Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत346 मालमत्ता सील, 538 मालमत्तांवर जप्ती अधिपत्र डकविले, 128 मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित अशा 1 हजार 12 मालमत्ता धारकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ता धारकांचे धाबे दणाणले आहेत. उर्वरित दिड महिन्यात जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. उर्वरित दिवसात मालमत्ता सिल करणे, जप्त करणे आणि नळ कनेक्शन बंद करणे याचे दैनंदिन उद्दिष्ट किमान 500 आहे. या गतीने पन्नास हजारावरील थकीत रकमा असलेल्या सर्व मालमत्ता 31 मार्चपर्यंत जप्त किंवा सिल होणार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज  शत्रुघ्न काटे यांच्या सतत पाठपुराव्याने रहाटणी परिसरातील गणराज कॉलनी याठिकाणी दीर्घकाळ प्रलंबित असलेले ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे गणराज कॉलनी याठिकाणी ड्रेनेज विषयीचा प्रश्न नागरिकांना भेडसावत होते.सतत ड्रेनेज लाईन तुंबत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते आणि यामुळे होणाऱ्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शत्रुघ्न काटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित पालिका ड्रेनेज विभागाला याबाबत माहिती दिली आणि वाढती नागरीवस्ती पाहता उपलब्ध ड्रेनेज पाईपलाईन वर अतिरिक्त ताण पडत असल्यामुळे आणि भविष्यातील वाढ लक्षात घेता अस्तित्वात असलेली जुनी ड्रेनेज लाईन बदली करून त्याठिकाणी नवीन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने येत्या 23 तारखेला औरंगाबाद येथे संविधान गौरव महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे.त्याची पूर्व तयारी व आढावा बैठक आज आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाच त्यांनी फुले शाहू आंबेडकर विचार घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल,संविधानाला व त्याच्या मूल्याला कुठं ही धक्का लागणार नाही व सर्व बहुजनांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्य करेल ही भूमिका मांडली होती तीच भूमिका संविधान गौरव महामेळाव्या मधून अधोरेखित करण्यात येणार आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात…

Read More

कासारवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथे प पू प्रशांत ऋषीजी महाराज साब यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने प्रा .डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या सत्तराव्या जन्मदिनानिमित्त आणि ६९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जैन स्थानकामध्ये नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 130 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि 90 जणांना चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ एस एस पारख यांचे सहकार्य लाभले. डॉ.  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक संस्थांचे संस्थापक डॉ अशोककुमार पगारिया यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाजोपयोगी उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले .त्यांच्या मूळ गावी धामणी या ठिकाणी त्यांच्या परिवाराने खंडेरायाच्या चरणी बैलजोडीचे…

Read More

व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला प्रेयसीच्या शोधात तरुणाई एकवटली पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी सादर केलेल्या “प्रेयसी” या छायाचित्र प्रदर्शनात मंगळवारी व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला प्रेयसीच्या शोधात तरुणाईने गर्दी केली होती. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे कलादालनात हे प्रदर्शन बुधवारी (दि.१४) रात्री नऊ वाजेपर्यंत विनामूल्य असून कलारसिकांनी प्रदर्शन पाहून आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन आयोजक देवदत्त आणि वर्षा कशाळीकर यांनी केले आहे. सुप्रसिद्ध गीतकार, कवी गुरु ठाकूर यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक महेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत सोमवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्या हस्ते वर्षा कशाळीकर यांचा गौरव करण्यात आला. गुरू ठाकूर आणि वर्षा कशाळीकर…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डाॅ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डाॅ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी येथे शिवराज्याभिषेक – वर्ष ३५० सोहळ्यास मंगळवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष डाॅ. पी. डी. पाटील आणि सचिव डाॅ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले; तसेच डाॅ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या विश्वस्त डाॅ. रोहिणी सोमनाथ पाटील यांच्या हस्ते शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्या आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास अधिकारी…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  न्यू इंग्लिश स्कूल, माण मुळशी येथील शाळेत नुकतीच पालक- विद्यार्थी सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास रोडे होते. प्रमुख अतिथी स्वाधार परिवाराच्या अनधा गुप्ते ,प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, सामाजिक कार्यकर्ते तेजस कुंभार व्यासपीठावर होते. याप्रसंगी उर्मी संस्थेचे मिलिंद जोरी, स्वाधारच्या श्रद्धा पवार, शीतल कलशेट्टी, ज्योती गायकवाड, लता सणस, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दहावी बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले.. “विद्यार्थी मित्रांनो! मीही तुमच्यासारखा एकेकाळी शालेय विद्यार्थी होतो. दहावीच्या महत्वाच्या परीक्षेत नापास झालो खरा पण या अपयशाने…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सकल मराठा समाजाच्या वतीने आळंदी देवाची यांच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी बंद चे आवाहन केले आहे. या बंद मध्ये सर्व व्यापारी बांधव यांनी स्वयं स्फुर्तीने आपले सर्व बाजार पेठ बंद ठेवण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. माहे फेब्रुवारी मध्ये राज्याच्या विशेष अधिवेशनात सर्व आमदार प्रतिनिधी यांनी सगेसोयरे या विषयी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यास साथ देण्याचे सर्व आमदार यांना सकल मराठा समाजाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे गॅजेट चे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी तसेच त्याची अंमलबजावणी करुन कायद्यात रुपांतर करण्यात यावे. यासाठी कायद्यात रूपांतर झलेल्या पूर्ण प्रक्रियेचा जी. आर. काढण्यात यावा या साठी सर्व सकल मराठा…

Read More

अटातटीच्या सामन्यात सांगवी पोलिसांनी मारली बाजी नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  येथील पीडब्ल्यूडी मैदानावर लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त भाजपा शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजनबद्ध अशा भव्य डे-नाईट क्रिकेट सामन्यांचे उत्तम नियोजन अजय दुधभाते, मनीष कुलकर्णी, निलेश जगताप, प्रवीण वाघमोडे यांनी केले आहे. लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप डे-नाईट क्रिकेट चषक स्पर्धेतील मैत्रीपूर्ण रंगतदार सामन्यात सोमवारी रात्री आठ वाजता पत्रकार विरुद्ध सांगवी पोलीस यांचा सामना घेण्यात आला होता. या मैत्रीपूर्ण अटीतटीच्या सामन्यात सांगवी पोलीस संघाने बाजी मारत विजयाची बाजी मारली. पत्रकार संघाचे कर्णधार संजय मराठे यांनी नाणेफेक…

Read More

*श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; यंदाही सुवर्ण पाळण्यात गणेशजन्म सोहळा संपन्न* पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे… अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशात महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात श्री गणेशजन्म सोहळा उत्साहात पार पडला. मंदिरात केलेल्या मनोहारी पुष्पसजावटीचे दृश्य डोळ्यात साठविण्यासोबतच शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना श्रीं चरणी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने श्री गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला ट्रस्टचे…

Read More