Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिबिरातील प्रशिक्षणार्थीना व गानरत्न विजेत्याना पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले प्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष शाम जगताप, राज्य शासन पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र तथा बांधकाम व्यावसायिक अरुण पवार उपाध्यक्ष तानाजी जवळकर चिंचवड उपाध्यक्ष प्रदिप गायकवाड उदय ववले सामाजिक न्याय अध्यक्ष बाळासाहेब पिलेवार संदिप राठोड आदि उपस्थित होते. इना फ्रान्सिस यांच्या नटराज वंदन नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार संस्कृती समिती ने १५ एप्रिल तें २५ एप्रिल विविध कला क्रीडा प्रकारांचे विद्यार्थी व महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण आयोजीत केलें होते त्याच बरोबर मंचावर कधीच…

Read More

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २५ पुरुष संघ व २० महिला संघांचा सहभाग पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटना व विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ एप्रिल या कालावधीत १७ वी वरीष्ठ गट (पुरुष व महिला) राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन पीसीसीओई मैदानावर करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २५ पुरुष संघ व २० महिला संघानी सहभाग नोंदविला आहे.             स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेचे सचिव डॉ. ललित जीवानी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटनेचे सचिव मानसिंग वाबळे,…

Read More

गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या जिजाऊ व्याख्यानमालेचे चौथे पुष्प पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  छत्रपती शिवाजी महाराज नऊ वर्षांचे असताना त्यांच्या हस्ते जिजाऊंनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून रयतेमध्ये पुणे वसवण्यासाठी विश्वास निर्माण केला. ही घटना म्हणजे मोगलांच्या राजवटीतून रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रचलेला पाया आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराष्ट्र निर्मितीचा ध्यास घेतलेले, प्रखर राष्ट्रवाद जोपासणारे,  सृजनशील व्यक्तिमत्व होते असे हभप शिरीष महाराज मोरे म्हणाले.     चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना मोरे बोलत होते. जिजाऊ व्याख्यानमालेचे हे ३४ वे वर्ष आहे. यावेळी उद्योजक एस. बी. पाटील, श्रीकृष्ण कुलकर्णी, माजी नगरसेवक…

Read More

बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाल्हेकरवाडी येथील बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित शनिवार (२७ एप्रिल) करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना बहुजन मित्र पुरस्कार तर सुर्योदय ऊर्फ बाबू शेट्टी यांना विशेष पुरस्कार बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज तोरडमल यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.    यावेळी इंडियन आयडॉल सोनी टीव्ही, सुर नवा ध्यास नवा, कलर्स मराठी फेम गायक रॉकस्टार संतोष जोंधळे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. फॉरेनला धनी गेला ग बाय, तिथं जन्मले…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर तर्फे दरवर्षी विविध साहित्य प्रकारात पुरस्कार दिले जातात. यंदाचा बालसाहित्यातील पुरस्कार राजन लाखे लिखित ‘ढब्बू ढेरपोट्या’ या किशोर काव्यसंग्रहास प्राप्त झाला आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लाखे यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये ‘वास्तवरंग फुलताना’ , ‘मी पाहिलेला सूर्य’ , ‘सौंदर्याच्या गर्भातून’ , ‘मनातले माझ्या’ , ‘मन माझे मी मनाचा’ , ‘गुंता’ तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेला ‘बकुळगंध’ आदी साहित्यकृतींचा समावेश असून त्यांचे बालसाहित्यातील हे पहिलेच पुस्तक आहे, ज्याची साहित्य क्षेत्राने दखल घेतली आहे. सदर पुरस्कार सोहळा लातूर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कॅलिफोर्निया, यूएसए येथे सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (SAE) इंटरनॅशनल द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एसएई एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईच्या “टीम मावेरिक इंडिया” या संघाने नेत्रदीपक यश मिळवले. ७५ देशातील विविध संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत “टीम मावेरिक इंडिया” संघाने विविध गटात उल्लेखनीय यश मिळवून एकूण स्पर्धेत जागतिक पातळीवर दहावा क्रमांक पटकावला आणि नेत्रदीपक यश मिळवले. या यशामुळे जागतिक पातळीवर भारतीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च तांत्रिक क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रेडिओ-नियंत्रित विमानाच्या डिझाइन, अभियांत्रिकी आणि उड्डाण क्षमतांचे…

Read More

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्युज) – विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशभरात रस्ते-महामार्ग तसेच शिक्षण, आरोग्य व अन्य क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना थेट लाभार्थ्यापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवल्या गेल्या. देशाच्या इतिहासात प्रथमच जनतेला अनेक सरकारी सुविधांचा लाभ प्रत्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ जनतेने यावेळीही सर्वांगिण विकासाचा विश्वास देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणजेच महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय…

Read More

भोसरी विधानसभा मतदारसंघातून दुप्पट मताधिक्य मिळणार पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाची बुथ यंत्रणा सज्ज आहे. या मतदारसंघातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, मंडल प्रमुख तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रभागनिहाय बैठका घेऊन महायुतीच्या विजयासाठी नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मतदान होईल, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना-आरपीआय-मनसे-रासपा महायुतीचे उमेदवार शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार  शिवाजीरावदादा आढळराव…

Read More

– वाकडमध्ये “डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसी”तून साधला आयटीयन्ससोबत संवाद – तुमचा आवाज बनण्यासाठी संजोग वाघेरेंना संसदेत पाठवा पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मतदारांनी संधी दिल्यानंतर मतदारसंघासाठी मिळणारा संसद‌ निधी देखील पूर्णपणे खर्च करू शकत नाहीत. ते त्यांचे अपयश आहे. मतदारांचा आवाज उठविण्याऐवजी स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसले. त्यांना या निवडणुकीत घरी बसवा. रोजगार‌, शिक्षण, आरोग्य सुविधांवर तुमचा आवाज बनतील आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी तुमच्या सोबत राहतील ते महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना‌ मावळ लोकसभा मतदारसंघातून संसदेत पाठवा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या तथा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी‌ केले.‌ मावळ लोकसभा मतदारसंघाचे…

Read More

मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरेंचा मतदान करण्याचे आवाहन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून “न्याय मशाल” अभियान येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षातर्फे सांगवी येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसच न्यायपत्र हा जाहीरनामा आणि उमेदवारांचे प्रचारपत्रक वाटप करून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार करीत आहेत. काँग्रेस पक्षाने दिलेल्या सामाजिक भागीदारी, युवक, महिला, श्रमिक, शेतकरी या घटकांसाठी कल्याणकारी संकल्प रचताना कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा दोन यात्रा भारत जोडो आणि न्याय यात्रा करत राहुल गांधींनी जनतेची…

Read More