Author: maharashtrabreakingnews.com

कीर्तन जयघोषात आळंदी येथे राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या वतीने राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आळंदी येथे घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला. यावर्षी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर महाराज यांची कीर्तन सेवा रुजू झाली. “गांधीजी आणि वारकरी संप्रदायाचा एकमेकांवर प्रभाव होता आणि आहे. संत तुकारामांच्या ओव्यांचे गांधीजींनी इंग्रजीत भाषांतर केले होते. तुकारामांचे विचार त्यांना प्रेरणादायी वाटत. देहू, आळंदी आणि पंढरपूर येथील मंदीरांमध्ये दलितांना प्रवेश मिळण्यासाठी गांधीजींच्या अनुयायांनी नेतृत्व केले, ” असे बंडगर…

Read More

सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कलावंत आणि सामान्य माणसात फरक असतो, यातील कलावंताचे वेगळेपण प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या “प्रेयसी” या छायाचित्र प्रदर्शनातून पाहायला मिळते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार, कवी गुरु ठाकूर यांनी केले. देवदत्त कशाळीकर यांच्या प्रेयसी या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी (दि. १२) ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक महेश कुडाळकर, कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी प्रवीण तुपे, सकाळ समूह संपादक सम्राट फडणीस, ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव, विवेक इनामदार, विश्वास मोरे, गोविंद वाकडे, नाझीम मुल्ला, कैलास पुरी, मिलिंद…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तेलगू मन्नेरवारलू समाजाचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे असे मत शिरीष पोरेड्डी यांनी व्यक्त केले. तेलगू मन्नेरवारलू ज्ञातगंगा समाजाच्या वतीने आयोजित समाज बांधवांच्या मेळाव्यात पोरेड्डी बोलत होते. रविवार दिनांक ११ फ्रेब्रुवारी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा मेळावा पार पडला. सदर स्नेहसंमेलनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून समाज बांधव स्नेहसंमेलना साठी सह-कुंटुब सह – परिवार उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी  विजया मुखेड़कर सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता, महापारेषण विभाग या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दोन सत्रा मध्ये हा कार्यक्रम पार पडला. पहिल्या सत्रामध्ये समाजातील विविध कलाकरांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तसेच 10 वी 12 वी, पदवी, पदवीका प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नागपूर येथे झालेल्या थाईबॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पिंपळे सौदागर येथील यु.एफ.एफ.सी क्लबचे विद्यार्थी यांनी कु.अवनिश गंगमवर, कु. ईशान बोंगाळे,कु.आयुष मिश्रा आणि कु.लक्ष्य मांजरेकर यांनी वयोगट १२ वर्षे , १४ वर्षे आणि १८ वर्षे थायबॉक्सिंग स्पर्धेमध्ये “सुवर्ण पदक” मिळविल्याबद्दल नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सुवर्ण भरारी घेणाऱ्या या सर्व स्पर्धकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले . आपल्या परिसराचे नाव राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करण्याची किमया या नव्या पिढीने करून दाखविले . पुढील काळात अशीच घवघवीत यश संपादन करून पिंपळे सौदागरचे नाव देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवा अश्या शुभेच्छा ही दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवड थाई बॉक्सिंग अध्यक्ष  नरेश…

Read More

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मोहननगर चिंचवड येथे चार महिला बचत गटांनी एकत्र येऊन हळदी कुंकू कार्यक्रम केला. सदर बचत गटाच्या कार्यक्रमांमध्ये श्रीमती मंदा फड व माजी नगरसेविका मीनल यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सौ.खजिनदार व सौ.कर्पे यांनी सर्वांच्या वतीने आभार मानले. सदर कार्यक्रमांमध्ये श्रीमती.मंदा फड यांनी बचत गट सुरुवात केल्यापासून चा पूर्ण इतिहास सर्वांसमोर ठेवला तसेच बचत गटातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर थोडे थोडे करून आतापर्यंत जमा झालेल्या ७० ते ८० हजार रुपये प्रत्येक सदस्याच्या खात्यात आहेत तसेच बचत गटामार्फत बचत गटातील सदस्यांना देण्यात येणाऱ्या कर्ज यातून सभासदांच्या अडचणीच्या वेळी झालेली मदत, काही नवीन खरेदी, घरातील काही कार्यक्रमांमध्ये…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा शहराध्यक्ष  शंकर जगताप यांच्या वतीने नवी सांगवी समर्थ नगर परिसरातील पैलवान सुमित अरविंद भोसले(आंतरराष्ट्रीय खेळाडू ) यांना सांगवी रहाटणी मंडल भाजपा उपाध्यक्ष ललित म्हसेकर मित्र परिवार यांच्या हस्ते सन्मानित केले. यावेळी समर्थ नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक भास्कर बागुल , सागर दळवी, शैलेश कड, संतोष महेश्वरी, दिवाकर स्वामी आदी उपस्थित होते. माहिती खालील प्रमाणे पैलवान सुमित_अरविंद_भोसले (आंतरराष्ट्रीय खेळाडू )तेलंगणा, हैद्राबाद येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे सुरु असलेल्या SENIOR NATIONAL WRESTLING CHAMPIONSHIP 2024 या कुस्ती स्पर्धेत आज सुमितनी 74 किलो वजनी गटात सुवर्णपदकं मिळवले आहे,भारतात पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवला आहे.पै.सुमित याची इराण येथे…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा समाजाला खूप उपयोग होतो. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू!” असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले; तर “ज्येष्ठांनी स्वतःसाठी वेळ काढावा; कारण आजच्या धकाधकीच्या काळात घरीदारी ज्येष्ठांना आजी – आजोबांची भूमिका पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांनी विरंगुळा केंद्रात मन रमवावे!” असे आवाहन विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी  चिंचवड येथे केले. आमदार अण्णा बनसोडे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, राजाभाऊ गोलांडे, ॲड. संदीप चिंचवडे, अजित गव्हाणे, सचिन वाल्हेकर, विक्रांत लांडे, शैला मोळक, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, उपाध्यक्ष अशोक नागणे,…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मला मिळेल असे कधीही वाटले नव्हते, सर्व सन्मान एकीकडे आणि हा पुरस्कार एकीकडे एवढे या पुरस्काराचे माझ्यासाठी महत्व आहे. अशी भावना प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार शान उर्फ शांतनू मुखर्जी यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, सिध्दीविनायक ग्रुप पुरस्कृत २०वा ‘आशा भोसले पुरस्कार २०२४’ प्रसिद्ध पार्श्वगायक शान ( शांतनू मुखर्जी) यांना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला. एक लाख अकरा हजार रुपये, शाल…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखा आणि गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली आयोजित ३१वा राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सव गुरुवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता गणेश इंटरनॅशनल स्कूल, थरमॅक्स चौक ते चिखली रस्ता, नेवाळे वस्ती, चिखली येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे अध्यक्षस्थान भूषविणार असून ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. सासवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “कवीचे अंतरंग अथांग असते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काळेवाडी येथे व्यक्त केले. ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित ‘अंतरीच्या खोल डोही’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. विधानपरिषद आमदार उमा खापरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, कवयित्री शोभा जोशी, प्रा. डॉ. धनंजय भिसे आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. कवयित्री प्रज्ञा घोडके प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रकाशनाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. सविता इंगळे यांनी त्यांचे मनोगत वाचून दाखवले. त्यामध्ये, “‘अंतरीच्या खोल डोही’ हा माझा प्रकाशित झालेला सहावा कवितासंग्रह असला तरी अजूनही मी काव्यशारदेच्या दरबारातील विद्यार्थी…

Read More