ग्राहकांच्या अपेक्षापूर्तीसाठी आपले ज्ञान वृद्धींगत करणे ही काळाची गरज उद्योजक : भावेश दाणी
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेन्झेंन (चीन) येथे जागतिक स्तरावर विपॅक 2024 उच्च दर्जाची दोन दिवशीय विकास परिषद संपन्न झाली पॅकेजिंग आणि प्रिंटिंग पल्प, मोल्डिंग डेव्हलपमेंट, फ्लेक्सिओग्राफिक प्रिंटिंग समिट, डिजिटल फोरम आदी क्षेत्रातील जर्मनी, तैवान, जपान आदी देशासमवेत भारत देशातील 800 उद्योजकांचा समावेश होता त्यात पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील पॅकेजिंग कोरोगेटेड बॉक्स चे उत्पादक करणारे सनराईज इंडस्ट्रीजचे उद्योजक भावेश दाणी, वैष्णवी पॅकेजिंग चे अनिल भालेकर, बॉक्स लाईनचे राजेंद्र काकडे, एन.के. कमर्शियलचे पुनीत खिंवसरा, म्हेत्रे पॅकेजिंग चे दिलीप म्हेत्रे, उद्योजक शशांक शिंदे, निलेश शिंदे यांनी विकास परिषदेमध्ये सहभाग नोंदविला. त्यावेळी चीनच्या आयोजकांनी खास इंडिया डे चे आयोजन केले होते. त्यावेळी उद्योजक भावेश दाणी यांनी विपॅक विकास परिषदेचे मुख्य संयोजक टाटे डाय यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
विकास परिषदेमध्ये संयोजकाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्योजक भावेश दाणी म्हणाले, जुन्या युक्त्या सध्याच्या काळात चालत नाही त्यात सतत सुधारणा करणे आवश्यक असते उत्पादन अधिक गुणवत्तेचे थोडेसे लवकर व कमी खर्चात केले तर व्यवसायात भरभराट करता येते नवीन तंत्रज्ञानाची माहिती जागतिक परिषदेमध्ये मिळण्यास मदत होते. जगभरातील उद्योजक जागतिक स्पर्धेला आज तोंड देत आहेत. या जीवघेण्या स्पर्धेत टिकायचे असेल तर आपल्या उत्पादकाची संपूर्ण गुणवत्ता याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
उत्पादनातील नाविन्य उत्पादनाची गुणवत्ता स्पर्धात्मक किंमत ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यांच्या अपेक्षापूर्ती करणे ही काळाची गरज आहे. पॅकेजिंग कोरोगेटेड बॉक्सचे भविष्य 2032 पर्यंत तीन पटीने वाढेल असा अंदाज आहे. येथील उत्पादित मालाला भारताबरोबरच जगभरातून मागणी येईल कारण येथील उद्योजक नाविन्याची कास अंगीकारत आहे. भारत देशातील उद्योजक ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे उत्पादन व सेवा देत आहे, याचा एक उद्योजक म्हणून अभिमान वाटत आहे.