- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी अर्थ मंत्री व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नामदार जयंत पाटील यांच्या हस्ते तसेच मेहबूब भाई शेख रा.यु.काँ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व इम्रानभाई शेख युवक शहराध्यक्ष पिं-चिं शहर यांच्या मान्यतेने मेघराज लोखंडे ह्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. प्रभागातील तसेच शहरातील युवक व सामाजिक क्षेत्रातील लोकसंपर्क दांडगा असून त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रपवार पक्षास होणार आहे मेघराज लोखंडे म्हणाले, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांनी मी प्रेरित होऊन राजकारणात आलो सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक युवक शहराध्यक्ष इम्रान…
शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुटुंबासोबत घरातील कामधेनु गाईची पूजा-अर्चा केली. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता सहकुटुंब लांडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केले.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे. कलाकारही मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावीत आहेत. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या मतदान केंद्रावर जात मतदान केले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, की मतदानादिवशी मतदार इकडे तिकडे फिरायला जातात असे मला वाटत नाही. लोक मतदान करत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतात. लोकांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. त्यामुळे कोणाला मत द्यावे, का द्यावे, त्यातून का होणार आहे पुढे असे बरेच प्रश्न लोकांसमोर निर्माण झाले आहेत. या प्रश्नांना उत्तर द्यायचे असेल, किंबहुना हे का घडतेय, त्याच्या बद्दल प्रश्न विचारायचे असतील, तक्रारी करायच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अजमेरा काॅलनी, पिंपरी येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी सपत्नीक मतदान केले. *हरित मतदान केंद्र* आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून शहरात महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने नागरिंकांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक संदेशाचा प्रचार व्हावा यासाठी चार हरित मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. उद्यान विभागाचे उप आयुक्त रविकिरण घोडके तसेच सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी २४२ आयुर्वेदिक वनस्पतीं, नक्षत्र वाटिका आणि आयुर्वेदिक औषधी वृक्ष यांची माहिती देणारे फलक तसेच मतदान झाल्यानंतर पर्यावरणाचा संदेश प्रदर्शित करणारे आकर्षक सेल्फी पॉईंट लावण्यात आले आहेत.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदाताई तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे चिरंजीव डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूल मध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. नंदाताई तुळसे या मागील अनेक वर्षांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहेत. आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण आगामी काळात काम करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मतदान केंद्रात कशा पध्दतीने मतदान प्रक्रिया पार पडते? याबद्दल अनेक जण अनभिज्ञ हाेते. मात्र, पहिल्यांदा मतदानाला आल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून आले. राजकारणाबाबत तरूणाई सजग झाली आहे. काेण काेणते उमेदवार लाेकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत ? त्यांची वैयक्तीक, काैटुंबिक, राजकीय पार्श्वभूमी आहे ? सध्याचे राजकीय समीकरणे काय आहेत ? या सर्व बाबींचा अभ्यास करून ते सजगतेने आत्मविश्वासाने मतदान करताना दिसून आले. महापालिका निवडणूका दाेन वर्षापासून रखडल्यामुळे अठरा वर्षे पूर्ण हाेऊनही अनेक तरूणांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लाेकसभा निवडणूकीपर्यंत वाट पहावी लागली. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरूणाईची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. भर उन्हात सळसळत्या उत्साहात तरूणाईने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी (दि.१३) रोजी सकाळी ७.४५ च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. पिंपरी वाघेरे येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय या केंद्रावर संजोग वाघेरे पाटील यांनी कुटुंबासोबत मतदान केले. संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत पत्नी उषा वाघेरे, पुत्र ऋषिकेश वाघेरे यांच्यासमवेत मतदान केले.
थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज (सोमवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगावच्या संचेती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (बूथ नं 218) या मतदान केंद्रावर परिवारासह रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. खासदार बारणे हे पत्नी सरिता, पुत्र प्रताप व विश्वजीत, सून स्नेहा यांच्यासह मतदान केले. त्यावेळी त्यांचा अडीच वर्षांचा नातू राजवीर काही त्यांच्या समवेत होता. संपूर्ण मतदारसंघात मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सर्व मतदार देशहितासाठी, दिवसाच्या उज्वल भवितव्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी उस्फूर्तपणे मतदान करीत आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी कायम राष्ट्राला आणि स्वराज्याला पहिले प्राधान्य दिले. एका आदेशावर स्थानिक मराठा सैनिक त्या त्या वेळेला लढले. परंतु, महाराष्ट्राच्या अस्मितेला, सुसंस्कृत राजकीय परंपरेला डाग लावण्याचे काम गद्दारांमुळे झाले. हा डाग पुसण्याचे काम आपल्याला या निवडणुकीत करायचे आहे. म्हणूनच मावळ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला साथ देण्यासाठी मशाल चिन्हाला मत देवून संजोग वाघेरे पाटील यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते प्रा. नितीन बानगुडे यांचे मतदारांना आवाहन केले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार, दिनांक 11…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी येणाऱ्या मतदारांकडे ओळख मतदान चिट्टी ( फोटो वोटर स्लीप) असणे अनिविवार्य आहे. मतदाराकडे भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पुराव्यांपैकी किमान एका पुराव्याची मूळ प्रत असणे आवश्यक आहे. डिजिटल लॉकर मधील सॉफ्ट कॉपी ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध असून कोणीही मतदान केंद्राच्या १०० मीटर क्षेत्रात सोबत मोबाईल आणू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर नियमाधीन कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मावळ लोकसभा मतदार…
