- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी (पिंपरी) येथे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष श्री. योगेश मंगलसेन बहल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी योगेश बहल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न, दूरदर्शी आणि प्रजेचे कैवारी राजे होते. संकटसमयी धैर्य न गमावता शिताफीने शत्रूंवर मात करत त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढत स्वराज्य उभारणारे शिवराय महाराष्ट्राच्या अस्मितेचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट व प्रदेश…
महानगरपालिकेच्या वतीने थेरगाव येथील डांगे चौक येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा’ कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवजन्माची पावन पहाट… राजमाता जिजाऊंच्या संस्कारांची तेजस्वी छाया… तोरणा जिंकत स्वराज्याची रोवलेली पहिली मुहूर्तमेढ… लाल महालातील शौर्यगाथा… राज्याभिषेकाच्या सुवर्णक्षणाने साकारलेले हिंदवी स्वराज्य… असा शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा तेजस्वी प्रवास साकारत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय जीवनकार्याला शाहिरी पोवाड्यातून मानवंदना अर्पण करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याला आणि व्यापक विचारधारेला अभिवादन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण येथे नवीन अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या काम सुरू आहे. या इमारतीच्या कामाची महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी संबधित अधिका-यांकडून कामाची माहिती घेत काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य़ विभागाअंतर्गंत निगडी प्राधिकरण येथील डाॅ.हेडगेवार भवनाजवळ अत्याधुनिक अशा अग्निशमन क्रेंद्राचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या उपमहापौर बाबर यांनी स्थापत्य विभागाच्या अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे आणि संबधित अधिकारी यांच्यासह भेट दिली. अधिका-यांनी उपमहापौर शर्मिला बाबर यांना या कामाची माहिती दिली. दहा मजली इमारतीत…
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील तब्बल २५ हजार ७७९ विद्यार्थी जाणार परीक्षेला सामोरे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इयत्ता दहावीच्या राज्य मंडळाची लेखी बोर्ड परीक्षा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ पासून होत आहे. या परीक्षेसाठी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात एकूण ५१ परीक्षा केंद्रांवर तब्बल २५ हजार ७७९ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना महापौर रवि लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित, शांत आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भोसरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन शनिवार, दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 5 वाजता निरगुडे या गावी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया व निरगुडे गावातील मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उत्साहात संपन्न झाले. हे शिबिर दिनांक 14 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. .या प्रसंगी बोलताना डॉ अशोककुमार पगारिया म्हणाले ” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम १९६९ पासून सुरू झाला आहे ,या योजनेच्या माध्यमातून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चौकात आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला आणि त्यांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली. शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार उमा खापरे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, सरचिटणीस वैशाली खाडये, माजी नगरसेवक राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव आणि मंडलाध्यक्ष मंगेश धाडगे यांनी आपल्या भाषणातून सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र…
हस्तकला, खाद्यपदार्थ, गृहउद्योग उत्पादने आणि पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी महिला बचत गटांना नावनोंदणीचे समाज विकास विभागाचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या समाज विकास विभागामार्फत दि. २५ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर ‘पवनाथडी जत्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्यांचा विकास करणे तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन करणे हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी पवनाथडी जत्रा ही महिला उद्योजिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असून…
फार्मासिस्ट सहकारी महापौर झाल्याने पिंपरी चिंचवडमधील केमिस्ट बंधू-भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून केमिस्ट व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी, नियमावली सुलभ करण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न राहील. शहराच्या सर्वांगीण विकासात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देत, प्रशासन आणि व्यावसायिक यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येईल. पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनतर्फे ‘माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान’ या गौरवचिन्हाने केलेला सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे. मी स्वतः फार्मासिस्ट असल्यामुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील जबाबदाऱ्या आणि आव्हाने जवळून अनुभवलेली आहेत. समाजाच्या आरोग्य सुरक्षेत केमिस्ट बंधू-भगिनींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हा सन्मान माझा नसून संपूर्ण…
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ मध्ये विशेष शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण….गातो शिवरायांचे गुणगान जी..जी..जी..” अशी डफावर थाप पडते आणि शाहिरांच्या कंठातून बाहेर पडतात,शिवरायांचे गुणगान गाणारे स्फूर्तीदायक शब्द….अशा उत्साहपूर्ण वातावरणात नामवंत शाहिरांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शाहिरीच्या ओजस्वी स्वरांतून मानवंदना अर्पण केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिरीतून मानवंदना’ या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्दांतून उभा राहिला स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास, तालांतून झंकारली शौर्याची अखंड परंपरा आणि स्वरांतून प्रकट झाला स्वाभिमानाचा जाज्वल्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी खरेदी केलेली तीन चाकी फिरती ई-वाहने गेल्या दोन महिन्यांपासून दिव्यांग भवनाच्या पार्किंगमध्ये धूळ खात पडून आहेत, ही बाब अत्यंत संतापजनक व धक्कादायक आहे. डिसेंबर महिन्यापासून वाहन वाटप रखडले असून एकाही लाभार्थ्याला वाहन देण्यात आलेले नाही. यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड असंतोष व संताप निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे दिव्यांगांच्या हक्कांवर गदा येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-वाहने वाहने दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात यावी, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त तसेच महापौर यांना दिलेल्या निवेदनात…
