छावा ब्रिगेड संघटना आणि दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन आणि दुचाकी रॅली घेऊन भोसरी आणि एमआयडीसी येथे छत्रपती संभाजी महाराजांना छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेशध्यक्ष अध्यक्ष अभय भोर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून आणि आरती सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते घेण्यात आली.
यावेळी पेढे वाटून सर्व कार्यकर्त्यांचे तोंड गोड करण्यात आले तसेच मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक देखील अवंतिका भोर हिने केले यावेळी सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून छावा ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष श्री अभय भोर यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्रपती संभाजी राजांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत आणि येणाऱ्या पिढीमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर शंभू विचार हे मनामनात भीनवले पाहिजे .
आजकाल प्रत्येक तरुणाने आणि तरुनीने आपली शरीर संपदा आरोग्य हे जपले पाहिजे आणि ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या ठिकाणी पुढाकार घेऊन अन्याय सहनही करू नये आणि करणाऱ्याला योग्य ती कायद्यात राहून समज देता यावी एवढी हिंमत प्रत्येकामध्ये आली पाहिजे तरच राज्यामध्ये शांती नांदेल आणि शंभूराजे यांच्या विचारावर संपूर्ण देश चालेल छत्रपती संभाजी महाराज यांना अनेक भाषा अवगत होत्या त्यामुळे समाजामध्ये धर्माचे भाषेचे आणि सत्तेचे राजकारण होता कामा नये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान लक्षात घेऊन आपला महाराष्ट्र सुजलम सुफलम घडाविण्यात प्रवृत्त व्हावे यावेळी उद्योजक श्री शिवाजीराव पाटील चिंचवड ॲक्सिस बँकेचे मॅनेजर धीरज सिंग, दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर , श्री कल्याण पांचाळ स्वप्निल कदम सचिन गायमुक्ते, माधवराव इनबितवार, सोन्या सुरवसे, सुभाष शाहू ,सुंदर एरंडे ,माया खंडाळे, दुर्गा गायमुक्ते, शालन वाघमारे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने आपले विचार या ठिकाणी मांडले आणि रॅलीमध्ये प्रत्येकाने भगवेध्वज हातात घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने घोषणा करून परिसर दुमदुमला समारंभाचे आभार दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी केले.