करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड ते लोणावळापर्यंत ‘राममय’ झाले होते. ‘प्रभू श्री राम की जय’, ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत  चिंचवड मतदारसंघातील नागरिक रेल्वेद्वारे अयोध्येला रवाना झाले. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर रामभक्त अयोध्येकडे मार्गस्थ झाले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “देशात मोदी सरकार आल्यामुळेच राम मंदिराचे स्वप्न साकार झाले. २००८ आणि २०११ साली प्रभू श्रीराम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी ४ फेब्रुवारीपासून शहरात “घर चलो अभियान” राबविण्यात येत असून, या अभियानाला पिंपरी चिंचवड शहरवासियांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात हे यशस्वी आभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव व महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे त्यांच्याकडील वारियर्स म्हणून सोपविलेले चिंचवड मधील काकडे पार्क,केशवनगर, राज पार्क,काकडे टाऊन शिप, पोदार शाळा आदी भागातील बूथ क्रमांक 139,140,141 , बूथ वरील नागरिकांशी संवाद साधला.दोन दिवसात केशवनगर,विवेक वसाहत,राजपार्क, काकडे टाऊन…

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आळंदीत बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे कार्य जोग महाराज संस्थांपित वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे आळंदीत येथील संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकां पर्यंत दिला जातो.संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत देण्याचे कार्य केले जाते. सर्व प्रकारच्या वेदांना मुठमाती देत ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम,अमंगळ’ हा ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार या संस्थेने दिला आहे. संस्थेला १०० वर्षांची परंपरा असून ती वृद्धींगत…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  उत्तरप्रदेश मध्ये शिवाजी महाराज यांचे लष्कर सामर्थ्यावर भव्य संग्रहालय निर्माण कार्य होत असल्याचे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथजी यांनी येथे सांगितले. आळंदी येथे प पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रविवारी ( दि.११ ) उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे आळंदी मध्ये आगमन झाले होते. त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले.व पूजन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी सिद्धेश्वर मंदिरात सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. तत्पूर्वी माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप,…

Read More