- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखा, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रतिभा शैक्षणिक संकुल – चिंचवड यांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या एकदिवसीय शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनाला विद्यार्थी, अध्यापक, प्राध्यापक, साहित्यिक आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रतिभा महाविद्यालय सभागृह, मुंबई – पुणे हमरस्ता, काळभोरनगर, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या अध्यक्षतेखाली एकूण आठ सत्रांमध्ये संमेलन संपन्न झाले. उद्घाटन सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. रवींद्र बेडकिहाळ, प्रा.…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘तेरे मेरे मिलन की ये रैना…’ या सुमधुर जुन्या नव्या मराठी आणि हिंदी गाण्यांच्या विनाशुल्क मैफलीत रसिक मंत्रमुग्ध झाले. आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर मिनी सभागृहात शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या दृकश्राव्य कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, अंध संघटना कार्यकर्ते संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू भिंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती; तसेच सर्व वयोगटातील रसिकांनी या मैफलीचा मनमुराद आनंद लुटला. जुन्या पिढीतील हिंदी चित्रपट अभिनेता बलराज सहानी ते मराठीतील विनोदवीर भाऊ कदम यांनी पडद्यावर साकारलेली, महंमद रफी, लता…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पाच वर्षानंतर निवडणुका होतील की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं ही लोकसभा निर्णायक ठरणार आहे. लोकशाही संपविण्याचा, संविधान मोडीत काढण्याचा डाव या सरकारचा आहे. २०२३ मध्ये एक पक्ष फोडला, मग एक कुटुंब फोडलं. आता २०२४ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पाडली जात आहे.मावळ लोकसभेतून गद्दार लढतील का? याची अद्याप खात्री नाही, असे मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. आदित्य ठाकरे आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन आहेर, मावळ…
पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सायकल प्रेमी नागरिकांना 447 सायकलींचे माफक दरात वाटप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पूर्वी पुणे(पिं.चिं) शहर हे सायकल चे शहर म्हणून ओळखल जात होते. त्या नंतर काळ बदलत गेला मोटार सायकल आल्या तसा तसा पर्यावरणाचा ही समतोल ही बिगडत गेला.आज पुन्हा आपल्याला पर्यावरणाचा समतोल तसेच आपले आरोग्य(फिटनेस)ही सांभाळता येइल आशा साठी आपण पुन्हा एकदा सायकल हा पर्याय निवडावा. असे अमित गोरखे यांनी पिं.चि शहरातील नागरिकांना आवाहन केले.आज संपुर्ण पिं.चिं शहरातील नागरिकांना अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नातून अत्यंत माफक दरात सायकल उपलब्ध करुन देण्यात आल्या.या वेळी पहिल्या टप्यात 447 सायकल चे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या…
तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थितीने उपस्थित भारावले ! ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’: तिसऱ्या दिवशी मार्गदर्शन सत्रे,सादरीकरणांचे होणार आयोजन* मोशी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रसामग्री निर्मितीचे प्रतिबिंब असलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ मधे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२४,२५ फेब्रुवारी रोजी विदयार्थी , नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.पहिल्या दिवशी शनिवारी ६९ हजार,रविवारी महाप्रदर्शनात २ लाखाहून अधिक विद्यार्थी,नागरिकांनी भेट देऊन लष्करी शस्त्र सामग्री आणि तंत्रज्ञान प्रणालींची माहिती करून घेतली.प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी दररोज एक याप्रमाणे तिन्ही भारतीय सैन्यदलाचे प्रमुख तसेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ भेट देत आहेत. त्यांच्या भेटी आणि संवादामुळे विद्यार्थी आणि उपस्थित नागरिक भारावून गेले .चीफ ऑफ डिफेन्स…
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात कौशल्य विकास कार्यशाळेचा समारोप पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सहाय्यक कर्मचारी हा कुठल्याही संस्थेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असतो. हे कर्मचारी खऱ्या अर्थाने संस्थेचा गाडा हाकत असतात. असे असले तरी या कर्मचाऱ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत, व त्यासाठी कायम शिकत राहण्याची वृत्ती त्यांनी अंगी जोपासायला हवी. कारण शिकत राहिल्यास आयुष्यात प्रत्येकाचा उत्कर्ष नक्की होतो, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे सहाय्यक कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित व दोन महिने चाललेल्या कौशल्य विकास कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ. अनंत…
दुष्काळी उपाययोजना राबविताना सामाजिक सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्यावे छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पुढील कालावधीत अधिक तीव्र होत जाणार आहे. या कालावधीत शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. या उपाययोजना राबविताना त्यात मदत पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे छ संभाजी नगर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, जिल्हा…
सावरकर आत्मार्पण दिन सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा उपक्रम निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी महराज की जय’ आणि ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा विजय असो’ अशा घोषणांनी निगडी परिसर दणाणून गेला. निमित्त होते स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताहाच्या प्रारंभ दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर समाजिक संस्थेतर्फे आयोजित सावरकर दौडचे! निगडीतील भक्ती-शक्ती उद्यान येथे सकाळी 8 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर रचित छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सामूहिकरित्या म्हणण्यात आली. शंखनाद करण्यात आला. मशाली प्रज्वलीत करून सावरकर दौडला प्रारंभ झाला. या वेळी सावरकर घराण्याचे वंशज असिलता सावरकर-राजे, सात्यकी सावरकर, भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवारी(दि. २६ फेब्रुवारी) सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पैशामुळे जीवन श्रीमंत होते; पण या श्रीमंतीमध्ये समाधान असेलच असे नाही. मात्र साहित्यामुळे जीवन समृद्ध होते आणि साहित्य हे चिरंतन समाधान देते!” असे विचार प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखा, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रतिभा शैक्षणिक संकुल – चिंचवड यांच्या सहकार्याने शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. दीपक शहा बोलत होते. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासगार हे उदघाटक म्हणून तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे…
