- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांची सुरू असलेली पदयात्रा बुधवारी रात्री दहा वाजता पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत एक मराठा, लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण या घाेषणेने परिसर दुमदुमून गेला. दुपारी बारा वाजता नियोजित असलेली पदयात्रा रात्री दहा वाजता शहरात दाखल होऊनही लोकांमधील उत्साह कायम होता. दरम्यान, पदयात्रेमुळे सकाळपासून शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना जेवण देण्यात आले. भक्ती-शक्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याला जरांगे यांनी अभिवादन केले. चौकात मराठा बांधवांनी मोठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड.संदीप चिंचवडे यांची निवड करण्यात आली.त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘’जल्लोष शिक्षणाचा २०२४’’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा जल्लोष आकाशाला भिडलेला पाहायला मिळाला. विद्यार्थी तसेच शिक्षकांनी या कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला तसेच विविध उपक्रमांमध्ये विक्रमी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच महापालिका शाळा आणि शिक्षकांचे यश साजरे करण्यासाठी महापालिकेच्या वतीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २३ व २४ जानेवारी २०२४ रोजी जल्लोष शिक्षणाचा २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शक्ती नृत्याच्या सादरीकरणाने सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरूवात झाली. त्यानंतर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध लोककलांचे सादरीकरण केले. ज्यामध्ये देशातील विविध राज्यांमधील पारंपारिक नृत्यांचा समावेश होता. तसेच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ संपन्न होणार आहे. ध्वजारोहण समारंभापुर्वी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे. यावेळी महापालिका सुरक्षा रक्षक दल, अग्निशमन दल, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे जवान ध्वजसंचालन करणार आहेत. या सोहळ्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांड़गे, अश्विनी जगताप यांच्यासह सर्व माजी महापौर, माजी खासदार आमदार, माजी…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- प्रभू श्रीराम अयोध्येला आल्यावर कशा प्रकारे आनंदोत्सव साजरा होत होता ते आपण रामायणात, चित्रपटांत, कथांमध्ये पाहायचो. तोच आनंदोत्सव अनुभवण्याची संधी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारीला दिली, असे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम आंनद सोहळा गीत रामायण या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा महामंत्री संजय उपाध्याय, गायक निनाद आजगावकर, मुंबई भाजपा सचिव जितेन्द्र राऊत, दक्षिण मध्य जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश शिरवडकर, माहीम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर, यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, श्रीराम आंनद सोहळा हे…
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटामाटात साजरे पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे शिक्षकच करीत असतात. एक शिक्षक उद्याची पिढी घडवतो. स्वतःला प्रामाणिक ठेवण्यासाठी त्यांची ती धडपड दिशादर्शक ठरते. विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाचे धडे गिरविताना आपल्या गुरुजनांशी प्रामाणिकपणे वागावे. आजही गुरु-शिष्य परंपरा प्रामाणिकपणाच्या धाग्यावरच टिकून आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम चॅलेंजर पब्लिक स्कूल हे नेहमीच करत असते. त्यामुळेच शाळेच्या नावाची पताका डौलात सर्वत्र फडकत आहे. शाळेचे हे वार्षिक स्नेहसंमेलन केवळ नाट्य,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मॉर्डन शिशु मंदिर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि दुर्गा ब्रिगेड संघटना यांची संयुक्त श्रीराम प्रतिष्ठापना निमित्त रथयात्रा संपन्न झाली इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय अभय भोर यांनी आयोजन केले . रथयात्रेत मॉर्डन शाळा समिती अध्यक्ष नंदकिशोर एकबोटे यांच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व समिती सदस्य उपस्थित होते जंगली महाराज रोड येथे शिवाजीनगर गावठाण परिसरामध्ये लहान मुलांनी प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाईचा श्री हनुमान वेशभूषा परिधान करून रथयात्रा संपन्न झाली विविध वेशभूषा करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेतील बाल विद्यार्थी दुर्गा ब्रिगेड कार्यकर्त्या अनेक पालक व अनेक नागरिकांचा सहभाग होता यावेळी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे कु.…
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू तिळगुळ वाण व भेटवस्तू देऊन साजरी करण्यात आली.यावर्षी त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्ष वृषाली मरळ होत्या.तर प्रमुख पाहुण्या स्वाती कलाटे होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमात समूह दीप नृत्य, अनेकविध गीतगायन,कथाकथन, कोडे,विनोद सादरीकरण,आत्मकथन,सायानी पत्र वाचन असे रंगारंग कार्यक्रम तर होतेच त्याशिवाय आजी आजोबांच्या नातवांच्या कला गुण यांना वाव देत त्यांचे देखील वाव देण्याचे ठरवल्याने कुमार सिद्धार्थ याने पियानोवर आपली कला सादर केली. सदर कार्यक्रमात बोरकर,श्री व सौ निकुंभ, श्रीमती विजया चौधरी,सौ बऱ्हाटे,सौ बोंडे,सौ. कानडे,श्री जाजू,श्री भेरकर,श्री बेलोकर,श्री…
पिंपळे सौदागर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्ताने शत्रुघ्न काटे यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन,गोविंद यशदा चौक याठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा “भव्य सामूहिक महाआरती” सोहळ्याचे अतिउत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि “जय श्रीराम” यांच्या नावाने संपूर्ण भारतीयाच्या मुखात हा एकच जयघोष गुंजला. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर याठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा “भव्य सामूहिक महाआरती” सोहळ्याला परिसरातील रामभक्तांनी उत्सवासारखे साजरे केले.अयोध्येत राम…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगळी वेगळी राम भक्ती म्हणून चिंचवडमध्ये प्रथमच भव्य रांगोळीच्या माध्यमातून प्रभू श्री रामांची प्रतिकृती साकारली होती. चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी जगताप,भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या हस्ते या रांगोळीतून साकारलेल्या श्रीराम प्रतिकृतीचे उदघाटन करण्यात आले.या वेळी अनेक माजी नगरसेवक ,आदी उपस्थित होते. ‘क’ कॅलिग्राफी संस्थेच्या माध्यमातून व अनेक रामभक्तांच्या सहयोगाने कै. मुरलीधर माचुत्रे व्यायाम शाळा जुन्या तालेरा हॉस्पिटल जवळ, पोदार शाळा रोड काकडे पार्क, चिंचवडमध्ये 50×20 फूट अश्या मोठ्या स्वरूपात सर्वांना दि. 21 व 22 जानेवारी रविवारी आणि सोमवारी* सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवली होती. उदघाटन प्रसंगी अयोजक शरद कुंजीर ‘क’ कॅलिग्राफी…
