- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आढळराव पाटील यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे. मागील पाच वर्षात आढळराव पाटील यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण ३९ कोटी ६८ लाख १९० रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता असून त्यांनी ठिकठिकाणी गुंतवणूकही केली आहे. तसेच आढळराव हे काही वाणिज्यिक इमारती, सदनिका आणि शेतजमिनीचेही मालक आहेत. तसेच आढळराव यांनी शिवाजी विद्यापीठातून कला शाखेच्या प्री-डिग्रीपर्यंत शिक्षण घेतले असून ते व्यवसाय, शेती आणि सामाजिक कार्य करत असल्याचे त्यांनी आपल्या…
– संजोग वाघेरेंना संसदेत पाठवून विजयाचा गुलाल उधळू – पनवेलमध्ये काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात ! पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंडिया आघाडीला मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून देशात बदलाचे वारे वाहत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करून लोकसभेत पाठवू. त्यांचा विजय हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करणारा असेल, असे मत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराव पाटील यांनी व्यक्त केले. ते पनवेल येथील काँग्रेसच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आज, शुक्रवारी (२६ एप्रिल) बोलत होते. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग…
– भोसरी विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी बैठका – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा नियोजनबद्ध प्रचार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘बलशाली भारताचे’ स्वप्न साकार करण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान केले पाहिजे. ‘‘शेवटच्या घटकाचा विकास…’’ हाच भाजपा महायुतीचा नारा असून, सर्वसामान्य जनता महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहील, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या यशस्वी वाटचालीतील महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि कल्याणकारी योजना याची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ‘‘नमो संवाद ’’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे…
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारासाठी भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शहरात १०० हून अधिक नमो संवाद सभा घेण्याचे सत्र सूरू केले आहे. या सभांना पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवारांचा विजय साकारण्यासाठी बुथ स्तरावर शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासोबतच पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून नमो संवाद सभांचा धडाका सुरू आहे. मोदी सरकारची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी सांगताना राममंदिर, मेट्रो, महामार्ग, डिजिटल इंडिया, कल्याणकारी योजना आणि विकसित भारताचा संकल्प अशा विविध विकासात्मक विषयांवर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात…
शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिरूर मतदारसंघात आढळाराव पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. लांडेवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज, मारुती आणि विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आढळराव यांच्या प्रचारफेरीला सुरुवात झाली. बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन, या दरम्यान जंगली महाराज रस्त्यावर प्रचारफेरी काढण्यात आली. त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळयास पुष्पहार अर्पण करून या फेरीची सांगता…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अशी मागणी माजी विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर,रहाटणी येथील वरिष्ठ अभियंता यांच्याकडे केले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी-पिंपळे सौदागर हा परिसर गावठाण व सोसायटी बहुल भाग आहे. या परिसरात घरुन काम करणा-यांची संख्या जास्त असून सध्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा देखील सुरु आहेत. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील रात्री-अपरात्री नेहमीच लाईट जाण्याचा प्रमाण वाढले आहे. उकाड्यामुळे नागरिकांचे बेहाल होत आहेत. योग्य क्षमतेने विजपुरवठा होत नसल्यामुळे व्होल्टेज कमी-जास्त झाल्यामुळे विजेवर आधारित उपकरणे ना दुरुस्त होतात. यामुळे लहानापासून थोरांपर्यंत…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयातील कला शाखेच्या पदव्युत्तर (एम. ए.)च्या विद्यार्थ्यांनी नुकतीच मराठी साहित्यातील आद्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या कार्यालयास भेट देऊन संस्थेचे कार्य, उद्दिष्टे आणि उपक्रम जाणून घेतले. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष विनीता ऐनापुरे, जयश्री श्रीखंडे, किरण जोशी आदी उपस्थित होते. महात्मा फुले महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. पांडुरंग भोसले आणि प्रा. संग्राम गोसावी यांच्या अधिपत्याखाली अकरा विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने म.सा.प.च्या पदाधिकाऱ्यांशी विविध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला आणि सविस्तर चर्चा केली. यावेळी राजन लाखे यांनी आजपर्यंत झालेल्या प्रकल्पांची तसेच उपक्रमांची सखोल…
जुन्नर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपल्याला असा खासदार निवडून देण्याची गरज आहे जो आपले प्रश्न दिल्लीत मांडेल. आणि दिल्लीतून निधी आणून आपल्याला मतदार संघाचा विकास करेल. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने विकासाच्या गोष्टी करायला पाहिजे, पण टीका करण्यावर भर दिला जातोय. विद्यमान खासदार गल्ली फिरायचं नाही म्हणतात पण ते विसरून जातात की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवत असतात. जुन्नर तालुक्यातील विकास कामे फक्त कागदावर आहेत. मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहेत. पर्यटनासाठी जुन्नर तालुका सक्षम पर्याय आहे. पर्यटन म्हणून अनेक प्रकार निधी आपण आपल्या तालुक्यात आणू शकतो,असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून आपण प्रचार दौरा…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेचा इलेक्ट्राॅनिक अँड कम्युनिकेशन विभाग व ‘विशे’ कॉम्पोनंट इंडिया प्रा. लिमिटेड लोणी- काळभोर पुणे, यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. ‘विशे’ कॉम्पोनंट या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीतर्फे आता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच, प्रशिक्षण तसेच या इंटर्नशिप आदींसाठी मार्गदर्शन लाभणार आहे. या सामंजस्य कराराप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, ‘विशे’ कॉम्पोनंटचे मुख्य संचालक आर.आनंथक्रिश्नन, अभिजित पिंपळे, नॅथानिअल मनिकम, स्कुल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डाॅ.विरेंद्र शेटे, अधिष्ठाता डाॅ.सुदर्शन सानप, विभागप्रमुख डाॅ.शुभांगी जोशी, डाॅ.शंकर गंभिरे आदी या प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आनंथक्रिश्नन यांनी, या सामंज्यस्य करारासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा , आणि त्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदान जनजागृती साठी सहकार विभागाचे अधिकारी गृहनिर्माण संस्थां फेडरेशन पदाधिकारी यांच्या समवेत जनजागृती अभियानाचे आयोजन आचार्य अत्रे सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त अण्णा बोदडे , निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे , सहकार विभागाचे उप निबंधक शीतल पाटील, नागनाथ कणजेरी यांची उपस्थिती होती. प्रत्येक सोसायटीच्या चेअरमनने सोसायटीत राहणाऱ्या सर्व सभासदांना भेटून मतदान करण्याबाबत माहिती द्यावी. यासोबतच प्रत्येक सोसायटीमध्ये मतदान जनजागृती व्हावी…
