- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मुस्लिम अल्पसंख्याक बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद ! खोपोली, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठविण्यासाठी मतदारसंघात फक्त “मशाल” पेटणार, असा शब्द खोपोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम पटेल आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मुस्लिम अल्पसंख्याक बैठकीस संजोग वाघेरे पाटील यांच्यासमवेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, माजी नगरसेवक कमाल पटेल, तुराब पटेल, रशीद शेख यांच्यासह शिवसेना (उध्दव…
– खोपोलीत संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक समाजाचा मेळावा खोपोली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशात लोकशाही टिकवायची असेल, तर हुकूमशाही सरकारला घरी बसवले पाहिजे. महाराष्ट्राचे हित साधण्याचे, समाजातील सर्व घटकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम फक्त महाविकास आघाडीच करू शकते. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे राष्ट्रीय अल्पसंख्याक अध्यक्ष सिराज मेहंदी यांनी व्यक्त केले. खोपोली येथे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार…
राज्यघटना बदलणार हा निव्वळ कांगावा – बारणे … तर जास्तीत जास्त विकास निधी मिळेल – प्रशांत ठाकूर पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (गुरुवारी) केले. राज्यघटना बदलणार हा विरोधकांचा निव्वळ कांगावा असल्याचा आरोपही बारणे यांनी केला. पनवेलच्या ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात खैरणे येथे झालेल्या चौक सभेत खासदार बारणे बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, संतोष भोईर, भाजपचे…
पनवेल येथे बाईक रॅली व बारणे यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद आत्तापर्यंत मोदी कारकिर्दीचा ट्रेलर, यापुढे खरा चित्रपट – प्रशांत ठाकूर पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पनवेल शहराचा पाणी प्रश्न तसेच शास्ती कर व वाढीव कराचा विषय येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाली निघालेला असेल, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काल (गुरुवारी) दिली. पनवेल शहरातून भव्य बाईक रॅली काढून खासदार बारणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोळीवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत बारणे बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख…
शिक्रापूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज पेठ शिक्रापूर येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ग्रामस्थांनी औक्षण करून स्वागत सत्कार केले. ग्रामदैवत श्री भैरवनाथ श्री जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, तुमची सर्वांची साथ मला खंबिरपणे लाभलेली आहे. या भागातला प्रत्येक व्यक्तीने आता विचार केला आहे की कुणाच्याही भावनेला बळी न पडता. आपले प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन, आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोणी काय केले हे लक्षात ठेऊन मतदान करणार आहे. सरकारचा निधी, तुमच्या हक्काचा निधी आणण्यासाठी मला तुमची साथ लागणार आहे. रामभाऊ सासवडे शिवसेना तालुका प्रमुख – या गावातील ग्रामपंचायतचे इमारत बांधत असताना आलेले अडचणीच्या…
लोणावळा येथे महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र व राज्य शासनाने घेतलेले जनहिताचे निर्णय आणि मोठ्या प्रमाणात केलेली विकास कामे कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवावीत, अशी सूचना मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी लोणावळा येथे सुरू करण्यात आलेल्या महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार बारणे यांच्या हस्ते काल (मंगळवारी) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, माजी सभापती…
तळेगाव दाभाडे येथील मान्यवरांच्या खासदार बारणे यांनी घेतल्या गाठीभेटी तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काल (मंगळवारी) रात्री तळेगाव दाभाडे शहरातील काही मान्यवरांची भेट घेऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले. खासदार बारणे यांच्या तळेगाव दाभाडे दौऱ्यात त्यांच्यासमवेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, भाजपचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे, माजी नगराध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी , संत तुकाराम गाथा यांचे विधिवत पूजन करून पुस्तक दिन साजरा करण्यात आला. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक दिनावर आधारित पुस्तकांचे वाटप याप्रसंगी नागरिकांना करण्यात आले करण्यात आले. याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री.संजय भिसे म्हणाले , “नागरिकांची वैचारिक वृद्धी व्हावी यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे विठाई वाचनालयाची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात असून , २००० हून अधिक पुस्तकांचा वाचनालयात संग्रह आहे . नागरिकांकडून देण्यात आलेल्या पुस्तकांचा स्वीकार देखील विठाई वाचनालयात करण्यात येतो . विठाई वाचनालय हे…
कळंब, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निष्ठेच्या व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात स्वतःच्या कोल्हेमळा रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवता आला नाही, त्यासाठी मी २५ कोटी रूपये मिळवून दिले – शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना चांगलेच सुनावले. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आंबेगाब तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना कळंब येथे जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आढळराव पाटील यांनी स्वतः केलेल्या कामांची यादी वाचून दाखविताना विरोधी उमेदवार खा.अमोल कोल्हे यांच्या निष्क्रिय कारकिर्दीवर जोरदार टीका केली. मी पंधरा वर्षात काय केलं असं विरोधक विचारत आहेत. मी कमलजा देवीची शपथ घेऊन सांगतो की पुणे…
राजगुरूनगर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्याच्या परिस्थितीत विचारांचा वारसदार असणं फार महत्वाच आहे. देशाच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे. देशाने निर्णय घेतलाय. देशातलं वातावरण बदलत आहे. त्यामुळेच दिल्लीचे ही तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ग्रामस्थांसोबत डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला.यावेळी अशोक खंडेभराड, अतुल देशमुख, बाबाजी काळे, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, संजय घनवट, शिवाजी वर्पे, विशाल झरेकर, राजमाला बुट्टे, श्रद्धा सांडभोर, मनीषा सांडभोर, नीलिमा राक्षे, उषा बोराडे, अलका जोगदंड त्यांच्या समवेत सहभागी होते. डॉ.…
