महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या संत तुकाराम नगरमध्ये खासदार बारणे यांच्या भेटीगाठी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी महायुतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत तुकाराम नगर भागास भेट देऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. फटाके वाजून, औक्षण करीत त्यांचे मोठे उत्साहात स्वागत करण्यात आले.
भाजपचे ज्येष्ठ नेते व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, मुक्ता पडवळ, भाजपचे पदाधिकारी महेंद्र बाविस्कर, शिवसेना वाहतूक सेनेचे संजय यादव, संत तुकाराम नगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण सुवर्णा, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या निवासस्थानी तसेच सोहम लायब्ररी व एकता विकास मंडळ या ठिकाणी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली.
संत तुकाराम नगर भागात भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. तिन्ही पक्षांची महायुती असल्यामुळे या भागात खासदार बारणे यांना एकतर्फी मतदान होईल, असा विश्वास सदाशिव खाडे यांनी व्यक्त केला. खासदार बारणे यांनी कामगारांच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे व कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा यशवंत भोसले यांनी व्यक्त केली. सर्व कामगार महायुतीच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
खासदार बारणे यांच्या समवेत माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती मायला खात्री, माणिकराव अहिरराव तसेच राजेश वाबळे, मंगेश दाडगे, माऊली जगताप, लक्ष्मण रानवडे, उमेश पाटील, रवींद्र नामदे, जगन्नाथ नेरकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.
त्यापूर्वी कासारवाडी येथे माजी नगरसेविका सुरेखा लांडगे तसेच ज्येष्ठ नेते दत्तात्रय लांडगे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी भेट दिली. भाजप नेते माऊली थोरात व प्रकाश जवळकर यांनीही खासदार बारणे यांना शुभेच्छा दिल्या.