डॉ. रेखा मोहन भोळे यांना Tycoons of महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रतील दिग्गज उद्योजकांचा सहभाग असलेल्या Tycoons of Asia आणि मराठी उद्योजक अंतर्गत Tycoons of महाराष्ट्र अवार्ड पुणे येथील ओम गगनगिरी वास्तू कन्सल्टन्सी यांना नुकताच देण्यात आलेला आहे .
आपल्या सौदर्य मुळे आणि उत्तम अभिनय शैलीमुळे चाहत्यांच्या मनाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री, ” दुर्वा ” स्टार प्रवाहावर, “फुलपाखरू” झी युवा वर , “मन उडू उडू झालं” झी मराठी वर या मालिका,मराठी चित्रपट ‘ टाईमपास-3’ आणि “अन्यन्या ” ,एका काळेचे मनी ही वेबसिरीज , महाराष्ट्र टाइम्स सन्मान अवार्ड ,झी युवा सन्मान, झी नाट्य गौरव पुरस्कार, लोकमत पुरस्कार अशी मराठी इंडस्ट्री मधील महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा अभिनेत्री ऋचा दुर्गुळे यांच्या हस्ते नुकताच नाशिक येथे वास्तू एक्सपर्ट तसेच ओम गगनगिरी वर्ड फाउंडेशन च्या CEO फाउंडर डॉ. रेखा मोहन भोळे यांना Tycoons of महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वास्तुशास्त्र जे पुरातन काळापासून मानवी जीवनाला दिशा देण्यासाठी वैज्ञानिक व गणिती आयामा द्वारे सिद्ध झालेले आहे .जसा जसा मानवाचा बौद्धिक विकास झाला तसा तसा तो राहतांना म्हणजेच घर उभारताना निसर्गाच्या चक्राचा अभ्यास करू लागला व त्यामध्ये काळानुसार बदल ही करू लागला ,यातूनच अनेक देशांमध्ये विविध शास्त्रे उद्या ला आली त्यामध्ये महत्वाचे वास्तू संबंधातील शास्त्र ओम गगनगिरी वास्तू कन्सल्टन्सी च्या माध्यमातून तसेच महान गुरुवर्य परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या प्रेरक आशीर्वादातुन डॉ.रेखा भोळे यांनी पुणे, नाशिक, मुंबई, जळगांव, देशा बाहेर दुबई यासारख्या शहरांमध्ये राहत असलेल्या ठिकाणी 5640 कुटुंबियातील दैनंदिन जीवनात आलेल्या अडचणी व त्यासंबंधी निर्माण झालेले प्रश्न शाश्रोक्त पद्धतीने सध्या चिंचवड पुणे या ठिकाणी राहत असलेल्या डॉ. रेखा मोहन भोळे यांनी सोडवलेले आहेत निरंतर त्याचे कार्य सुरू असते, याचा विचार करूनच Tycoons of Asia यांनी पुरस्काराकरिता निवड केल्याचे निरीक्षकांनी नमूद केले,आपण करत असलेल्या कार्याची दखल घेतल्याने यापुढे अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळाल्याचे डॉ. रेखा यांनी मत व्यक्त केले.
नाशिक येथील प्रसिद्ध डॉ. प्रमोद महाजन व त्याच्या पत्नी यांनी देखील डॉ. रेखा यांच्या कार्याची वाखाणणी केली, त्यानी त्याच्या जीवनात असेच लोकांना मार्गदर्शन करून लोकांच्या अडचणी सोडवून सुख समृद्धी आणावी अशा भावी आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या,