उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पुस्तक दिन उत्साहात साजरा : उन्नती-विठाई वाचनालयाच्या सदस्यांचा पुढाकार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी , संत तुकाराम गाथा यांचे विधिवत पूजन करून पुस्तक दिन साजरा करण्यात आला.
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक दिनावर आधारित पुस्तकांचे वाटप याप्रसंगी नागरिकांना करण्यात आले करण्यात आले.
याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री.संजय भिसे म्हणाले , “नागरिकांची वैचारिक वृद्धी व्हावी यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे विठाई वाचनालयाची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात असून , २००० हून अधिक पुस्तकांचा वाचनालयात संग्रह आहे . नागरिकांकडून देण्यात आलेल्या पुस्तकांचा स्वीकार देखील विठाई वाचनालयात करण्यात येतो . विठाई वाचनालय हे एकप्रकारे लोकचळवळ ठरत आहे .”
याप्रसंगी , राहुल गायकवाड मनोगत व्यक्त करताना म्हणाले , “जगभरात साहित्य आणि लेखक यांच्या हक्क अबाधित राखण्यासाठी जागृती म्हणून जागतिक पुस्तक दिन जगभरात साजरा केला जातो.,आपल्या मराठी भाषेसह इंग्रजी व इतर अनेक भाषांमध्ये विपुल साहित्य कृती उपलब्ध आहे ही निर्माण झालेली प्रत्येक साहित्यकृती हे आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्राबाबत सदैव मार्गदर्शन करत राहते. पुस्तक हा माणसाचा भरवशाचा मित्र आहे हे म्हणतात ते उगीच नाही ! आज उन्नती सोशल फाउंडेशन विठाई वाचनालयाच्या माध्यमातून एक प्रकारची सक्रिय साहित्य चळवळ उभी करत आहे याचे मला मनापासून समाधान आहे.”
याप्रसंगी भूषण वायकर , मनोज शेजळ , मोहन राम , संतोष कोळवणे , अनिल कापसे , महेश गवस , संजय डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.