फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन उद्योजक बैठक संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन उद्योजक बैठक संपन्न झाली. या बैठकीत उद्योजकांनी विविध समस्या मांडल्या . अनेक समस्यांनी उद्योजक त्रस्त आहे. अध्यक्ष अभय भोर यांच्याकडे उद्योजकांनी विविध समस्या मांडल्या . एमआयडीसीमधील समस्यांकडे लक्ष न घातल्यास फोरम ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा फोरम ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, भोसरी एमआयडीसी परिसर चोऱ्या अनधिकृत व्यवसाय भंगार दुकाने कर वसुलीसाठी महानगरपालिकेची जप्ती वसुली जबरदस्ती मोहीम उद्योजकांना कर न भरल्यास उद्योगाला सील करण्याच्या नोटिक .अतिक्रमण अशा अनेक समस्यांनी एमआयडीसी ग्रस्त उद्योजक त्रस्त भोसरी एमआयडीसी परिसरात कंपन्या बाहेरील अतिक्रमणे तसेच मोकळ्या जागांवर अनधिकृत व्यवसाय भंगार दुकाने दारू धंदे वेश्याव्यवसाय सारखे देखील धंदे मोठ्या प्रमाणात चालू असून त्यामुळे औद्योगिक परिसराततील वातावरण दूषित झाले आहे कोणीही यावे आणि एमआयडीसी मध्ये कुठेही अनधिकृत व्यवसाय करणे याला कोणताच लगाम नाही अनेक भागांमध्ये अनधिकृत दुकाने थाटून ती भाड्याने देण्याचे प्रकार चालू झाले आहेत
अनेक भागात बंद पडलेले टपऱ्या त्यामध्ये नानाधिकृत व्यवसाय रात्री दारू वयवसाय चालताना दिसतात अनेक कामगार वर्ग आपला पगार आणि कंपनी सुटल्यानंतर अशा व्यवसायांमुळे गैरमार्गाला लागले आहेत तसेच संबंधित व्यवसायांना उद्योजकांकडून विचारणा झाल्यास अगर विरोध झाल्यास त्यांना दमदाटीचे प्रकार बहुतेक ठिकाणी घडत असल्याचे समजते विविध पक्षांच्या वतीने विविध संघटना त्यांना धमकी स्वरूपात खंडण्या देखील मागितल्या जातात परिसरामध्ये अनधिकृत गाड्या पार्किंग महानगरपालिका पोलीस आयुक्तालय यांचे या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते लवकरात लवकर एमआयडीसी परिसरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवून रात्रीच्या वेळी अशा घडणाऱ्या प्रकारांना आळा घालावा.
तसेच महानगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रमणे काढावी जेणेकरून अवैध्य धंद्यांना चालना मिळणार नाही अनेक अनधिकृत दुकानेही विजेच्या खांबाजवळ थाटले असून त्यामुळे आग लागण्याचा मोठा संभव परिसरात आणि परिसरातील कंपन्यांना जाणवतो तसेच अनाधिकृत डॉक्टरांना अधिकृत लाईट कनेक्शन तर्फे देण्यात येत हे बंद करावे.
महावितरण जेणेकरून अनाधिकृत टपऱ्यांचं प्रमाण कमी होईल तसेच अनेक ठिकाणी मला मूत्र मिश्रित तसेच केमिकल मिश्रित पाणी रस्त्याच्या बाजूला सोडण्यात आल्याचे दिसून येते त्या ठिकाणी देखील संपूर्ण शासनाचे दुर्लक्ष असून लवकरात लवकर एमआयडीसीमधील या समस्यांकडे लक्ष न घातल्यास फोरम ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला ,असे प्रसिद्धी पत्रद्वारे अध्यक्ष अभय भोर यांनी आज सांगितले .यावेळी उद्योजक मिलिंद काळे, विशाल पायगुडे, लखन साळुंखे, हरीश आहेर, वैभव जगताप, प्रदीप चव्हाण, सचिन भगत, राहुल भगत आदी उपस्थित होते.