थेरगाव, रहाटणीत नमो संवाद सभेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्युज) – विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशभरात रस्ते-महामार्ग तसेच शिक्षण, आरोग्य व अन्य क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना थेट लाभार्थ्यापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवल्या गेल्या. देशाच्या इतिहासात प्रथमच जनतेला अनेक सरकारी सुविधांचा लाभ प्रत्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ जनतेने यावेळीही सर्वांगिण विकासाचा विश्वास देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणजेच महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय तसेच रहाटणी येथील नखाते वस्ती येथे नमो संवाद सभा पार पडली. यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, अभिषेक बारणे, हर्षल ढोरे, जयदीप माने, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्र माने, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, भाजयूमोचे सनी बारणे, कायदा सेल जिल्हा संयोजक ऍड. गोरक्षनाथ झोळ, नारायण मोरे, सामाजिक कार्यकर्त्या करिष्माताई बारणे, पियुषा पाटील, शिवसेना युवती प्रमुख रितुताई कांबळे, रोहन बारणे, रवि भिलारे आदी उपस्थित होते.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशाच्या विकासाने गेल्या १० वर्षांच्या काळात पकडलेली गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुती विजयी होणे आवश्यक आहे, असेही जगताप म्हणाले.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देशाचे सर्वच क्षेत्रात भरारी घेतली आहे. देशाची महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरु आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात भरघोस निधी मिळाल्याने मावळचा विकास पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. नमो संवाद सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रहाटणी मध्ये नमो संवाद सभा…
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपी