- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रतील दिग्गज उद्योजकांचा सहभाग असलेल्या Tycoons of Asia आणि मराठी उद्योजक अंतर्गत Tycoons of महाराष्ट्र अवार्ड पुणे येथील ओम गगनगिरी वास्तू कन्सल्टन्सी यांना नुकताच देण्यात आलेला आहे . आपल्या सौदर्य मुळे आणि उत्तम अभिनय शैलीमुळे चाहत्यांच्या मनाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री, ” दुर्वा ” स्टार प्रवाहावर, “फुलपाखरू” झी युवा वर , “मन उडू उडू झालं” झी मराठी वर या मालिका,मराठी चित्रपट ‘ टाईमपास-3’ आणि “अन्यन्या ” ,एका काळेचे मनी ही वेबसिरीज , महाराष्ट्र टाइम्स सन्मान अवार्ड ,झी युवा सन्मान, झी नाट्य गौरव पुरस्कार, लोकमत पुरस्कार अशी मराठी इंडस्ट्री मधील महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा…
शिवछत्रपतींची आणी महाराष्ट्राची अस्मिता दुखावली. पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप हा त्यांची विशेष ओळख आहे . शौर्य आणि पराक्रमाचे धाडस, निष्ठा, शिवसाम्राज्याचे प्रतीक म्हणून हा टोप ओळखला जाते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी मोदी यांची मर्जी मिळवून त्यांना खुश करण्यासाठी मोदी यांच्या डोक्यात जिरेटोप घातल्याने शिवछत्रपतीचा, शिवभक्तांचा अवमान झाला आणि महाराष्ट्राची अस्मितेचा,शौर्याचा अवमान पटेल यांनी केला आहे. आता त्यांचे डोके ठिकाणावर आणण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन तर्फे देण्यात आलेल्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरे टोप घालण्याचा केला निषेध पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिरे टोप ही छत्रपती शिवरायांची ओळख आहे.तर शिवछत्रपती हे संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे.मात्र शिवरायांचा जिरे टोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालून शिवरायांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. शिवरायांच्या अवमान प्रकरणी पटेल यांनी त्वरित महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी.अन्यथा त्यांना संभाजी ब्रिगेड धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, छत्रपती शिवरायांच्या कार्यापासून महाराष्ट्रासह देश प्रेरित आहे. महाराजांनी घालून दिलेला आदर्श अनेक जण जपत आहेत. महाराज आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झाली. पण, मतदानात चुरस दिसून आली नाही. मागीलवेळीपेक्षा पाच टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार याचे आखाडे बांधण्यास सुरुवात झाली आहे.मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ५५.४२ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी आहे. मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ५५.४२ टक्के मतदान झाले असून घाटाखालील उरण, कर्जत विधानसभा मतदारसंघात, सर्वाधिक तर पनवेलमध्ये सर्वांत कमी मतदान झाले. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे तसेच टपाली मतपेट्या आज बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून कडेकोट बंदोबस्त असणारी ही स्ट्राँगरूम आज सील करण्यात आली. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सीआरपीएफचे सुभेदार दुर्गेश कुमार मीना तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे…
संभाजी महाराज प्रागतिक विचारांचे राजे:सतीश काळे पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजा हा राज्याचा धनी नसतो तर तो रयतेचा सेवक असतो,हे शिवरायांनी घालून दिलेले धोरण छत्रपती संभाजीराजेंनी तंतोतंत आचरणात आणले. संभाजीराजांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही.अत्यंत प्रागतिक विचारांचे होते.त्यांनी कर्मकांड,अंधश्रद्धा याला थारा दिला नाही,असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले. शाहूनगर बर्ड व्हॅली येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी काळे बोलत होते.या वेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे जिल्हा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन आणि दुचाकी रॅली घेऊन भोसरी आणि एमआयडीसी येथे छत्रपती संभाजी महाराजांना छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेशध्यक्ष अध्यक्ष अभय भोर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून आणि आरती सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते घेण्यात आली. यावेळी पेढे वाटून सर्व कार्यकर्त्यांचे तोंड गोड करण्यात आले तसेच मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक देखील अवंतिका भोर हिने केले यावेळी सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून छावा ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष श्री अभय भोर यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्रपती संभाजी राजांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत आणि येणाऱ्या पिढीमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर शंभू विचार हे मनामनात भीनवले पाहिजे . आजकाल प्रत्येक तरुणाने आणि तरुनीने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात आज निवडणूक पार पडली आहे. महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यात थेट लढत झाली आहे. आज एकूण ६ वाजेपर्यंत या मतदारसंघात ५२.९ टक्के एवढे मतदान झाले आहे. दरम्यान सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३८ %, सकाळी ११ वाजेपर्यंत १४.८७%, दुपारी १ वाजेपर्यंत २७.१४ %, दुपारी ३ वाजेपर्यंत ३६.५४ %, तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४६.०३ % एवढे मतदान झाले होते. विधानसभा मतदार संघ नुसार टक्केवारी अंतिम मतदान टक्केवारी.. पनवेल – ४९.२१ % कर्जत – ६०.१२ % उरण – ६४.७५ % मावळ – ५३.०२ % चिंचवड – ४९.४३ % पिंपरी…
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.बोर्ड) इयत्ता 10 वी. 12 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले. 10 वी. गायत्री साळुंके 94.8 टक्के-प्रथम क्रमांक, मंदार कदम 93.6 टक्के-द्वितीय क्रमांक, संस्कृती काटकमवार 92.6 टक्के-तृतीय क्रमांक, निशांत मथड 92.6 टक्के-तृतीय क्रमांक, रुचिता एतिडे 92.4 टक्के-चतुर्थ क्रमांक, शांभवी पिकले 92.2 टक्के-पाचवा क्रमांक संपादन केला. तसेच 106 विद्यार्थांपैकी 90 टक्केच्या वरती 11 विद्यार्थांनी गुण संपादन केले आहे. 12 वी. शर्वरी कुलकर्णी 94.6 टक्के-प्रथम क्रमांक, तनिष्का लोहिया…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मधुश्री कला आविष्कार आणि स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक १६ मे २०२४ पासून तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, सेक्टर २७, प्लॉट नं. ५१३, संत तुकाराम उद्यानासमोर, निगडी प्राधिकरण येथे दररोज सायंकाळी ठीक ६:३० वाजता व्याख्यानमाला सुरू होणार असून तपशील खालीलप्रमाणे आहे. गुरुवार, १६ मे रोजी ‘कलारसिक ते सिनेनिर्माते’ या विषयावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे प्रथम पुष्प गुंफतील. कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे अध्यक्षस्थान भूषविणार असून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांची…
