- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
कोल्हेंनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे केले स्पष्ट आढळरावांच्या दौऱ्याला कात्रज,संतोषनगर,कोंढव्यात प्रतिसाद कात्रज, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रस्ते,रेल्वे प्रकल्पांसाठी ५० हजार कोटी केंद्रातून आणून प्रकल्प पुर्ण करायचे आहेत,प्रकल्पपुर्ती करुनच पाच वर्षांनी थांबायचंय या हेतूने कार्यपूर्तीसाठी माझी शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य मी केले,याचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकतेचा हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हेंनी काढल्याचा पलटवावर महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कात्रज,कोंढवा दौऱ्यादरम्यान केला. श्री.आढळराव पुढे म्हणाले की,गेल्या वेळेला अपघाताने माझा पराभव झाला,पण पुन्हा निवडणूक लढवत आहे.यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून मी विजयी होणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. कात्रज गावठाण व संतोषनगर,कोंढवा,सुखसागर नगर, कौसरबाग आदी ठिकाणी जाऊन मतदारांसह महायुतीच्या विविध…
शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोणतीही निवडणूक म्हटल की ती गावकी – भावकी भोवती फिरत असते, मात्र देशाचा नेता निवडण्याची निवडणूक भावनिक किंवा अन्य पातळ्यांवर होऊनये यासाठी काही नेते आग्रही आहे. निवडून येण्याच्या मेरिटवर जसे तिकीट मिळत आहे तसेच काम करण्याची क्षमता ओळखून मतदान करण्याचे आवाहन करताना नेते दिसत आहेत. यातूनच लोकसभेची ही निवडणूक गावकी भावकीची नसून देशाचं भवितव्य ठरवणारी असल्याचे, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलें आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे नारायणगावच्या दौऱ्यावर असताना येथील गावकऱ्यांनी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढली. तसेच शिवजन्मभूमीचा पुत्र म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी ग्रामस्थांनी यावेळी…
‘एमआयटी एडीटीत’र्फे ‘विश्वारंभ कला पुरस्कारा’चे वितरण पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चित्रकार कलेच्या माध्यमातूनच आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकार कलाकृती साकारत असतो तोपर्यंतच ती त्याच्या मालकीची असते. एकदा का त्याने तिच्यावर सही केली ती सार्वजनिक होते. इतिहासात कायमच योगदानाची नोंद राहते व्यवहाराची नाही. कारण, कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त आयुष्य घेऊन जन्मते, त्यामुळे कलाकाराने केवळ व्यवहारावर भर न देता योगदानावर भर द्यावा व अखेरीस शांती व तृप्ती रसाचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी केले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव असणाऱ्या “कारी-२०२४” निमित्ताने…
पुनावळे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देहूरोड, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर देहूरोड ते बालेवाडी असा तब्बल साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. खासदार बारणे यांनी आज (शुक्रवारी) सकाळच्या सत्रात पुनावळे भागातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. माजी नगरसेवक चेतन हुशार भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलताना बारणे यांनी वरील माहिती दिली. त्यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ तसेच हुशार भुजबळ, हिरामण भुजबळ, संतोष दर्शले, शरद दर्शले, अतुल…
कर्जत विधानसभेत संवाद मेळावा; कर्जतकर एकमताने उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशीच ! केंद्र व राज्यातील सरकारच्या धोरणांवर केली टीका कर्जत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बळीराजाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी प्राधान्याने घेतला आणि तो तातडीने लागूही केला. परंतु, गद्दारांच्या मदतीने राज्याची सत्ता मिळवलेल्या भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी शेतक-यांना वा-यावर सोडण्याचे काम केले. या सरकारला घरी बसविण्यासाठी मतदान करा आणि मावळ लोकसभेत शिवसेनेची मशाल पेटवा, असे आवाहन महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी शुक्रवारी (दि.18) केले. महाविकास आघाडीचे…
खोपोली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी खोपोलीतील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आता मैदानात उतरले आहेत. “अरे कोण म्हणतंय येणार नायं, अरे आल्या शशिवाय राहणार नाय” अशा घोषणांनी खोपोलीतील परिसर दणाणून गेला होता. भर उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. खोपोलीतील भाऊ कुंभार चाळ शास्त्रीनगर येथील गणेश मंदिरातून महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचार सुरुवात केली. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्लासराव देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे कैलास गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील, महिला शहरअध्यक्षा सुवर्ण मोरे, कॉग्रेस महिला अध्यक्षा रेखाताई…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 19 एप्रिल रोजी विहित वेळेत सुमारे 12 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 21 नामनिर्देशन पत्र नेले आहेत. तर श्री.यशवंत विठ्ठल पवार (कर्जत, क्रांतिकारी जय हिंद सेना) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. दि.18 एप्रिल 2024 रोजी सुमारे 27 व्यक्तींनी एकुण 49 नामनिर्देशन पत्रे नेली होती तर आज दि.19 एप्रिल 2024 रोजी सुमारे 12 व्यक्तींनी एकुण 21 नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.त्यामुळे आजपर्यंत 39 व्यक्तींनी एकुण 70 नामनिर्देशन पत्रे नेली आहेत. आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी रात्री काळभोरनगर येथे सिझन बँक्वेट हॉल येथे झाली. त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, मावळ लोकसभा मतदारसंघ समन्वयक सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख अमित गोरखे, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सुजाता पालांडे, मावळ लोकसभा मतदारसंघ विस्तारक भूषण जोशी, माजी नगरसेवक संदीप…
शाळेत जाऊन शिक्षकांचा केला यथोचित गौरव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने पी.एम. स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया “पीएमश्री” योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली आहे. या योजनेत निवड झालेल्या शाळांच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच केंद्राच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षणासाठी आदर्श शाळा विकसित करण्यात येणार आहेत. केंद्राच्या योजनेत आपल्या महापालिकेच्या एखाद्या शाळेची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी ही निश्चितच अभिनंदनाची बाब आहे. त्यामुळे आज या शाळेला भेट देऊन मुख्याध्यापक बाळासाहेब राठोड आणि सन्माननीय शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा यथोचित…
पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तीक टीका केली जात असल्याच वक्तव्य महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं. महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघडी लोकसभा निवडणूक 2014 च्या अधिकृत उमेदवारांची प्रचार शुभारंभ सभा आज पुण्यात पार पडली. या सभेपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शांताई हॉटेल समोर महाविकास आघाडीतील तिन्ही उमेदवारांसाठी प्रचारची शुभारंभ सभा घेण्यात आली. जेष्ठ नेते मा. शरदरचंद्रजी पवार, काँग्रेसचे नेते मा. पृथ्वीराज चव्हाण, मा. बाळासाहेब थोरात, मा. मोहन जोशी, या सभेला बारामती आणि पुणे…
