पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी (पिंपरी) येथे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहराध्यक्ष श्री. योगेश मंगलसेन बहल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी योगेश बहल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न, दूरदर्शी आणि प्रजेचे कैवारी राजे होते. संकटसमयी धैर्य न गमावता शिताफीने शत्रूंवर मात करत त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढत स्वराज्य उभारणारे शिवराय महाराष्ट्राच्या अस्मितेचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट व प्रदेश सरचिटणीस ॲड. गोरक्ष लोखंडे यांनीही शिवरायांच्या कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, प्रदेश सरचिटणीस ॲड. गोरक्ष लोखंडे, कार्याध्यक्ष विजय लोखंडे, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, मा. नगरसेवक प्रकाश सोमवंशी, नगरसेवक जितेंद्र ननावरे, वर्षा जगताप, मनिषा लांडे, तसेच विविध आघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) मोरे यांनी मानले.

