भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भोसरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन शनिवार, दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 5 वाजता निरगुडे या गावी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया व निरगुडे गावातील मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उत्साहात संपन्न झाले. हे शिबिर दिनांक 14 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
.या प्रसंगी बोलताना डॉ अशोककुमार पगारिया म्हणाले ” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम १९६९ पासून सुरू झाला आहे ,या योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या या विभागाच्या माध्यमातून अनेक सामाजिक व ग्रामसेवेचे, ग्रामस्वच्छतेचे उपक्रम राबविले जातात, विद्यार्थ्यांना समाजसेवेसाठी प्रवृत्त करण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे, “” उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून भीमाजी कदम, माजी सरपंच दिवाणशेठ कदम, कार्याध्यक्ष कैलास भोसले, रामेश्वर मंदिर ट्रस्टी संदीप कदम, शाळा व्यवस्थापन विकास समिती अध्यक्ष सोपान भाऊ कदम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गणेश भाऊ कदम व महिला ग्रामस्थ तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा सचीन पवार यांनी केले.
या सात दिवसीय शिबिरादरम्यान पर्यावरण जनजागृती, ग्रामस्वच्छता, वनराई बंधारा दुरुस्ती, आरोग्य संवर्धन, वृक्षारोपण, शासनाच्या विविध मोबाईल ॲपविषयी जनजागृती, शेतकऱ्यांसाठी ॲप डाउनलोड मोहिम, कापडी पिशव्या वितरण, गाव सर्वेक्षण, महिला सबलीकरण व बचत गट जागृती अशा विविध श्रमदान उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांच्या जनसहभागातून गावाच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कैलास भोसले यांनी मनोगत व्यक्त करून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या व सहकार्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश भाऊ कदम यांनी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. माजी सरपंच दिवाणशेठ कदम यांनीही ग्रामस्थांच्या वतीने सहकार्याचा आशावाद व्यक्त केला .
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये डॉ. विजय निकम, डॉ. हनुमंत शिंद, प्रा. प्रवीण म्हस्के, डॉ. स्वाती वाघ (विद्यार्थी विकास अधिकारी), माजी कार्यक्रमाधिकारी प्रा. सुधाकर बैसाणे, राजेश कुंभार, विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी संयोजन समिती सदस्य उपस्थित होते. पालक प्रतिनिधी म्हणून प्रमोदजी कुरबेट उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा पांडुरंग भास्कर यांनी केले.

