- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
केंदूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बारा गावांच्या दुष्काळ संपवायचा आहे आणि तो हा अजित पवार संपवेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाबाबत मार्ग काढलेला आहे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव यांनीही प्रयत्न केल्याने या प्रश्नाबाबत सर्व्हेक्षणाचे आदेशही झालेले आहेत. त्यामुळे मी आत्ताच शब्द देतो बारा गावांचा दुष्काळ मी संपविणार फक्त मतदानात बिल्कूल हयगय न करता शिवाजीराव आढळरावांना विजयी करा असे म्हणत अजित पवार यांनी केंदूर (ता.शिरूर) येथील प्रचार सभा गाजविली. केंदूर येथील श्रीराम चौकात सभा सुरू होताच अजित पवार यांनी थेट आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांना बोलायला दिले. सौ.साकोरे यांनी या भागाती दुष्काळ, येथील पाणी प्रश्न आणि त्यासाठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच पुरपरिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा, असे निर्देशही आयुक्त सिंह यांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात पावसामुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांचे पूर्व नियोजन करण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या एकूण १४४ नाल्यांची साफसफाई करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच पावसाळ्याच्या अनुषंगाने महानगरपालिका हद्दीत पुरपरिस्थितीत उद्भवू नये तसेच सखल भागात पाणी साचू नये यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त…
पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवार १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक पोलीस यंत्रणेच्या आराखड्याबाबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर तसेच निवडणूक पोलीस निरीक्षक विवेकानंद सिंग यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी आढावा घेतला. रायगड पोलीस आणि नवी मुंबई पोलीस कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या मावळ लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा सुरक्षा नियोजन आराखड्याविषयी आढावा घेण्याच्यादृष्टीने आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील नविन प्रशासकीय कार्यालयात विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीस रायगड ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सोमनाथ…
डॉक्टर व वकिलांच्या समस्या चर्चेतून सोडवणार – बारणे नागरिकांचा जगण्याचा हक्क व मालमत्तेचा हक्क यांचे केले मोदींनी रक्षण – प्रशांत ठाकूर पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉक्टर व वकील या दोघांचे समाजासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील तसेच मागण्यांची पूर्तता देखील करण्यात येईल, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनी खांदा कॉलनी येथील खान्देश हॉटेलमध्ये डॉक्टर व वकिलांसाठी ‘नमो संवाद’चे आयोजन केले होते. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, पनवेलच्या माजी…
कळंबोली,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी खारघर आणि कळंबोली शहरात महायुतीच्या वतीने भव्य बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. कळंबोली शहरात रात्री झालेल्या सभेत खासदार बारणे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. खासदार बारणे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये व सभेस आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे तसेच भाजप व महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बारणे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत देशाला…
– संजोग वाघेरे पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपळे निलख येथे काँग्रेसच्या वतीने घरोघरी जाहीरनाम्याचे वाटप करण्यात आले. दहा वर्षे भाजपने खोटी आश्वासने देऊन देशवाशियांची घोर फसवणूक केली आहे. फसव्या भाजप सरकाराल हटविण्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले, फसव्या भाजपाला हटविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. या वेळी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि आसाम राज्याचे प्रभारी पृथ्वीराज साठे, संजय साठे, दादा टकले, अमित कांबळे, नितीन थोपटे, आकाश साठे, ऋषिकेश साठे, माणिक भांडे, सचिन…
चारशेपार सोडा भाजपचे दोनशे पार जाणे कठीण- आदित्य ठाकरे पनवेल (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आत्तापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता इंडिया आघाडीकडे मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ४०० तर सोडा, २०० पार जाणं सुद्धा भारतीय जनता पार्टीला कठीण असेल, असे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पनवेल येथे रोडशोसाठी आले असता म्हणाले. ते ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आले होते. पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर येथून आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला प्रारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांचे झेंडे लावत भव्य मोटार सायकल रॅली काढली होती.…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आज ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.
– भाजपा आमदार महेश लांडगे यांचे शिरुर मतदार संघात आवाहन – ४ कोटींहून नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या सरकारला पाठिंबा द्या पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ च्या माध्यमातून देशातील तब्बल ४ कोटीहून अधिक नागरिकांना हक्काचे घर मिळाले. पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १९ हजार घरे या योजनेतून निर्माण झाली आहेत. गोरगरिबांना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रभावी धोरण ठरवणाऱ्या मोदी सरकारला आणि शेवटच्या घटकाचा विकास अजेंडा राबवणाऱ्या महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी-…
मविआ किंवा महायुतीपेक्षा बीएसपी हाच सक्षम पर्याय – राजाराम पाटील मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांना बहुमताने विजयी करा बीएसपीचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या काळात भारतीय संविधान अक्षरशः पायदळी तुडवले आहे. या भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि उपेक्षित समाज घटकांना न्याय देऊन सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष काशीरामजी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारून बीएसपीचे आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी लोकसभा निवडणुकींना सामोरे जात आहे. मायावतीजी यांना पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या हत्ती चिन्ह समोरील…
