- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
अहमदनगर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्वदूर भारत देशात श्रद्धालुंच्या कणाकणात सामावलेले “आनंदबाबा “ म्हणजेच राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषीजी म. या भव्य – दिव्य ऊर्जा शक्तीचा सहवास दीर्घकाळ मिळण्याचे सौभाग्य प्राप्त झाले असे आचार्य भगवंतांचे ज्येष्ठ सुशिष्य महाश्रमण महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदन ऋषीजी म. साब. आचार्य भगवंतांची दीक्षाभूमी असलेले मिरी गाव हे प्रवर्तकश्री जीं चे जन्मगाव, म्हणजेच जन्मतःच आनंद गुरु बरोबर नाळ जोडली गेली होती. पिता श्री चंदनमलजी मेहेर व माता केसरीबाई च्या रत्न कुक्षीत जन्म घेतलेल्या मनसुखने तनाच्या स्वास्थप्राप्तीसाठी आचार्य भगवंतांची शरण स्वीकारली आणि भर यौवनात तत्क्षणी मन परिवर्तन होऊन आत्म सुखाचा संयम मार्ग पत्करला. जैन…
प्रिया देशमुख व मेघराज लोखंडे यांच्या तत्परतेमुळे मुख्य पाईप लाइन दुरुस्त करून बंद असलेला पाणीपुरवठा केला चालू ..! नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी ( प्रभाग ४५ ) नवी सांगवी मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य रस्त्या वर सी.सी.टीव्ही चे काम करताना समता नगर गल्ली नो.१ नवी सांगवी येथील मुख्य पाईपलाईन फुटल्याने २ तास पाणी वाया जात असून सी.एम.ई कॉलनी येथील पाणीपुरवठा दोन तास बंद करण्यात आला होता त्या मुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत मेघराज लोखंडे ( चिंचवड विधान अध्यक्ष सभा ),राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर ( जिल्हा ) व प्रिया देशमुख वरिष्ठ मार्गदर्शक…
पिंपळे सौदागर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहिल्या टप्प्यात पिंपरी- चिंचवडचा स्मार्ट प्रकल्पात समावेश नव्हता. विशेष पाठपुरावा करून आपण तो समावेश करवून घेतला. त्यामुळे पिंपळे सौदागर भागाचा कायापालट झाला. नजिकच्या भविष्यात वाकडहून चाकणला जाणारी मेट्रो पिंपळे सौदागर भागातून जाणार असल्यामुळे या भागाचा विकास अधिक गतिमान होईल, असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपळे सौदागर भागातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल शिवार गार्डन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल तथा नाना काटे, स्थायी…
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेन्झेंन (चीन) येथे जागतिक स्तरावर विपॅक 2024 उच्च दर्जाची दोन दिवशीय विकास परिषद संपन्न झाली पॅकेजिंग आणि प्रिंटिंग पल्प, मोल्डिंग डेव्हलपमेंट, फ्लेक्सिओग्राफिक प्रिंटिंग समिट, डिजिटल फोरम आदी क्षेत्रातील जर्मनी, तैवान, जपान आदी देशासमवेत भारत देशातील 800 उद्योजकांचा समावेश होता त्यात पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील पॅकेजिंग कोरोगेटेड बॉक्स चे उत्पादक करणारे सनराईज इंडस्ट्रीजचे उद्योजक भावेश दाणी, वैष्णवी पॅकेजिंग चे अनिल भालेकर, बॉक्स लाईनचे राजेंद्र काकडे, एन.के. कमर्शियलचे पुनीत खिंवसरा, म्हेत्रे पॅकेजिंग चे दिलीप म्हेत्रे, उद्योजक शशांक शिंदे, निलेश शिंदे यांनी विकास परिषदेमध्ये सहभाग नोंदविला. त्यावेळी चीनच्या आयोजकांनी खास इंडिया डे चे आयोजन केले होते. त्यावेळी…
डीनर विथ सोल्जर्स उपक्रमात श्रोते युद्धकथांमध्ये तल्लीन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “राष्ट्र आणि राष्ट्रहित प्रथम हे सैनिकांचे ब्रीद असते आणि निवृत्तीनंतरही ते प्राणपणाने जोपासण्याचा प्रत्येक सैनिक प्रयत्न करीत असतो!” असे विचार निवृत्त ब्रिगेडियर मधुकर प्रचंड यांनी प्राधिकरण येथे व्यक्त केले. महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे जिल्हा भारतीय भूतपूर्व सैनिक संघ आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीनर विथ सोल्जर्स अर्थात सैनिकांसोबत स्नेहभोजन या विशेष उपक्रमात सार्जंट जयंत टोपे, हेमंत काजळे, धनंजय लोखंडे, डी. आर. पडवळ, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राष्ट्रवादी (अजित पवार गटाच्या) प्रदेश सचिव शीला भोंडवे, शिवसेना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे मतदान १३ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३,७३,४४८ मतदारांपर्यंत येत्या आठवड्याभरात व्होटर स्लीप ( मतदार चिठ्ठी ) पोहचविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी अंतिम झाल्यामुळे व्होटर स्लीप ( मतदार चिठ्ठी ) वाटप सुरु करण्यात आलेले आहे. पिंपरी मतदारसंघांतर्गत ४०० मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार व्होटर स्लीपचे वाटप करण्यासाठी ४०० बूथ स्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नेमणूक करण्यात आलेली असून बीएलओ घरोघरी जाऊन व्होटर स्लीपचे वाटप करीत आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधुन व्होटर स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. शिवाय मनपाच्या ८ क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार…
वरुण सरदेसाई यांच्यासोबत हाती मशाल घेऊन युवासैनिक सहभागी पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या वतीने शहरात “मशाल यात्रा” काढण्यात आली. युवासेनेचे मुख्य सचिव वरुण सरदेसाई यांच्यासोबत हाती मशाल घेऊन असंख्य युवासैनिक या यात्रेत सहभागी झाले. उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ युवा सेनेचे मुख्य सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते मशाल पेटवून या मशाल यात्रेची सुरुवात रहाटणीतून करण्यात आली. रहाटणी परिसरानंतर काळेवाडी, अमरदीप कॉलनी, पिंपरी बाराजपेठ, डीलक्स चौक, पिंपरीगाव, पिंपरी सौदागर यासह विविध भागातून मशाल यात्रा काढून प्रचार करण्यात आला. या मशाल यात्रेत “जय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ.धनंजय भिसे यांच्या ‘अण्णा भाऊ साठे लिखित माझा रशियाचा प्रवास :एक आकलन’ या संशोधानात्मक ग्रंथास चैत्रपालवी काव्य मंच व कवी चंद्रकांत जोगदंड ग्रुप यांचा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै गंगाधर श्रावण आबक स्मृति पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे एस.एम.कॉलेज हडपसर येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. धनंजय भिसे हे नामवंत वक्ते,सूत्रसंचालक आणि सामाजिक व साहित्यिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे. गेली अनेक वर्षापासून साहित्य चळवळ आणि सामाजिक चळवळीमध्ये अनेक वर्षापासून सक्रिय सहभाग आहे. अनेकविध पुस्तकांचे विविध वाङ्मयप्रकारांतून त्यांनी लेखन केले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य चळवळीत महत्वाचे योगदान त्यांनी दिले…
आळंदीत पावसाळ्या पूर्वी स्वच्छता कामांस गती देणार ; मुख्याधिकारी केंद्रे आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) / येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला जलपर्णीच्या विळखा पडल्याने नद्यांचे पावित्र्य जतनासाठी तसेच इंद्रायणी नदीचे प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊल भावी पिठीसाठीचा संदेश देत इंद्रायणी नदी उगम तें संगम प्रदूषण मुक्तीसाठी इंद्रायणी परिक्रमा अंतर्गत घाटावर इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी विविध सेवाभावी संस्था जनजागृतीसह स्वच्छता सेवा कार्य करीत आहेत. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून इंद्रायणी नदीतील जलपर्णी नदी पात्रातून बाहेर काढण्याचे कार्य सुरु असून ते संथ गतीने सुरु आहे. अवघ्या ५७ दिवसावर आळंदीतून पंढरीस लाखो भाविक वारकरी यांचे उपस्थितीत माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था म्हणजेच हाउसिंग सोसायटी वाढत आहेत. त्यांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न सप्टेंबरपर्यंत सुटलेला असेल, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनी शहरातील विविध सोसायटी यांना सदिच्छा भेट देऊन तेथील मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, महाराष्ट्र केसरी पैलवान विकी तथा विजय बनकर तसेच महायुतीचे पदाधिकारी होते. पुनावळे…
