ताज्या घडामोडीपिंपरी

माऊलींचे पालखी रथास कुऱ्हाडे ग्रामस्थांची बैलजोडी

Spread the love

वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचे बैलजोडीस संधी

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  माऊलींचे पालखी सोहळ्यातील रथास यावर्षीचे सन २०२४ साठी बैलजोडीची सेवा देण्याचा मान येथील जेष्ठ नागरिक वस्ताद सहादु बाबुराव कुऱ्हाडे यांचे बैलजोडीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या प्रमाणे बैलजोडी निवड समितीने आळंदी संस्थानला कळविले असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२४ साठी श्रींचे वैभवी पालखी रथास बैलजोडीची सेवा देण्यासाठी निवड समितीची बैठक झाली. या वेळी बैठकीत समितीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, समिती सदस्य पै. शिवाजी रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, रामदास भोसले, ज्ञानोबा वहिले या समिती पदाधिका-यांचे उपस्थितीत बैठक झाली.

श्रींचे पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून २९ जून ला प्रस्थान होणार आहे. यासाठी श्रींचे पालखी रथास बैलजोडी सेवा ३० जून पासून पालखी सोहळा पंढरपूर येथून आळंदीत परत येई पर्यंतचे पायी वारी पालखी सोहळ्यातील रथास बैलजोडीची सेवा देण्याचा मान येथील ग्रामस्थ सहादु कुऱ्हाडे यांचे परिवारास कुऱ्हाडे कुटुंबीयांतील रोटेशनने देण्याचा निर्णय घेत जाहीर करण्यात आला. सेवेसाठी यावर्षी कुऱ्हाडे घराण्यास रोटेशन ने संधी मिळत आहे. यासाठी आळंदी देवस्थानाकडे आलेल्या कुऱ्हाडे कुटुंबियां कडून अर्ज देण्यात आले होते. यात आलेल्या अर्जावर संबंधितां समवेत चर्चा करीत सुसंवाद साधून बैलजोडी सेवा देण्याचे सक्षम मानकरी यांचे नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला. आळंदीतील जेष्ठ नागरिक वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचे परिवारास यावर्षीची सेवा परंपरेने देण्यात आली. समितीचे पदाधिकारी यांनी घेतलेला निर्णय मानकरी यांचे नावाची शिफारस करून ठराव मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत निवड समितीने सर्वानुमते कुऱ्हाडे कुटुंबियां कडून प्राप्त अर्जावर निर्णय घेत आळंदी देवस्थानला कळविले असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.
श्रींचे पालखी रथास बैलजोडी सेवा देणारे मानकरी सहादु कुऱ्हाडे आणि कुटुंबीयांचा आळंदी देवस्थान व समितीचे वतीने सत्कार करण्यात आला. संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, रामदास भोसले, चेअरमन पांडुरंग वरखडे,ज्ञानेश्वर पोंदे, कुऱ्हाडे परिवारातील सदस्य, समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी या निर्णयाचे स्वागत करीत श्रींचे वैभवी चांदीचे रथाला बैलजोडी जुंपण्याची सेवा देण्याची संधी दिल्या बद्दल वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांनी बैलजोड समितीचे आभार मानले. यावर्षीची सेवा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करीत आनंद झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांचे चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते. त्यांनी अनेक वेळा श्रींचे रथा समवेत पायी वारी केली असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित समिती सदस्यांनी कुऱ्हाडे कुटुंबियांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
बैलजोडी निवड समिती मध्ये इतरांना संधी देण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे. अनेक वर्षांपासून समिती पदाधिकारी बदलण्यात आले नाहीत. यामुळे इतरांना संधी देण्याचा देखील विचार करण्याची गरज आहे. यासाठी या सेवेचे वंश परंपरागत सेवेकरी पांडुरंग वरखडे यांनी केली आहे. या मागणीस न्याय न मिळाल्यास देवस्थानचे अध्यक्ष पुणे जिल्हा प्रमुख व पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश यांचे कडे दाद मागणार असल्याचे निवडी नंतर सांगितले. समितीचा विस्तार आणि बदल करण्याची मागणी आळंदीतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button