ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमार्फत ‘न्याय मशाल’ अभियानास प्रारंभ

Spread the love

 

मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरेंचा मतदान करण्याचे आवाहन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून “न्याय मशाल” अभियान येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षातर्फे सांगवी येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसच न्यायपत्र हा जाहीरनामा आणि उमेदवारांचे प्रचारपत्रक वाटप करून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार करीत आहेत.

काँग्रेस पक्षाने दिलेल्या सामाजिक भागीदारी, युवक, महिला, श्रमिक, शेतकरी या घटकांसाठी कल्याणकारी संकल्प रचताना कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा दोन यात्रा भारत जोडो आणि न्याय यात्रा करत राहुल गांधींनी जनतेची मते लक्षात घेऊन तयार केलेल्या या जाहीरनाम्याचा प्रसार काँग्रेस कार्यकर्ते करत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्याचा संकल्प, गरज, महत्व आणि जबाबदारी लोकांपुढे जाऊन मांडत आहेत.

या अभियानाची सुरुवात सांगवी येथील स्व.वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. या अभियानाद्वारे सांगवी परिसरातील पवार नगर, भाजी मंडई, गजानन महाराज मंदिरा जवळील परिसर आणि शितोळे नगर या भागामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या समूहाने नागरिकांशी संवाद साधत, घोषणा देत, पत्रके देऊन काँग्रेस जाहीरनामा समजून सांगत महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मशाल चिन्हाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. या अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून महाविकास आघाडीला मतदान करुन साथ देण्यासाठी सकारात्मक मत व्यक्त केले जात.

काँग्रेसमार्फत राबविण्यात आलेल्या न्याय मशाल अभियान वेळी मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या पत्नी माजी नगरसेविका उषाताई वाघेरे देखील सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सायली नढे, एनएसयु आयचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅड. उमेश खंदारे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रा. किरण खाजेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ.मनीषा गरुड, जितेंद्र छाबडा, विजय इंगळे, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरोदे, कार्याध्यक्ष सुप्रिया पोहरे, महिला काँग्रेसच्या आशा भोसले, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस सौरभ शिंदे, प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष दहाड मुजावर, कुंदन कसबे, वीरेंद्र गायकवाड, मिलिंद फडतरे, संदेश कुमार नवले, आबा खराडे, स्वप्निल नवले, अनिकेत नवले, किरण नढे, रियाज शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button