दिवंगत महापौर भिकू वाघेरे-पाटील प्रतिष्ठानतर्फे येत्या गुरूवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
हभप नितीन महाराज मोरे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या 38 व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गुरूवारी (दि.6) पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमात देहू गाव येथील हभप नितीन महाराज मोरे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दि.1) पत्रकार परिषदेत दिली.
मोरवाडी, पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब वाघेरे, जयवंत शिंदे, रमेश गोलांडे, अण्णा कापसे, सुरेश झिटे, गणेश वाघेरे, किसन (आप्पा)वाघेरे, बिपिन नानेकर, निशाण गवळी, विलास भोंडवे, प्रशांत खुळे, संजय लंके यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले की, दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. यंदाही विविध समाजपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. नवमहाराष्ट्र विद्यालय येथील दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे यांच्या पुतळ्यास सकाळी नऊला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात देहू गावचे हभप नितीन महाराज मोरे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास आमदार अण्णा बनसोडे, आमदार अश्विनी जगताप, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले, प्रचारप्रमुख योगेश बाबर, माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर मंगलाताई कदम, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, माजी गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक मारूती भापकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेविका उषा वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले आहे.