- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंचा पनवेल शहरात प्रचार दौरा – तरुण, कामगार, शेतकरी, सर्वसामन्यांच्या प्रश्नांसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्यांनी गद्दारी केली. ज्यांनी पक्ष फोडला. आमदार पळवून महाविकास आघाडीचे सरकार पाडून नियमबाह्य सरकार बनवले. त्या सर्वांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. ते आपण सर्व मिळून करणार आहोत. त्या सोबतच तरुण, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केले. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे…
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले, तीन तलाक पद्धत बंद केली, अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले. तसेच, आता समान नागरी कायदा आणणे ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे प्रमुख काम आहे. सर्वांना सारखाच न्याय देण्याचे काम मोदीजींनी केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपल्या मताची किंमत ओळखून देशाची सूत्रे पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात देण्यासाठी महायुतीचे उमेदवारांना मतदान करणार असल्याची ग्वाही पिंपरी चिंचवड शहरातील सुज्ञ नागरिक देत आहेत. मावळ व शिरुर, बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ भाजपाकडून प्रचाराचा धडाका सूरू…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एकजुटीनं .. दुरदृष्टिनं चला गाजवू मैदान.., राष्ट्रहितासाठी करायचं मतदान.., लोकशाहीचा करायचा सन्मान..,१०० टक्के हो करायच मतदान.., लोकशाहीचा करायचा सन्मान.. हा वासुदेवांचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवड मध्ये सकाळी घुमत असल्याचे दिसते. निमित्त आहे लोकसभा निवडणुकीचे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात ही मतदान जनजागृती होत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्याचे मतदान पार पडले मात्र त्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते आहे, यामुळे आपल्या मावळ लोकसभा मतदार संघात मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी अ. भा. नाट्य परिषदेच्या वतीने हा उपक्रम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटनेकडून जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. या बाबत महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटनेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात वाजंत्री समुहांमध्ये काम करणाऱ्या बहुजन समाजातील तुतारीवादक, शहनाई वादक, हलगी वादक, तसेच बँड पथक बँजो पार्टी, नाशिक बडे ढोल वादक इत्यादी पथकांमध्ये काम करणाऱ्या मालक व चालक कलावंतांसाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून राज्यात एकमेव असणाऱ्या महाराष्ट्र बँक कलाकार उत्कर्ष संघटनेकडून संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र बँक कलाकार उत्कर्ष…
वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचे बैलजोडीस संधी आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – माऊलींचे पालखी सोहळ्यातील रथास यावर्षीचे सन २०२४ साठी बैलजोडीची सेवा देण्याचा मान येथील जेष्ठ नागरिक वस्ताद सहादु बाबुराव कुऱ्हाडे यांचे बैलजोडीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या प्रमाणे बैलजोडी निवड समितीने आळंदी संस्थानला कळविले असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२४ साठी श्रींचे वैभवी पालखी रथास बैलजोडीची सेवा देण्यासाठी निवड समितीची बैठक झाली. या वेळी बैठकीत समितीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, समिती सदस्य पै. शिवाजी रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, रामदास भोसले, ज्ञानोबा वहिले या समिती…
खासदार बारणे यांनी साधला बोपखेल, फुगेवाडीत मतदारांशी संवाद बोपखेल, फुगेवाडीत बारणे यांचा प्रचार दौरा दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बोपखेल व फुगेवाडी भागात प्रचार दौरा काढून मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी फटाके वाजवून व औक्षण करून बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बोपखेल येथील उत्सवानिमित्त ग्रामदैवत बापूजीबुवा महाराज मंदिरात जाऊन खासदार बारणे यांनी दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले तसेच निखिल येवले, उमेश पाटील, कार्तिक गोवर्धन, नामदेव घुले, संतोष…
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पिंपरीगावातूनच ‘घरचा आहेर’!* घरासमोरील रस्ता काँक्रीटचा करता आला नाही तो काय मावळचा विकास करणार – संदीप वाघेरे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आतापर्यंत केलेली विकास कामे दाखवा आणि प्रत्येक कामासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जिंका, असे जाहीर आव्हान माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिले. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पिंपरीगावातून मिळालेला हा ‘घरचा आहेर’ मानण्यात येत आहे. स्वतःच्या घरासमोरील रस्ता कॉंक्रिटचा करता आला नाही, तो काय मावळचा विकास करणार, असा सवालही त्यांनी केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथे केंद्रीय…
“मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो”, “भारत माता की जय”, पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “वोट करेंगे वोट करेंगे, तेरा मई को वोट करेंगे” अशा घोषणा देत, हातात फ्लेक्स द्वारे शहरात भव्य दुचाकी रॅलीकडून मतदान जनजागृती करण्यात आली. प्रबोधन मंच संस्था आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येणा-या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये २२७ दुचाकी व चार चाकी स्वार सहभागी झाले होते. रॅलीचा प्रारंभ पिंपरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून झाला, कार्यक्रमाच्या सुरूवतीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे स्मृती जागर करीत बजाज ऑटोचे शहीद कामगार दत्तात्रय पाडळे यांच्या आकुर्डी येथील पुतळ्यापासून ते कॉम्रेड रुपमय चटर्जी यांच्या पुतळ्यापर्यंत कामगारांची श्रमप्रतिष्ठा जागर फेरी काढण्यात आली. पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे पंकज पाटील, संगीता जोगदंड, विकास कोरे, आण्णा गुरव , अरुण परदेशी, शामराव सरकाळे, भाऊसाहेब गायकवाड, सुरेश कंक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहीद दत्ता पाडळे यांच्या पुतळ्याला भाव पुष्पांजली अर्पण करून कामगार श्रमप्रतिष्ठा फेरीची सुरुवात झाली. याप्रसंगी आप्पा बागल, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, वसंत…
शिवराय आणि बाबासाहेबांना अभिवादन करून हत्ती चिन्ह घरोघरी पोहचविण्याचा निर्धार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर लोकसभा मतदार संघाचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल ओव्हाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुरूवारी (दि.2) आपल्या प्रचाराची सुरूवात केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व नागरिक तसेच, आंबेडकरी व दलित चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी हत्ती चिन्ह घरोघरी पोचविण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला. भोसरीतील अशोक नगर येथील त्रिरत्न बुध्द विहार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला राहुल ओव्हाळ यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच, राहुल ओव्हाळ यांनी भोसरी येथील पीएमटी…
