- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, चिंचवड विधानसभेतील पदाधिका-यांना नियुक्तीपत्राचे होणार वाटप पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) :- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेचा शनिवार, दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी काळेवाडी येथील इंदू लॉन्स येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्य़ात प्रमुख नेते व पदाधिका-यांच्या उपस्थितीत पिंपरी विधानसभा व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्तीपत्राचे वाटप होणार आहे, अशी माहिती युवासेना शहरप्रमुख चेतन पवार यांनी दिली. युवासेनेचा मेळावा काळेवाडी येथील इंदू लॉन्स येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, माजी शहरप्रमुख योगेश…
मावळ लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी व गावातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध – संजोग वाघेरे
– मतदारांना दिली विश्वासाला तडा जावू न देण्याची ग्वाही – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा गावभेट दौरा सोमाटणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांशी खूप जुने नाते आहे. गेल्या दहा वर्षात मावळ लोकसभेत काही कामे झालेली नाहीत. त्या समस्या सोडविण्याचे काम आपण करु. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. चांगल्या पद्धतीने काम होईल, ही माझी जबाबदारी आहे. मावळ लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी व गावातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मतदान करा. तुमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही देत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी महायुतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत तुकाराम नगर भागास भेट देऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. फटाके वाजून, औक्षण करीत त्यांचे मोठे उत्साहात स्वागत करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, मुक्ता पडवळ, भाजपचे पदाधिकारी महेंद्र बाविस्कर, शिवसेना वाहतूक सेनेचे संजय यादव, संत तुकाराम नगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण सुवर्णा, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या निवासस्थानी तसेच सोहम लायब्ररी व एकता विकास मंडळ या ठिकाणी…
– *संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांची मागणी.* – *शहरात गल्लोगल्ली भाजपाचे कमळ चिन्ह अद्यापही कायम.* पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गल्लोगल्ली कमळ चिन्ह लावून निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करूनही संबंधितांवर कारवाई करण्यात अधिकारी,कर्मचारी कसूर करत आहेत.भाजपा पदाधिकाऱ्यांच्या चुकांना खतपाणी घालणाऱ्या दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली. तसेच कमळ चिन्ह लावणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावे, अशी मागणी काळे यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन करणे सर्वांना अनिवार्य आहे.…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिलासा संस्था, कलारंजन प्रतिष्ठान, संवेदना प्रकाशन, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, कलांगण ट्रॉफीज तसेच शब्दधन काव्यमंच या संस्थांच्या वतीने एस के एफ युनियन सभागृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक ०४ एप्रिलला लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, सुरेश कंक, सुभाष चव्हाण, मधुश्री ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड, संगीता जोगदंड, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर तसेच पिंपरी – चिंचवड परिसरातील अनेक मान्यवर साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना नंदकुमार मुरडे यांनी, “एक सामान्य रसिक म्हणून समाजात वावरताना समाजातील सामान्य माणसांमध्ये मी…
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार संजोग वाघिरे पाटील यांना राहटणी काळेवाडी विभागातुन सर्वाधिक मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवणार असा संकल्प दिपक अंकुश यांच्या निवासस्थानी झालेल्या सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत संकल्प करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते,गोरख पाटील, काँग्रेस आय पक्षाचे सर्जी वर्की, काँग्रस आय चे सचिव चंद्रशेखर जाधव सागर शिंदे, अरूण आंब्रे, छावा संघटनेचे सचिन लिमकर,राष्ट्रवादीचे युवा नेते सागर तापकीर आम आदमी पार्टीचे प्रकाश पठारे, संजय मोरे.साचीन पवार युवराज दाखले, बाळासाहेब नढे सचिन कोंधरे .भरत शिंदे,दिपक अंकुश,अमोल राठोड,प्रकाश अंकुश.…
निमित्त वाढदिवसाचे, खलबते लोकसभा निवडणुकीची! सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचे आमदार महेश लांडगे व मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची भेट झाली. भाजपच्या आजी-माजी शहराध्यक्षांनी यावेळी खासदार बारणे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ‘हॅटट्रिक’साठी शुभेच्छा दिल्या. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंपळे गुरव येथील त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. त्याचवेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे हे देखील त्या ठिकाणी आले. श्रीरंग बारणे व महेश लांडगे यांनी शंकर जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (गुरुवारी) आकुर्डी येथे अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. बनसोडे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी माजी हरेश आसवानी, प्रसाद शेट्टी, नारायण बहिरवाडे तसेच राजेंद्र तरस आदी उपस्थित होते. बनसोडे म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील झुलेलाल मंदिर ( लाल मंदिर ) येथे परम पूज्यनीय संत शिरोमणी स्वामी लिलाशाह महाराज यांच्या १४४ वया जयंती निमित्त सिंधी समाजातील लाडी समाजाच्या स्वामी लिलाशाह प्रचार मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये १६ मुलांचा सामुहिक जेनेयु संस्कार करण्यात आले तसेच सिंधी समाजातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी आणि मुलाचा सामुहिक खर्चातुन विवाह सोहळा करण्यात आला या धार्मिक विधींन साठी स्वामी महादेव दास उदासी, फुरसुंगी येथील रामदारा येथील परम पूज्य हेमंतगिरी महाराज पिंपरी येथील सोनू साई,दिपक साई आदी उपस्थित होते तसेच भजन, सामुहिक आरती तसेच धार्मिक संस्कार करण्यात आलेल्या मुलांची…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाने शनिवार, दिनांक ०६ एप्रिल ते बुधवार, दिनांक १० एप्रिल २०२४ या कालावधीत बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४चे आयोजन केले आहे. त्यामध्ये शनिवार, ०६ एप्रिल रोजी डॉ. संजय उपाध्ये ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर निरूपण करतील. रविवार, ०७ एप्रिल रोजी ह. भ. प. श्रेयस आणि मानसी बडवे या दांपत्याची कीर्तन जुगलबंदी होईल. सोमवार, ०८ एप्रिल रोजी ज्योती गोराणे आणि सहकारी यांचा ‘स्वर जोर्तिमय शाम’ हा बहारदार गीतांचा कार्यक्रम होणार असून मंगळवार, ०९…
