‘एमआयटी एडीटी’चा ‘विशे’ कॉम्पोनंटशी करार
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेचा इलेक्ट्राॅनिक अँड कम्युनिकेशन विभाग व ‘विशे’ कॉम्पोनंट इंडिया प्रा. लिमिटेड लोणी- काळभोर पुणे, यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. ‘विशे’ कॉम्पोनंट या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीतर्फे आता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच, प्रशिक्षण तसेच या इंटर्नशिप आदींसाठी मार्गदर्शन लाभणार आहे.
या सामंजस्य कराराप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, ‘विशे’ कॉम्पोनंटचे मुख्य संचालक आर.आनंथक्रिश्नन, अभिजित पिंपळे, नॅथानिअल मनिकम, स्कुल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डाॅ.विरेंद्र शेटे, अधिष्ठाता डाॅ.सुदर्शन सानप, विभागप्रमुख डाॅ.शुभांगी जोशी, डाॅ.शंकर गंभिरे आदी या प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आनंथक्रिश्नन यांनी, या सामंज्यस्य करारासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांचे आभार मानले.
ते यावेळी म्हणाले, आम्ही इलेक्ट्राॅनिक क्षेत्रातील सर्व मोठ्या कंपन्यांना सेवा पुरवतो. त्यात विविध संशोधन व नाविण्यपूर्ण कामासाठी आम्हाला प्रतिभाशाली विद्यार्थ्यांची कायमच आवश्यकता असते. त्यामुळे या कराराचा आम्हाला व संशोधनाला मोठा फायदा होणार आहे.
याप्रसंगी बोलताना, प्रा.डाॅ.कराड म्हणाल्या की, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग एक अत्यंत चांगल्या प्रकारे विद्यार्थीकेंद्री काम करणारा आमचा विभाग असून सध्या आमचा टाटा मोटर्स, जाॅन डिअर सारख्या कंपन्यांशी सामंजस्य करार आहे. त्यात आता ‘विशे’ कॉम्पोनंटची भर पडल्याचा आनंदच आहे. तरी या करारातून आमच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या तसेच, संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.