- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कविता भोंगाळे युवा मंच, गायत्री सखी मंच व माणदेशी फाउंडेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमानाने वटपौर्णिमेनिमित्त खास महिलांकरिता नथ बनवणे कार्यशाळा गंगोत्री पार्क, भोसरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत दिघी,भोसरी परिसरातील शेकडो महिलांनी सहभागी होत कार्यशाळा यशस्वी पार पडली. भाजपा चिटणीस कविता भोंगाळे – कडू यांच्या पुढाकाराने भोसरी परिसरात महिला, युवक- युवती, ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत व्हाही या सामाजिक भावनेतून वटपौर्णिमेनिमित्त खास महिलांसाठी नथ बनवणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले या कार्यशाळेत महिलांना विविध प्रकारच्या नथ बनवायला शिकवल्या गेल्या.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील गीता मंदिर प्राथमिक शाळेत आज शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे ,पालकांचे नवागताचे सहर्ष स्वागत केले. विद्यार्थांचे औक्षण करून त्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.पेन, पेन्सिल अशा भेट वस्तू देण्यात आल्या.विद्यार्थी व पालक मोठ्या उत्साहाने, आनंदाने हजर होते. चंदा नामदे, संगिता शहासने, मंदा कोकरे, ज्योत्स्ना वाव्हळ, राजश्री गायकवाड, सुनिता धोंडगे सर्व शिक्षक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार -प्रदीप जांभळे पाटील पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा अधिक वृद्धिंगत करण्यासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सुमारे दोन महिन्याच्या कालावधीनंतर आज शाळेची घंटा निनादली. महापालिकेच्या वतीने शाळेचा पहिला दिवस “प्रवेशोत्सव” म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाकड येथील कन्या शाळा आणि थेरगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापिका…
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पी.सी. एम. सी. पब्लिक स्कूल कुदळवाडी क्र.८९ शाळेमध्ये आज शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन करण्यात आले. तसेच पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वितरण दिनेश यादव नगरसदस्य, आनंदराव यादव, विशाल बालघरे, डॉ. सुनिल यादव, बबनराव मोरे, दिपक घन व शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन उपस्थित होते. विठ्ठल बगाटे यांनी प्रास्ताविक करताना शाळेमध्ये राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तसेच खडू फळ्याच्या साक्षीने सुरु झालेली शाळा आज पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये नंबर एकवर कार्यरत आहे, असे सांगितले. . शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेमध्ये संगणक लॅब, अद्ययावत प्रयोगशाळा व…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष चटणे यांना नुकताच राज्यस्तरीय विद्यानिकेतन पुरस्कार २०२४ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील वाई येथे संपन्न झालेल्या विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था आयोजित राज्यस्तरीय विद्यानिकेतन पुरस्कार सोहळा २०२४ अंतर्गत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या मंजूषा गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सुभाष चटणे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साडेचार वर्षापासून प्रलंबित महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपळे गुरव,सांगवी शाखा व्हावी यासाठी पिंपळे गुरव भागातील ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांनी हरिओम निवास,भालेकरनगर, पिंपळे गुरव येथे दि.११ जूनपासून १४ जूनपर्यंत अन्नत्याग उपोषण केले.दरम्यानच्या काळात पिंपरी-चिंचवड शहर भाजपाध्यक्ष शंकरशेठ जगताप यांनी उपोषण स्थळी जाऊन सुरेश कंक यांच्यासह अनेक साहित्यिकांची भेट घेतली.त्या प्रसंगी ते म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विकसित होत आहे.शहराची लोकसंख्याही तीस लाखाहून अधिक झाली असून या परिक्षेत्रात साहित्य चळवळ मोठ्या प्रमाणात चालू आहे.या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दोन शाखा पूर्वीपासून कार्यरत आहेत.परंतु लोकसंख्येच्या आणि येथील साहित्यिकांच्या मानाने या शाखा अपुऱ्या पडतात. या विशालकाय महानगरीमध्ये…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी मधील आदर्श शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका प्रियांका बारसे व सुषमा कुंभार, वंदना लढे, चित्रा औटी यांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केले . विद्यार्थी पालक शिक्षकांच्या उपस्थितीत संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. भोसरी मधील आदर्श शिक्षण संस्थेच्या प्रांगणात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने प्रवेशाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी बालवाडी प्राथमिक माध्यमिक तसेच इंग्रजी माध्यम विभाग व संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बारसे यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा जल्लोत्सव साजरा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका बारसे व सह शिक्षकांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केलेसह शिक्षकांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केले. बालवाडी विभागाच्या कुंभार मॅडम यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप झाले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्वतंत्र शाखा मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांनी त्यांच्या निवासस्थानी दिनांक ११ जून २०२४ पासून भालेकरनगर, पिंपळे गुरव येथे अन्नत्याग उपोषणाचा प्रारंभ केला होता. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे यांनी शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ रोजी सुरेश कंक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सुरेश कंक यांनी ज्येष्ठ साहित्यिक मधु जोशी यांच्या हस्ते नारळपाणी प्राशन करून उपोषण मागे घेतले. . त्यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक मधु जोशी,…
ई- क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अधिकाऱ्यांची बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रस्ते, पाणी आणि कचरा विषयक समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच, पावसाळ्यात यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील ई- क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रलंबित समस्या आणि पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त राजेश आगळे यांच्यासह विविध विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोशी गावठाण, गंधर्व नगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखलेमळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, ताजणेमळा, चोविसावाडी, च-होली, डुडूळगाव, दिघी, गजानन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर जगताप व आमदार अश्विनी जगताप ह्यांच्या विरोधात प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल थोरात ह्यांनी व्यंगचित्र काढून घराणेशाही बाबत टीका केली आहे.याबाबत भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी निषेध व्यक्त केला आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दखल घेऊन चिंचवड विधानसभा येथील घराणेशाही दखल घ्यावी म्हणून मुलाखत दिली असून सदर प्रकार असा आहे की अमोल थोरात हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते विनायक थोरात ह्याचे चिरंजीव असून पक्षांतर्गत कलह निर्माण करण्यासाठी बेताल वक्तव्य करून तेड निर्माण करत…
