- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे आळंदी या पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीगुरू निवृत्तींनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा व श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ति प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिना निमित्त अखंड हरिनाम सोहळा ६ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थांन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर , खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. सोहळ्याचे काळात श्रींची महापूजा, काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा पारायण , महिला भजनी मंडळाची भजने ,हरिपाठ, हरिकीर्तन व हरी जागर असे कार्यक्रम होणार आहेत.…
पूज्य स्वामी राजेंद्रदासजी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने अनुष्ठानाने आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांच्या ७५ व्या जन्मसोहळ्या निमित्ताने आळंदी नगरी सज्ज झाली आहे. मलुक पीठ, वृंदावनचे संत राजेंद्रदास महाराज यांचे उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. यावेळी देशभरातील साधुसंतांच्या उपस्थितीने आळंदीतील प्रशस्त जागेत संतांचा मेळा भरला. तशी काहींना अनुभूती आली. सुमारे पंधरा हजारांहून अधिक भाविकांच्या हजेरीत ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळ्याने गीताभक्ति अमृत महोत्सवात संतांची मांदियाळी जमली होती. यावेळी पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्या निमित्त पूज्य स्वामी राजेंद्रदासजी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने अनुष्ठान झाले.त्यानंतर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, कोहिनूर ग्रुप पुरस्कृत ,कै राम गणेश गडकरी स्मृती ‘ कोहिनूर करंडक ‘ राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा दिनांक २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, येथे संपन्न झाल्या. राज्यभरातून ५४ एकांकिका प्राथमिक फेरीत सादर होऊन , अंतिम फेरीसाठी १२ एकांकिका सादर झाल्या. नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि पुणे पिंपरी चिंचवड येथून प्राथमिक फेरी पार पडली गेली होती. स्पर्धेमध्ये विविध विषय हाताळले गेले. यंदापासून स्पर्धा ही भव्य प्रमाणामध्ये आयोजित करण्यात येत आहे. प्रथम पुरस्कार एक लाख, एक हजार केले गेले असून इतर…
पीसीसीओईआर मध्ये ‘वाहतूक व्यवस्थापन’ यावर परिसंवाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थ्यांनी जीवनास आकार देत असताना जबाबदारीचे भान ठेवून वागले पाहिजे. त्याचप्रमाणे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहनांचा कमीत कमी आणि गरजेनुसार वापर करावा. प्रदूषणाबाबत जागरूक राहावे. वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहन चालवावे. आपले जीवन अत्यंत मौल्यवान असून राष्ट्र उभारणीत त्याचे योगदान द्यावे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ॲण्ड रिसर्च, (पीसीसीओईआर) येथे ‘वाहतूक व्यवस्थापन’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देऊन मार्गदर्शन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा निरीक्षकपदी प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे. विशाल वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्षपद भूषवत असताना नागरिकांच्या हिताचे अनेक मुद्दे घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. राज्यातील सर्वात कुशल युवक संघटन त्यांनी उभारले होते. याबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला होता. मागील जवळपास दीड वर्षांपासून पक्षाने त्यांच्यावर प्रदेश युवक उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. ती जबाबदारीही त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. आता पक्षाने नवीन जबाबदारी देत त्यांना कोल्हापूर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार करीत डेल ऑर्टो इंडिया प्रा. लि. कंपनीने कामगारांसाठी तब्बल १८ हजार ५०० रुपयांची पगारवाढ केली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चाकण- भांबोली येथील डेल ऑर्टो इंडिया प्रा. लि. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार करण्यात आला. करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, दत्तात्रय गवारी, प्रशांत पाडेकर, रविंद्र भालेराव, महादेव येळवंडे, गृपो कंपनीचे युनिट अध्यक्ष संजय पाटील, सोमनाथ जानराव, युनिट अध्यक्ष कमलेश भोकसे, उपाध्यक्ष धनेश निघोजकर, सरचिटणीस पांडुरंग…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या विभागप्रमुखपदी अतिरिक्त आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभयचंद्र दादेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे पदव्युत्तर पदवी संस्थेशी संबंधित शैक्षणिक कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जारी केला आहे. महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे रूग्णालयातील दैनंदिन व्यवस्थापन आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम या दाेन्हींचा अतिरिक्त ताण अधिष्ठाता डाॅ. वाबळे यांच्यावर येत हाेता. त्यामुळे रूग्णालयातील आराेग्य सेवांचे कार्यक्षम वितरण सुनिश्तिच करण्यासाठी अतिरिक्त आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. दादेवार आणि डाॅ. वाबळे यांच्याकडे कामकाज विभागून देण्यात आले आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जळीतग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जळीत कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जळीत कक्षाचा दर्जा, क्षमता आणि सोयींसुविधांबाबत आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी तज्ञांची मदत घेतली जात असून हा कक्ष अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. जळीत कक्षाच्या जागेसाठी महापालिका वैद्यकीय अधिकारी आणि तज्ञांमार्फत महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, थेरगाव रुग्णालय तसेच जुन्या तालेरा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान जुन्या तालेरा रुग्णालयाची जागा प्राथमिकदृष्ट्या योग्य वाटली असुन त्यादृष्टीने विचार सुरु आहे. जळीत कक्षाची रचना आणि तेथील अत्याधुनिक सोयीसुविधा, मनुष्यबळ आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जळीत कक्षासाठी…
‘कलाग्राम’ प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कलाग्राम प्रदर्शना उत्साहात सुरुवात झाली या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. भाग्यश्री पाटील अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका – राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड व प्र- कुलपती डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी आयोजिका गौरी ढोलेपाटील, नुपूर पवार व मान्यवर उपस्थित होते. “कलाग्राम प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला व उदयोग वाढविण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. याचमुळे उद्योजकांच्या कल्पकतेला व्हावं मिळत असून यातूनच सर्वाभीमुख व्यवसायिक संवादाचे आदानप्रदान होत आहे. वस्त्रउद्योग, पाककला शिल्पकला, हस्तकलेला ‘कलाग्राम’ प्रदर्शनातुन पाठबळ मिळण्याबरोबरच नवउद्योजक महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हातभार लावला जात आहे”. असे मत डॉ. भाग्यश्रीताई…
शहरातील सर्व शिक्षण संस्थांतील महिला वस्तीगृहावर 24 तास सिक्युरिटी गार्ड व सीसीटीव्ही बसवा पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमी निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीवर संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संचालक नौशाद अहमद शेख (वय ५८) आणि त्याला मदत करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र राज्य सरकारच्या लैंगिक अत्याचारापासून वाचवण्यासाठी 2012 साली कायदा तयार करण्यात आला असून (protection of children from sexual offenses) पोक्सो कायदा याच कायद्याखाली शेख याला जन्मठेप अथवा प्रसंगी फाशीची शिक्षा द्या आणि त्या १६ वर्षीय पीडित मुलीला न्याय द्यावा. तसेच शाळेवरती कडक निर्बंध घालावेत यामुळे भविष्यात…
