ताज्या घडामोडीपिंपरीपुणेशिरूर

भावनिकतेसाठी नाही तर निधीतून प्रकल्प पुर्णत्वासाठी शेवटची निवडणूक-आढळराव पाटील

Spread the love

कोल्हेंनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे केले स्पष्ट

आढळरावांच्या दौऱ्याला कात्रज,संतोषनगर,कोंढव्यात प्रतिसाद

कात्रज, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रस्ते,रेल्वे प्रकल्पांसाठी ५० हजार कोटी केंद्रातून आणून प्रकल्प पुर्ण करायचे आहेत,प्रकल्पपुर्ती करुनच पाच वर्षांनी थांबायचंय या हेतूने कार्यपूर्तीसाठी माझी शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य मी केले,याचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकतेचा हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हेंनी काढल्याचा पलटवावर महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कात्रज,कोंढवा दौऱ्यादरम्यान केला.
श्री.आढळराव पुढे म्हणाले की,गेल्या वेळेला अपघाताने माझा पराभव झाला,पण पुन्हा निवडणूक लढवत आहे.यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून मी विजयी होणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
कात्रज गावठाण व संतोषनगर,कोंढवा,सुखसागर नगर, कौसरबाग आदी ठिकाणी जाऊन मतदारांसह महायुतीच्या विविध पक्षांच्या पदाधिकारी,नगरसेवक यांच्या भेटी घेतल्या.हडपसरचे आमदार चेतन तुपे,माजी आमदार योगेश टिळेकर, , राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अजय साबळे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे, भाजपा नेत्या सुरेखाताई कळसे, मनसे नेते बाबू वागस्कर, भाजपा पुणे शहर माजी उपाध्यक्ष संजय कपिले, माजी नगरसेविका कल्पनाताई थोरवे, विकासनाना फाटे, मनसे प्रवक्ते योगेश खैरे, भीमराव पाटे,माजी नगरसेवक कदम,कोंढव्यात मनसे हडपसर विधानसभा अध्यक्ष अमोल शिरस, उपविभाग अध्यक्ष सतीश शिंदेे, सेना प्रमुख सुमित कटारिया, अमित लोणकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला..महायुतीतील विविध घटक पक्षांच्या विविध पदाधिकाऱ्यांपैकी अभिमन्यू भानगिरे,स्मिती बडदे,मोनिकाताई काळे,राजू अडागळे,प्रवीण जगताप,संजय लोणकर आदी उपस्थि त होते.नगरसेवक गफूर पठाण,नंदाताई लोणकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेटी दिल्या.
कौसरबाग येथे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.त्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष चांद मनोरे,युवक अध्यक्ष अब्दुल हफिस, प्रदेश जनरल सेक्रेटरी शुबान कुरेशी, उपाध्यक्ष अनवर रंगरेज, उपाध्यक्ष हासिफ शेख, तोफिक शेख, युनूस अन्सारी आदी उपस्थित होते.
चौकट..
सर्व रेकॉर्ड तोडणार..
पहिल्या निवडणूकीत ८० हजार,दुसऱ्या निवडणूकीत पावणेदोन लाख,तिसऱ्या निवडणूकीत ३ लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आलो आहे,गेल्या निवडणूकीत अपघाताने पराभव झाला तरी यंदा माझ्या आतापर्यंतच्या मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड तोडणार.
-शिवाजी आढळराव पाटील(महायुतीचे उमेदवार,शिरुर लोकसभा मतदारसंघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button