- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभेच्या मावळ मतदार संघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. ही आघाडी कायम राहिल्याने बारणे दुपारी दोनच्या सुमारास बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. त्यावेळी समर्थकांनी जल्लोष केला. अकराव्या फेरीनंतर श्रीरंग बारणे ४ लाख ४८ हजार ९४८ तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना ३ लाख ८१ हजार ३७२ मते मिळाली आहेत. बारणे ६७ हजार ५७६ मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय पाटील आणि एकनाथ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्यात सरळ लढत झाली. त्यामुळे मावळचा खासदार कोण होणार याबाबत उत्सुकता लागून होती. मंगळवारी सकाळी आठ वाजता…
– भाजपा पक्ष कार्यालयात मुंडे साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन ! पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी शंकर जगताप यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. गोपीनाथजी मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आजही आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे, तसेच त्यांच्या विचारांचे पाईक होणे ही खरी आदरांजली ठरेल, अशी भावनाही जगताप यांनी व्यक्त केली. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश…
आज मतमोजणी ; उमेदवारांसहित मतदारांची उत्कंठा शिगेला! मावळात खासदार कोण श्रीरंग बारणे की संजोग वाघेरे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे, बारामती, शिरूर व मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवारी) लागणार आहे. चारही मतदारसंघांत चुरशीची लढत असून, आपल्या मतदारसंघाचा खासदार कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मावळचा शिलेदार कोण असणार हे आज दुपारी जाहीर होणार असल्याने उमेदवारांसहित मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मावळमध्ये महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा गट) उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात लढत झाली. १३ मे रोजी मतदान झाल्यापासून कोण जिंकणार? यावरून कार्यकर्त्यांचा खलबते सुरू आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या नेत्याच्या विजयासाठी रात्रंदिवस झटत होते. त्यामुळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे प्रा. प्रकाश विजय सोनटक्के यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘डिटेक्शन ॲण्ड मायटिगेशन ऑफ मलेस्युस अटॅक्स इन ऑटोनॉमस व्हेइकल्स’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांना पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. सोनटक्के यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होत संशोधन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांसह सहयोगी संशोधन – प्रा. डॉ. गुयेन ची न्गॉन, डीन, कॅन-थो युनिव्हर्सिटी व्हिएतनाम. प्रो. न्युयेन व्हॅन कुओंग, डीन, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी कॅन-थो युनिव्हर्सिटी व्हिएतनाम. प्रो. सेल्वाकुमार मनिकम,…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षामध्ये पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामधील करसंकलनामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विभागातील २३ कर्मचाऱ्यांचा पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक ३१ मे रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह चिंचवड येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्वांना प्रशस्तीपत्र आणि इकिगाई या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. यावेळी करसंकलन विभागाचे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख, प्रशासन अधिकारी नाना मोरे, राजाराम सरगर, चंद्रकांत विरणक, शीतल वाकडे आदी उपस्थित होते. यावेळी करसंकलन विभागाने करसंकलनासाठी घेतलेला पुढाकार व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. करसंकलन विभागाने गतवर्षी माहिती विश्लेषण, रील स्पर्धा, सोशल मीडियातून जनजागृती आदी…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशनने(पेरा) पेरा सीईटीच्या (PERA CET 2024) पहिल्या फेरी चा निकाल नुकताच जाहीर केला. १५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, ज्यामुळे त्यांना अभियांत्रिकी, जैव अभियांत्रिकी, सागरी अभियांत्रिकी, डिझाइन, फाइन आर्ट, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, कायदा आणि हॉटेल व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास मदत होणार आहे. पेरा इंडिया ही महाराष्ट्रातील खाजगी विद्यापीठांची संघटना आहे. गेल्या सात वर्षांपासून पेरा सीईटी परीक्षेचा आतापर्यंत 300,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळाले आणि शीर्ष सदस्य विद्यापीठांद्वारे देऊ केलेल्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला. अनेक विद्यार्थ्यांना खाजगी विद्यापीठांमध्ये शिक्षण घ्यायचे असल्याने,…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केवळ एक दिवसाचा उपक्रम साजरा न करता पर्यावरणाची शाश्वतता आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी अशोकानगर, ताथवडे येथील पर्यावरणप्रेमी समूह सातत्याने दर शनिवार आणि रविवारी वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक उपक्रमाचे आयोजन करीत आहे. विशेषत: तरुणांचा सहभाग असलेल्या या समूहाने आतापर्यंत परिसरात १०० वृक्षांचे रोपण केले असून ही मोहीम संपूर्ण पिंपरी – चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वेणुप्रसाद सरोदे यांनी दिली. तेजस चवरे, शशिकांत सुतार, नीलेश घोरपडे, आनंद डोळस, गणेश कुंदाने, सागर हंबीर, समीर पाटील, गणेश कुलकर्णी, गणेश गोसावी, अमोल बागूल, विक्रम पिल्लई, सुधीर रहासे, एन. पी. देवकर या समूह…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मावळ लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक (काउंटिंग ऑब्झर्व्हर) म्हणून मोहम्मद हारूण यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे. श्री. हारूण यांच्या निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्र.२०१ असा असून संपर्क क्रमांक ९४१९०९०६४४ असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी सचिन चाटे हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१२७९५६६ असा आहे, असेही दीपक सिंगला यांनी कळविले आहे. 0000
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात उद्या मंगळवारी (दि. ४) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात उद्या मंगळवारी (दि. ४) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. राज्यात उद्या गैर प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला…
हभप नितीन महाराज मोरे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या 38 व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गुरूवारी (दि.6) पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमात देहू गाव येथील हभप नितीन महाराज मोरे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दि.1) पत्रकार परिषदेत दिली. मोरवाडी, पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब वाघेरे, जयवंत शिंदे,…
